नवीन लेखन...

खारीचा वाटा

मी व्यवसायात उतरण्यात किंवा बेकरी सुरू करण्यात त्याचा अप्रत्यक्ष “सिंहाचा वाटा” असला तरी गेल्या दहा वर्षात या कंपनीची जी भरभराट झाली आहे त्यात मात्र माझ्या मित्राचा “प्रत्यक्षपणे” आणि अगदी “शब्दशः”.. .. “खारीचा वाटा“ आहे .. हाहा ss .. !! ….पौराणिक काळापासून चालत आलेला “खारीचा वाटा“ हा शब्दप्रयोग सगळ्यांनी पूर्वी अनेकदा ऐकलाय .. पण आमच्या सुरेशचा ; आजच्या आधुनिक युगातला हा “खारीचा वाटा“ नक्कीच वेगळा आणि तितकाच समर्पक आहे ना मंडळी ?? […]

एक डल्गोना कॉफी अशीही

चमच्यानी ढवळत ढवळत एकीकडे तो व्यक्त होत होता . आपसूकच “मम” म्हंटल्यासारखा तिचा हात त्याच्या हाताकडे वळला ….. दोघांनीही एकत्र ढवळत….कॉफीच्या दोन्ही थरांची सरमिसळ करत , दोन्ही नात्यांना एकसंध , “एकजीव” केलं होतं …. अगदी नकळतपणे !!! ………दोन्ही नाती एकत्र होत एक नवीन नातं तयार झालं होतं “मैत्रीपूर्ण नवरा-बायकोचं नातं “ […]

सुटका

काही दिवसांनी समोरच्या सोसायटीत एक अ‍ॅम्ब्युलन्स आली .. कोणीतरी दोघे उतरले .. बिल्डिंगमधल्या बाकीच्यानी त्यांच्या त्यांच्या खिडकीतून टाळ्या वाजवल्या .. आनंदानी कसल्याश्या घोषणा दिल्याचे आवाज ऐकू आले. […]

हरवलेला सण

आज नागपंचमीचा सण. श्रावणातील या पहिल्या सणाचं सुनीताला लहाणपणापासूनच मोठं आकर्षण वाटे. […]

आरसा (कथा)

सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा … […]

सेकंड हँड

बंड्या! काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा असा एक साधा भोळा, सामान्य मुलगा … तो तसा व्हायला कारणं देखील होती तशीच. दोन खोल्यांचं घर . कुटुंबं तसं खाऊन पिऊन सुखी असलं तरी परिस्थिती साधारण होती. बंड्याचा भाऊ त्याच्यापेक्षा जेमतेम अडीच वर्षांनी मोठा. त्यामुळे स्वाभाविकपणे लहानपणी बंड्याला दुपटी , टोपडी , खेळणी हे सगळं मोठ्या भावाचंच मिळालं. […]

तिला काय आवडतं?

कॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे! पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस! किती वर्षाची झाली बरं आई? तिला जन्मवर्ष काही आठवेना. विचार करताना एकदम लक्षात आले, आई एकदा म्हणाली होती ‘ तू जन्माला आली तेव्हा मला नुकतंच विसावं वर्ष लागलं होतं.’ […]

पाठलाग

लग्नाचा वाढदिवस संपला. पार्टी आणि पाहुणे हे सोडून ते दोघे आज एकमेकांशी काहीही वेगळं बोलले नव्हते. इतका खास दिवस पण तोही रोजच्यासारखा आला आणि गेला. सईला झोप येईना. ती हॉलमध्ये आली…. मागची सारी वर्षे आज तिच्यापुढे उभी राहिली होती. ती विचार करत किती तरी वेळ बसुन राहिली. […]

संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया

गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं. […]

संधिप्रकाशातील सावल्या – ३ : तुम्ही फक्त लढ म्हणा !

भल्या सकाळी ती रोज यायची . न दमता , न कंटाळता जमिनीवर पडलेली बकुळीची फुलं वेचायची . तिच्याजवळच्या त्या मोठ्या परडीत फुलांचा हा मोठा ढीग व्हायचा . मग इथेच ती झाडाला टेकून फतकल मारून बसायची . आणि गाणं गुणगुणत गजरे गुंफत बसायची . […]

1 63 64 65 66 67 106
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..