नवीन लेखन...

अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग १

मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो. तो दिवस मला आठवतो. 30 जून ही तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस-‘मंथ एण्ड’ म्हणून शाळेला अर्धा दिवस सुट्टी मिळाली होती. म्हणजे शाळेचं काम चालूंच होतं पण मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली होती. कोंडवाड्यातून सुटल्याप्रमाणे मी धावत घरी आलो. […]

मेरी

मला मुलगी असती तर तिने असेच केले असते ! माझ्या मनात विचार चमकून गेला. या चार दिवसातल्या दवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण ! कारण माझ्या नजरेतला ‘बाप ‘ खोटा नव्हता ,आणि तिचे ते स्माईल ’कॉर्पोरेट‘ नव्हते . […]

चांदी – लघुकथा

आमचं गाव या आडबाजूच्या रेल्वे स्टेशन पासून चांगलं सात आठ कोस लांब आहे . पक्कीच काय कच्चा रास्ता पण नाही . कुठं पाय वाट तर कुठं गाडी वाट इतकंच . सगळा मामला डोंगर -दऱ्याचा अन माळ रानाचा . वाटेत दिवसा अंधार वाटावा अशे निबिड जंगल ! या स्टेशन वर रात्री अकराला आणि पहाट तीन ला एक एक गाडी शिट्टी मारून जाते . बाकी शुकशुकाटच असतो . […]

दयाघन – लघुकथा

तुम्ही कधी ‘ दयाघन ‘ नामक संस्थेचं नाव ऐकलंय का ? मी हि काल पर्यंत ऐकलं नव्हतं . पत्रकारितेत अशा गोष्टी लवकर कानावर येतात . सध्या ती एक गुप्त संस्था आहे आणि काही निवृत्त मेडिकल संशोधक चालवतात इतकेच हाती आलंय . या ‘दयाघनावर ‘ माहिती काढून एखाद्या रविवारच्या पुरवणी साठी ढासू कव्हर स्टोरी करण्याच्या उद्देशाने मी जरा मागावर होतो . […]

त्याची ‘राधा ‘ आणि राधेचा ‘तो ‘

त्या दिवशी राधा सैरावैरा झाली होती . कोठे भटकतोय कोणास ठावूक ? असाच भटकत असतो डोंगर दऱ्यात ! काय तर म्हणे ट्रेकिंग ! पण इतके दिवस नाही रहात माझ्या पासून दूर ! […]

मंचक महात्म्य – डोहाळे आणि भीमा काकी !

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची […]

गोष्ट एका ‘ Post ‘ ची

साली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि ! […]

‘पिंपळ्या’ ! एक लघुकथा

‘जिंदगीमे क्या खाना तो -दम -खाना , और क्या करना तो -आराम -करना ‘ हे नागूचे लाडके तत्व . कामाचा प्रचंड कंटाळा . खाऊन झोपणे . झोपेतून उठून पुन्हा खाणे . याच साठी तो जन्माला होता ! तो म्हणजे साक्षात आळस ! पण यालाही एक कारण होते . […]

‘ती’ तिच्या सोबतच !

मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय ,म्हणजे लावायला लागला . याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते . असेन दहा बारावर्षाचा ,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन , नेहमीचीच . तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती . […]

मंगळ – एक लघुकथा

नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल. […]

1 95 96 97 98 99 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..