हा क्रमांक अस्तित्वात नाही !

इरावतीने नेहमीचे वर्कआउट संपवले . नीपकिनने मानेवरचा घाम पुसत सॅक मधली लेमन ज्युसची बाटली तोंडाला लावली . तेव्हड्यात मोबाईल वाजला .
” हाय ,ईशांक . आणखीन तासभर तरी लागेल . जस्ट वर्कआउट संपलय . घरी जाऊन चेंज करून येतच . ” तिने ईशांक काय म्हणतोय हे न ऐकताच फोन कट केला . काय म्हणणार ? ‘ तशीच ये ! चेंज बिंजच्या  भानगडीत नको पडूस  ‘ . इरावतीने जिमचे शूज पॅक करून सॅक मध्ये टाकले . नेहमीचे कॅज्युल स्पोर्ट शूज पायात घातले . जॅकेटअंगात घालून सॅक पाठीला लावली . पुन्हा मोबाईल वाजला . हा ईशानक ना कधी कधी खूप पझेसिव्ह होतो ! पागल झालाय !
“अरे , निघतोय ना ईशांक  ! किती घाई —-”
” मी तुमचा ईशांक  नाही ! पण तरी माझे बोलणे लक्ष पूर्वक एका ! ” फोनवरचे तिचे वाक्य एका भारदस्त आवाजाने तोडले . त्या थंडगार आवाजाने इरावतीच्या अंगावर काटा आला . इरावतीने झटक्यात फोनच्या डिस्प्लेवर नजर टाकली . अननोन नम्बर होतो ! तिला आश्चर्य वाटले . कारण हा तिचा पर्सनल नम्बर होता . फक्त जवळच्या लोकांना दिलेला !
” सॉरी , कोण बोलताय ?आणि हा नंबर तुमच्या कडे कसा ? कोण दिला ?”
” या क्षणी या सर्व गोष्टी गौण आहेत ! मलाहि  महत्व नाही .  फक्त तुमच्या साठी असलेला निरोप देण्यासाठी माझी नियुक्ती झाली आहे ! तो निरोप असा –‘ तुम्ही आत्ता ज्या मॉलच्या जिम मध्ये आहेत , तो काही वेळातच ब्लास्ट होणार आहे ! सध्या मॉल मध्ये पाच हजार आठ शे सत्तावीस लोक आहेत !वेळ कमी आहे !हरी ,सेव्ह देम ! ‘ ” फोन कट झाला !
इरावती क्षणभर सुन्न झाली . मॉल  ब्लास्ट होणार ? हेच आपण ऐकले ना ? बापरे ! झटक्यात तिने तोच नंबर  रिडायल केला . दोनदा रिंग वाजली . पुन्हा कसलाही रिस्पॉन्स नाही !
तिने कौल साहेबाना रिंग केली .
“इन्स्पेक्टर ,इरावती हेयर ! सर !”
” बोल ,इरा ! ” कौलाचा स्वर सलगीचा होता . ते इरावतील मुली सारखेच मानीत असत .
” सर , अननोन कॉल ! कलर्स मॉल ब्लास्ट होणार !हा मेसेज !काय करू ?”
कौल विचारात पडल्या सारखे झाले .
” इन्स्पेक्टर , तुम्हाला माहीतच आहे , पब्लिक प्लेसेसवर टेरेरिस्टचा डोळा असतो ! डू द निडफूल !” कौलनी ऑफिशियल आवाजात उत्तर देऊन फोन कट केला ! शेवटी ते सुपीरियर पडले ना ! निर्णय तुमचाच , परिणाम तुम्हीच फेस करा , क्रेडिट फक्त मला द्या ! यात नवल ते काय ? कुठल्याही  मॅनेजमेंटचा हा अलिखित नियम असतो !
इरावती मात्र पेचात अडकली होती . फोन खरा असेल का ? का कोणी मस्करी केली असेल ? काय करू ? का दुर्लक्ष करून सरळ घरी चेंज करून ईशांक सोबत एन्जॉय करू ?पण तसे आता करता येणार नाही . कौल सरांना फोन करून ठेवलाय ! धमकी खरी निघाली तर ? पाच हजारावर जीव जातील ! शिवाय बेजवाबदारीचा ठपका . इतकाच नाही तर आयुष्य भर आपण स्वतः ला माफ नाही करू शकणार ! आणि समजा या धमकीवर विश्वास ठेवून मॉल रिकामा केला ,अन काहीच घडले नाही तर ? लोकांची टोमणे , वरिष्ठांचा रोष , आणि भक्कम गाढवपणा गळ्यात पडण्याचा धोका होताच . इतक्या दिवसाच्या प्रामाणिक  कामावर बोळा फिरणार होता !काय करू ?
धमकी खरी ठरो  वा खोटी , सावधगिरी बाळगलीच पाहिजे !  पाच हजारावर जीव धोक्यात आहेत . तेव्हा मॉल  लवकरात लवकर रिकामा करणे गरजेचे होते ! तिचा निर्णय झाला !
000

इराने ब्लूटूथ ऑन केला .
“हॅलो ,कंट्रोल रूम ! इन्स्पेक्टर इरावती हेयर ! इमर्जन्सी !
“मी प्रशांत , इन्चार्ज ऑन ड्युटी ! बोला !”
“कलर्स मॉल  ब्लास्ट होणार . अननोन नंबरवरून मेसेज आलाय !”
” तो फोन नंबर सायबर सेलला किंवा मला फॉरवर्ड करा . बाकी सोय  करतोय ! ”
“मी तो नंबर पाठवलाय ! लोकेशन ट्रेस करा . लगेच मला काळवा !”
“ओके ! अँटी टेररिस्ट स्क्वाड ला कळवू का ?”
क्षणभर विचार करून ,इराने होकार दिला . नाहीतरी त्यांची मदत घ्यावीच लागणार होती !

इराने जिमच्या मॅनेजरला मॉलची कंट्रोल रूम कोठे आहे ते विचारून घेतले . ती लिफ्ट कडे धावली . लिफ्ट खाली येत होती , तोवर तिने मारियाला फोन लावला . मारिया, इराची इंफॉर्मर, मॉलच्या सलून मध्ये कामाला  होती . सलून ,मसाज , स्पाच्या नावाखाली नको ते धंदे चालतात . या साठी इराने हि सोया केली होती !
“मारिया ,आत्ता  किती लोक आहेत तुझ्या सलून मध्ये ?”
” ऐट  अंडर ट्रेंटमेन्ट , ट्वेल्व्ह वेटिंग !”
“आणि तुम्ही आर्टिस्ट आणि अससिस्टंट्स ?”
” पंधरा ! ”
” तुम्ही पस्तीस जण ताबडतोब शटर बंद करून मॉल बाहेर पडा ! पंधरा मिनिटाच्या आत ! ”
“पण का ?”
“आतंकवाद्यांच्या हिट लिस्ट वर मॉल आहे ! घातपात कधीही होऊ शकतो ! अगदी या क्षणी सुद्धा ! ”
“पण –”
“पस्तीस जीवाची जवाबदारी तुझी ! ”
लिफ्ट मध्ये शिरता शिरता इराने फोन कट केला .

पाचव्या मजल्याचा अर्धा फ्लोअर वर कंट्रोल रूम होती . ती तीरा सारखी आत घुसली .
“अटेन्शन एव्हरी बडी . मी इन्स. इरावती !इमर्जन्सी आहे ! इथे इन्चार्ज कोण ?”
मिलिटरी वेशषतला , ‘ धटिंगण ‘या शद्बाचा मूर्तिमंत साडेसहा फुटी अर्थ ! , क्रिकेटचे ग्लोज सारखा आपला पंजा पुढे करत तो नरदेहधारी इरावती समोर सरसावला .
“रिटायर्ड कॅप्टन भीमा शंकर ! व्हॉटस प्रॉब्लेम ?”
इरावतीने दोन्ही हात जोडून भीमाशंकरला नमस्कार केला ! आणि थोडक्यात आलेल्या फोनची आणि मॉल  ब्लास्टच्या धमकीची कल्पना दिली .
” साला , पागल है क्या ? ऐसे कैसे ब्लास्ट होगा ? सब रूमर होता है ! चारबार ऐसी धमकी आई थी , कुछ नाही हुवा ! ”
“पर हमे सावधानी बरतनी होगी  , सर ! अब तक नाही हुवा तो अबभी नाही होगा , ऐसे सोचना गलत है !”
भीमाशंकरने इराला पाया पासून डोक्यापर्यंत घाणेरड्या नजरेने एकवार न्याहाळले .
“आय कार्ड ?” त्याने हात पुढे करत विचारले . इराने आपली पितळी बॅच दाखवली . त्याने आपल्या असिस्टंटला खूण केली . त्या असिस्टंटने आवश्यकते डिटेल्स आपल्या लॅपटॉपवर घेतले . बॅचचा फोटो काढून घेतला .
“थोडा रुक्क !” तिरसट आवाजात इराला म्हणत ,त्याने कोठे तरी फोन लावला . बहुदा मॉलच्या मालकाशी बोलत असावा . तो बराचवेळ फोनवर एकात होता . इराची बेचैनी वाढत होती . तिचा मोबाईल वाजला . ईशांक होता !
तिने कसलाही विचार न करता त्याला ब्लॉक केले !
” हा तो तेरा क्या नाम बताया ? इरावती ! देख पगली, अब ये सारा मॉल का कंट्रोल तरे को देनेको मालिक बोला , और उपरसें तेरेको कोऑपरेटभी करनेको कहा है ! ”
” थँक्स ! मॉलका फ्लोअर प्लॅन , सायबर युनिट इन्चार्ज , इलेक्ट्रिसिटी इन्चार्ज ,और सेक्युरिटी हेड को आपकी केबिन मे  बुलालो !”इराने सर्व सूत्र हातात घेतली .
इराचा फोन वाजला . पोलीस कंट्रोल रूम होती !
“हा प्रशांत , फोनचे लोकेशन ट्रेस झाले का ?”
” मॅम नंबरच ट्रेस होत नाहीय ! प्लिज पुन्हा तो नंबर मला पाठवा . ”
इराने पुन्हा तो नंबर फॉरवर्ड केला . आणि ती भीमाशंकरच्या केबिन मध्ये गेली . सगळे तेथे जमले होते .
” मला आधी फ्लोअर प्लॅन बघू ”
“मॅम , मॉलचे  व्हर्टीकली दोन भाग होतात . डाव भाग चौथ्या मजल्या पर्यंत पार्किंग साठी आहे . उजव्या बाजूच्या भागात फ्रँचाइज आणि त्यांची दुकाने आहेत ! ”
“ओके ! मल्टिप्लेक्स ?”
“चार स्क्रीन आहेत ! टॉप फ्लोअर ला !”
“आत्ता  सिनेमा चालू आहेत ?”
“नाही पण तासाभरात दोन स्क्रीन सुरु —-”
“आजचे सगळे शो सस्पेंड करा ! ”
“पण बुकिंग —”
“अहो , जीवा पेक्षा सिनेमा महत्वाचा आहे का ?”
तो शोज कॅन्सल करण्याच्या कामासाठी पळाला .
” सेक्युरिटी , या मॉल  मधला प्रत्यक्ष माणूस बाहेर काढायचा आहे !तेही कसलाही गडबड गोंधळ न होवू देता .  पोलीस फोर्स पोहचेल तेव्हा पोहचेल ! हा तर हे कसे करता येईल ? भिमा शंकरजी ? एनी सजेशन ?”भीमा शंकर फक्त कडवट हसला . येथे डोके लावण्यात अर्थ नव्हता हे इराच्या लक्षात आले .
” इले . इन्चार्ज , शोर्ट सर्किट किवा इतर काही धोका असेल तर लक्ष ठेवा ! आणि हो ग्राउंड फ्लोअर वरून वर येणारे सर्व एस्केलेटर्स ताबडतो बंद करा ! फक्त खाली जाणारे चालू ठेवा .! हरी ! ” इरावती भराभर सूचना देत होती .
इराचा फोन वाजला .
” राणी ,अलीस का ? आणि तुझी टीम ?”
“रिपोर्टिंग ! ”
” बाहेरच थांब !  मॉलचा एंट्रन्स सील कर ! एकही नवीन माणूस मॉल मध्ये शिरता कामानये ! मी मॉलच्या सेक्युरिटीला तुझ्या मदतीला पाठवते आहे . ”
” पण का मॅडम ? काय झालाय ?”
“सांगते तेव्हड कर ! ” इराचा सूर चिडका झाला . पण तिने चटकन स्वतःला सावरले . तिचे टेन्शन क्षणा क्षणाला वाढत होते .
” सायबर युनिट कोणाकडे आहे ?”
” मी राकेश , माझ्या कडे !”एक पोरगेलासा वेडीवाकडी दाढी वाढवलेला तरुण पुढे आला .
“राकेश , सीसी टीव्ही मॉनिटर वरची नजर काढू नकोस . काही संशयास्पद वाटले तर लगेच कळावं . आणि हो , तुम्ही मॉल मध्ये मेसेजस कसे पाठवता ?”
“मॅम , या येथे ऑडिओ / व्हिडीओ लोड केली कि मॉलच्या कान्या कोपऱ्यात पोहंचते ! “त्याने एका डेक कडे बोट दाखवत सांगितले .
” मग मला माईक दे . आणि व्हिडीओ घे ! ”
राकेशने माईक इराला दिला आणि आपला मोबाईल व्हिडीओ मोडवर सुरु केला .
” नमस्कार , मी इन्स्पेक्टर इरावती . कृपया माझे बोलणे काळजीपूर्वक ऐका , आज आपला हा मॉल ‘मॉक ड्रिल ‘साठी निवडला गेलाय . हा मॉल  आपल्याला केवळ दहा मिनिटात रिकामा करायचा आहे ! केवळ दहा मिनिटातच ! उद्या अतिरेकी हल्ल्याच्या क्षणी किंवा अपघाताच्या प्रसंगी गोंधळ होऊ नये म्हणून हि ‘ रंगीत तालीम ‘ आहे . कृपया सहकार्य करावे ! धन्यवाद ! ”
राकेशने जुबुबी एडिट करून ती व्हिडीओ आणि ऑडिओचे प्रसारण सुरु केले !
०००
” सर , मी गोपाळ रिपोर्टर . कलर्स मॉल मध्ये काहीतरी गडबड आहे ! ”
” गोपाळ , नक्की काय झालाय ?”
“पोलिसांनी मॉलचा  एंट्रन्स बंद केलाय ! ”
” का ?”
“माहित नाही ! पण नक्की मेजर प्रॉब्लेम असावा ! बापरे ,सर मॉल रिकामा  करण्याचे कोणीतरी आवाहन करताय !”
दहा मिनिटात डोक्यावर  उलटी ‘ छत्री ‘ घेऊन टीव्ही चॅनलची व्हॅन ‘लाईव्ह टेलिकास्ट ‘ साठी डुलत डुलत निघाली होती !
००००
“मॅम ,सर्किट प्रॉब्लेम नाही .  वर येणारे एस्केलेटर्स बंद केलेत . पण लोक लिफ्ट आणि पायऱ्या वापरताहेत ! ”
“डॅम इट ! हे माझ्या लक्षात कसे आले नाही ?”
एव्हाना इराला मेनन ,कुमार आणि मोहन जॉईन झाले होते .
“मोहन , प्रत्येक मजल्याच्या प्रत्येक स्टेयर केस जवळ एक एक माणूस  ठेव , वरच्या बाजूस कोणासही येऊ देऊ नकोस !”
“कुमार , सेक्युरिटीच्या पोरांना घेऊन लिफ्ट मॉनिटर कर . ! गो ! ”
कुमार निघून गेला .
इराचा फोन वाजला .
” बोल राणी !”
” मॅम  , बाहेरची पब्लिक गोंधळ करतीय ! लवकरच हा गोंधळ हाता बाहेर जाण्याची लक्षणे आहेत ! कारण न्यूज चॅनलची व्हॅन अली आहे ! लोक भडकतील असे प्रश्न ते विचारत आहेत !”
संकट एकटी येत नाहीत , नको त्यावेळी टीव्ही चॅनल्स घेऊन येतात !
” माझे प्रसारण मॉल बाहेरील मोठ्या स्क्रीनवर टेलिकास्ट कर ”
ती राकेश कडे वळून म्हणाली !
मॉल बाहेर इरा मेगा डिस्प्लेवर दिसू लागली .
०००
इराचा फोन झाला तसे कौलनी आपले सारे फोन आणि लँडलाईन ऑफ केले होते ! इरा . वेडी मुलगी नको तो निर्णय घेणार याची त्यांना कल्पना होती . पेपरवाले , टीव्ही वाले ,  मंत्री संत्री ,होममिस्टरचे ऑफिस ,आणि एखादेवेळेस मुख्यमंत्री सुद्धा ,सगळे ‘बाप ‘ चौकशी आणि जाब विचारून हैराण करणार होते ! पण  फोन बंद करून त्यांची सुटका नव्हती ! टीव्हीवर मॉलचे लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाले होते ! जगभर चॅनलवाले नाचणार होते ! कौल डोक्याला हात लावून बसले होते !
०००
जिने , एस्केलेटर्स , लिफ्ट्स भरभरून ग्राउंड फ्लोअरच्या दिशेने जात होते .कंट्रोल रूम मधून ,  ‘शटडाऊन ‘चा मेसेज प्रत्येक दुकानाला जात होता . तरी बरेच लोक अजून मॉल मध्ये होतेच . मॉल बाहेरचे लोक ‘आत सोडा ‘ म्हणून ‘प्रेशर ‘ वाढवत होते , तर आतले लोक बाहेर जाताना रेंगाळत होते ! आणि वेळ सुपर फास्ट गतीने संपत होता .
मॉल सारखी वास्तू रिकामी करणे वाटले तितके सोपे नाही याची इराला जाणीव होवू लागली .
“मॅम , टॉप फ्लोर अँड फूड कोर्ट्स टोटली रिकामी झालीत ! ”
“ओके . सगळी किचन्स तपासलीत का ? परटीकुलरली गॅस कनेक्शन बंद केलेल्याची खात्री करून घेतलीत का ?”
“न , नाही . पण आत्ता  पहातो . ”
बाहेर कुठेतरी ढांण ,ढाण करत फायर ब्रिगेड च्या गाड्या , ऍम्बुलनकसचे सायरन , पोलीस फोर्स च्या गाड्याचे आवाज ऐकू येत होते .
०००
हा ,हा , म्हणता दोन अँटी टेररिस्ट स्क्वाडचे जवान  मिलिटरी ट्रक मधून शिस्तीत उतरले . सोबत बॉम्ब शोधक पथक ,त्यांची ती ट्रेंड कुत्री , गॅस मास्क सगळंच आलं . त्यांनी मॉलचा ताबा घेतला . एव्हाना निम्मा मॉल कसा बसा रिकामा झाला होता , पण स्क्वाडच्या नुसत्या बुटांच्या आवाजाने लोक मॉल बाहेर पळाले ! वातावरण एकदम गंभीर झाले . मॉल मधून बाहेर येणारी शेवटची  व्यक्ती होती , थकलेली इरावती ! इराचा फोन वाजला
” हा प्रशांत बोल  ?”
” एव्हाना फोर्स मॉलवर पोहोचला असेल ! मी रवाना अलर्ट केले होते . दुसरे महत्वाचे , तुमच्या त्या अननोन फोनचे लोकेशन ट्रेस झालाय ! ”
“कुठाय ?”इराने उछुकतेने विचारले .
“कलर्स मॉलच्या आसपासच ! ”
०००
अँटी टेररिस्ट पथकाने सलग पाच तास मॉलचा इंच ना इंच तपासला . त्यांना संशय होता तो पार्किंग लॉट ,किचन गॅस लिकेज , आणि शॉर्ट सार्केटिंगचा ! कोठे काहीहि सापडले नाही ! तेथे असलेले सर्वजण इरा कडे ‘काय मूर्ख मुलगी आहे !’ या नजरेने पाहत होते .
” कहा  है ओ इन्पेक्टर ? ” अँटी टेररिस्ट पथकाचा तो धिप्पाड अधिकारी गरजला .
” ओ देखो वहा,  कारकी डिकी खोलकर  बैठी है ! बिलकुल पगली है ! “कॅप्टन भीमाशंकरने दूर बसलेल्या इराकडे निर्देश केला , तसा तो अधिकारी ताड ताड पावले टाकत इरा कडे गेला . इरा  कशी बशी उठून उभी राहिली . खाली मान घालून .
” क्या नाम है , तुम्हारा ?”
” इन्स्पेक्टर इरावती . ”
“नजर मिलाके जवाब दो ! ”
इराने तडक डोके वर करून त्याच्या दगडी चेहऱ्याकडे पहिले . त्याच्या डोळ्यात विशिष्ट चमक होती .
“इरावती ! आपको पता है ,अपने क्या किया है ?”
” जी मैने जो मुझे ठीक लगा —–”
” इरावती , अपने बिलकुल सही ऍक्शनली है ! बडी खुबसुत तारिकेसे अपनी ड्युटी निभाइ है ! अब यह तो अच्छाही हुवा के सबकुछ ओके निकला , कई जाने बची ! वेल डन माय चाईल्ड ! ” तो हलक्या फक्त तिला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला . खाड्कन अबाउट टर्न करून निघून इतर अधिकाऱ्यांच्या गराड्यात घुसला .
सगळेच ठीक होते . स्क्वाड लीडर , हजर असलेले पोलीस अधिकारी , मॉलचा कॅप्टन भीमाशंकर सर्व जण कोंडाळा करून उभा होते . सर्वानुमते असे ठरले कि , मॉलला कसलाही धोका नाही .
” तो सरजी ,क्या मॉल फ़िरसे शुरू किया जाय ?” भीमाशंकरने आपल्या भसाड्या आवाजात विचारले .
” एस , गो अहेड ! ”
आनंदाने भीमाशंकरने एक पाऊल मॉलच्या दिशेने उचले .
प्रथम डोळे दिपवणारा प्रकाश चमकला . !
मग पायाखालची जमीन किंचित थरथरली .!
कानठळ्या बसवणारा आवाज झाला . !
धूळ ,धूर आणि आगीचा प्रचंड लोळ आकाशात झेपावला !
डोळ्यादेखत त्या मॉलच्या ठिकऱ्या आसमंतात उधळ्या गेल्या ! मोल ब्लास्ट झाला होता !
०००
आता बहुतेक जण निघून गेले होते . थोडे निवांत झाले होते . फक्त एकाच व्यक्ती भयानक बिझी होती . कौल ! ते पोटतिडकीने,’ मी  कशी वेळेवर आणि तत्परतेने कार्यवाही केली ? आणि हजारो जीव वाचवले . ‘  हे  टीव्ही चॅनल्स ला सांगत होते ! आणि चॅनलवाले ते लाईव्ह टेलेकास्ट करत होते !
०००

इरा भकास नजरेने जळणाऱ्या मॉलकडे पहात होती !
“इरा , निघुयात ?”
इराने आवाजाकडे पहिले . ईशांक उभा होता . त्याच्या  हातात  एक छोटसे सॅन्डविच होते !
“भूक लागली असेल ना ? खाऊन घे . मग निघू . ”
इराला आधार देत ईशांक तिला घेऊन गाडी कडे निघाला . इराचा फोन वाजला . खिशातला फोन काढून ऑन करी पर्यंत रिंग बंद झाली . तोच अननोन नंबर ! इराने रिडायल केले .
” आपण संपर्क करू इच्छिता तो क्रमांक अस्तित्वात नाही !  कृपया क्रमांक तपासून पहा . पाच हजार आठशे सत्तावीस जीव वाचवल्या बद्दल धन्यवाद !!”
इरा वेड्या सारखी फोन कडे पाहत राहिली .

— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे . पुन्हा भेटूच . Bye . 

## This Number Dies Not Exist – A Short Story



About सुरेश कुलकर्णी 67 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…