कथा
फेस ऑफ
तो आणि ती समोरच्या बिल्डींगमध्ये रहात, माझी फारशी ओळख नाही , परंतु येता जाता फक्त ‘ स्माईल’ किंवा हॅलो. इतकीच ओळख आमची.. परंतु लेखक असल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावण्याची वाईट सवय. खरे छान आयुष्य होते. एक साधी कार , मुलबाळ नाही. लग्नाला बरीच वर्षे झाली असणार. कदाचित पुढ़े संभाळणार कोण? हा प्रश्न असणार. माझे आपले मनातल्या मनात. […]
पेशन्स इज द की.. (‘मी आणि ती ‘)
तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते , मुलगा चांगला होता . पण एक दिवशी स्कुटरचा अपघात झाला आणि तो गेला. फक्त लग्नाची तारीख ठरायची राहिली होती. खरे तर ती मला पण आवडली होती , पण तिची ही अवस्था. मी तिच्या वडिलांना म्हणालो […]
छापा की काटा?
वसंतराव आणि वसुधा हे सत्तरी ओलांडलेलं जोडपं.. वसंतरावांनी चाळीस वर्षे सरकारी नोकरी केली. वसुधानं ‘घर एके घर’ सांभाळलं.. वसंतराव खेड्यातून शहरात आले, शिकले व नोकरीला लागले. नोकरी लागल्यावर घरच्यांनी नात्यातील एका मुलीशी, वसंतरावांचे लग्न लावून दिले. वसुधाचं शिक्षण कमी असल्याने त्यांनी गृहिणीपद व्यवस्थित सांभाळले. उपवास, व्रतवैकल्ये करुनही त्यांना मूलबाळ काही झाले नाही. जुन्या चाळीतच अनेक वर्षे […]
“चोचीतले दाणे”
समीरचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. तो शहरातील एका मोठ्या प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला होता. घरात आई, वडील आणि हे दोघं असं चार जणांचं कुटुंब. त्याच्या पाच वर्षांच्या कामाच्या कौशल्यावर खुष होऊन प्रेसचे मालकांनी त्याला सिनीयर ऑपरेटरची पोस्ट दिली होती. समीर सकाळी नऊ वाजता घरुन निघायचा. दिवसभर उभं राहून काम केल्याने दमून संध्याकाळी सहा वाजता परतायचा. […]
खऱ्या माणसाची पारख (कथा)
कथा – ‘पारख : खऱ्या माणसाची पारख’ ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. लेखक – धनंजय एस. शिंदे
पाॅंचवाॅं मौसम.. (काल्पनिक कथा)
रविवारचा दिवस. संध्याकाळची वेळ. मुकुंदराव आज खूपच दिवसांनी फिरायला बाहेर पडले होते. वृद्धाश्रमाच्या नियमानुसार आठवड्यातून एकदाच, फक्त रविवारी त्यांना बाहेर पडता येत होतं. झब्बा, पायजमा आणि खांद्यावरील शबनम बॅग अशा नेहमीच्या पेहरावात ते बराच वेळ बागेत बसले होते.. घड्याळात सात वाजलेले पाहून ते गडबडीने उठले व चालू लागले. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आठ वाजेपर्यंत शिंदे मॅडमच्या वृद्धाश्रमात […]
आक्करमाशा
ए आक्करमाशा निघ माझ्या घरातून, चालता हो बघु , पुन्हा पाय ठेवलास तर याद राख. सख्ख्या मामाच्या तोंडातून सुद्धा यापूर्वी आजवर कधीही न ऐकलेले शब्द ऐकून रंज्याला खुप वाईट वाटले. त्याचे आजोबा तर त्याला आठवतं तेव्हापासुन आक्करमाशा म्हणूनच हेटाळणीच्या सुरात हाक मारून , त्याला काम सांगायचे. त्याच्या आईशी त्याचा मामा आणि आजोबा कधी बोलल्याचे त्याने बघितलेच […]
