एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग २

“Veg or Non-veg ?” कोणीतरी विचारत होतं. त्याबरोबर सुरेशने वर्तमान पत्र बाजूला सारून पाहिंलं. एक एयर होस्टेस विचारत होती.
“veg !” त्याने उत्तर दिलं. त्या हवाई सुंदरीने शाकाहारी खाद्यपदार्थाचं पाकीट ढकलगाडीतून डाव्या हाताने काढून सुरेशच्या सीटसमोर असलेल्या मेक शिफ्ट टेबलावर ठेवलं. ढकलगाडी पुढे रेटत ती निघून गेली. कांही काळ सुरेश विचारांत पडला. त्याच्या डोक्यात लख्खकन वीज चमकली. तिने आपल्या डाव्या हाताने खाण्याचं पाकीट दिलं होतं. डावखुरी ! खाऊन झाल्यावर तो विमानाच्या मागल्या भागात गेला. ती तिथे इतर होस्टेस बरोबर कामात होती.

” Excuse me, Are you not Lucky?” त्याने सरळ सरळ प्रश्न केला.
” No ! I am now Lilly Sequeira” तिने उत्तर दिलं.
” You were Lucky – लक्ष्मी पै- no?” त्याने विचारलं.
” Yes! But how do you know ?” तिने आश्चर्याने विचारलं.
” एक पाऊल औल्या वाळूंत !” असं ताला-सुरांत गात सुरेशने हावभाव केला.
” ए, तूं सुरी – सुरेश खेर नां?” तिला ओळख पटली. पण प्रवाशयांच्या यादीत तुझं नांव नाहींये”
” मी माझं नांव बदललंय. सुरेश खेर ऐवजी, सुरेश देवरुखकर असं केलं. त्यालाही बरीच वर्षं झाली.
” बरं. इथे आपल्याला गप्पा मारता येणार नाही. मुंबईला पोहोंचल्यावर आपण भेटूं ” असं म्हणत तिने आपलं एक व्हजिटिंग कार्ड त्याला दिलं. सुरेश नाचतच आपल्या जागेवर परतला.

कांहीं कामानिमित्त तो उदयपूरला गेला होता आणि विमानाने परत मुम्बईला निघाला होता. अचानक लक्कीची भेट झाली म्हणून त्याला खूप आनंद झाला होता. घरी आल्यावर त्याने आईला सांगितलं. आईला कौतुक वाटलं.
“नांव काय म्हणालास, तिचं? लिली सिक्वेरा? ख्रिश्चन? हो. असूं दे. तुझ्या बाबांनी श्रीमंत मुलीचा नाद सोडावा हे तुझ्या लहानपणींच सांगितलं होतं. झोप तू आत्ता.”

जवळ जवळ वीस वर्षे झाली होती. सुरेशचे बाबा एका अपघातात वारले. सरिताच्या म़़ृत्यूनंतर पै मामनी जुहूला घर घेतलं. सुरेशने मन लावून आभ्यास केला. पार्ट टाईम नोकरी केली. ड्रायविंग शिकून आणि टैक्सी चालवून त्याने घरखर्चाला हातभार लावला. आणि तो एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट झाला होता. वर्ळीला त्याने सुरेख ब्लौक घेतला.

लक्कीला विसरला नव्हता. आज अचानक तिची भेट झाल्याने तो सुखावला. तिने दिलेल्या पत्त्यावर भेटायचं असा त्याने निश्चय केला. आईला घेऊन तो आपल्या गाडाने निघाला.निघण्यापूर्वी त्याने तिला फोन करून वेळ ठरवली होती.

— अनिल शर्मा

About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…