मेरी

अंगावरच्या सगळ्या कपड्या सोबत माझ जानव आणि बोटातली अंगठी पण त्यांनी काढून घेतली . पायघोळ गाऊन सारख काहीतरी अंग झाकायला वस्त्र दिल अन मी ICCU मध्ये दाखल झालो . गाडी मेन गेट मधून येताना ,गेट वरल्या सेक्युरीटी पासून ‘कॉपोरेट स्मायीली ‘ सुरु झाल्या ,त्या थेट डिस्चार्ज मिळे पर्यंत !
रुटीन चेकप साठी आणि काल थोड छातीत जळजळल होतो म्हणून आलो होतो . ब्लड टेस्ट साठी दिल . मेडिसिन च्या डॉक्टरांनी ‘ थोड थांबा ‘ अशी सूचना दिली होती . वेळ होता म्हणून कॉफी घ्यायला गेलो . मला बेंगलोरची कॉफी खूप आवडते . फोन वाजला डॉक्टर बोलावत होते . कॉफी सोडून पळालो .
“डॉ .चंद्रा ECG साठी वाट पहात आहेत ! “मेडिसिनच्या डॉ केडिया म्हणाल्या .
ECG नॉर्मल नव्हता . मुलान पैसे भरले . अन admit झालो . अन्जिओग्रफि झाली . प्लास्टी दुसरे दिवशी झाली . बेड अटेनडट काही नर्स पोरी ‘गुड मोर्निंग ‘ ‘गुड नाईट ‘ गोळ्यांचा डोस देताना किवा IV लावताना म्हणायच्या . चेहऱ्यावर तेच ‘सौजन्य साप्ताहातल ‘ स्माईल ! ‘ झुटाहि सही — पण बर वाटायचं . कधी कधी वाटायचं त्या खूप मना पासून आपली सेवा , देखरेख करतायत . फक्त पगाराच्या चार दिडक्या साठी नाही .
त्यांच्यात एक छोटी (उंचीला ) मेरी होती. गळ्यात नाजूकसा ‘क्रूस ‘ घालायची . एक दिवस मी कॉफी पॉट मागवला होता . मुलगा भेटीला यायचा त्या सुमारास मी कॉफी मागवायचो . मग आम्ही दोघे मिळून कॉफी घ्यायचो . आज तो आलाच नाही . शेजारी मेरी BP घेत होती .
“Merry, If U don’t mind ,shall we have a cup of coffee . pl. join me .”
“Thanks , Baba for the offer . But its against The rules of this HOSPITAL. “माहित नाही अनोळखी लोक मला ‘बाबा ‘ का म्हणतात ! जनरली काका ,नाहीतर आजोबा म्हणून संबोधल जात .
एक दिवस या मेरी न कहर केला . सकाळच्या ब्रेकफाष्ट ला सुरवात करणार होतो . कुठून कोणास ठावूक मेरी घाईत पळत आली . खाण्या सोबत एक मिठाचा ,आणि एक साखरेची छोटस पाकीट यायचं . तिने ती दोन्ही पाकीट घेतली आणि पळून गेली . चरफडत तो बेचव नाष्टा उरकला .
“बाबा , तेरेको BP है और डायबीटीज है ! कायकू ये नमक ,शक्कर खाता ! इसलिये ये लेके मै सुभे भागी ! मेरे पापाको भी BP ,Daibetis था ! सुंता नही था ! तब भी मै ऐसाच करती थी ! अब पापा चला गया God के पास ! ” दुपारी तिने मला सांगितले .
“Sorry Baba!” ती मंद हसत म्हणाली .
मला मुलगी असतीतर तिने असेच केले असते ! माझ्या मनात विचार चमकून गेला .
या चार दिवसातल्या दिवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण ! कारण माझ्या नजरेतला ‘बाप ‘ खोटा नव्हता ,आणि तिचे ते स्माईल’ कॉर्पोरेट ‘ नव्हते .
डिस्चार्ज दिवशी तिला खूप शोधली . नाही भेटली . तिच्यासाठी घेतलेले चोक्लेट FOR MERRYचे छोटे स्टीकर लावून तेथील काऊटर वर ठेवून आलो . God Bless U !!
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच . Bye .

About सुरेश कुलकर्णी 82 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…