नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी – एक अनुभव

सूर्यास्ताची वाट पहात बालीच्या एक निवांत समुद्र किनार्‍यावर मी उभा होतो. सोनेरी प्रकाशात फेसाळी लाटांवर क्रीडा करणाऱ्या गोरंग स्त्री- पुरुषांना पहात समुद्री लाटांचे कधी न ऐकलेले संगीताचा आनंद घेत होतो. अचानक दिसली मला ती, मलयवासिनी, वस्त्रांच्या कोशात दडलेली जलपरीच, ती संकोचलेल्या डोळ्यांनी पहात होती फेसाळी लाटांवर कल्लोळ करणाऱ्या गोर्‍या मत्स्य ललनांना, पण डोळ्यांत दिसत होती तिच्या […]

आईच्या प्रेमाचं समीकरण

एका कॉन्फरन्ससाठी मी दिल्लीला गेलो होतो. दुपारचा वेळ मोकळा होता. मी निवांत बसलो होतो. हातात फाइल्स घेतलेला एक तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला,“सर ओळखलं?” अर्थातच मी ओळखलं नाही. म्हणाला,”चला चहा घेऊ. ”परप्रांतात मराठी माणूस भेटला की बरं वाटतं. “इथे हॉटेलच्या लिस्टवर मराठी माणसांची नावं शोधली. त्यात नेमकं तुमचंच नाव दिसलं. म्हणून म्हंटलं तुम्हाला भेटूया. मी […]

अवघा रंग एकचि झाला

`झांझीबार’ या आफ्रिकेतील एका छोट्याशा देशातील दोन वर्षांच्या वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवांवर श्री अरुण मोकाशी यांनी लिहिलेल्या `झांझीबार डायरी’ या पुस्तकातील एक लेख. […]

झांझीबार डायरी

इ-पुस्तक स्वरुपात फक्त रु.९९/- परदेशातल्या विमानतळावर उतरल्याबरोबर आपण अगदी नकळत तुलना करु लागतो …. आपली आणि त्यांची…. खरंच देश-विदेशातील माणसं हजारो मैलांवर रहात असतांना त्यांचे धर्म वेगळे असतील पण सवयी आणि लकबी सारख्या कशा? का खरंच भगवंताने एकाच पिंपातला बचक बचक “डीएनए” जगातल्या आपल्या सर्व बछड्यांना अगदी सारखा वाटला? जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण […]

बब्बड : प्रेमाची चव

खरं सांगते, कालचा गोड-गोड अनुभव मी माझ्या आडव्या आयुष्यात (अजून मी ‘उभी’ राहात नाही ना,म्हणून म्हंटलं) कधीही विसरणार नाही! क्षणभर, माझा अजुनही विश्वास बसत नाही. पण… मी दोन कानांनी ऐकलं. दोन डोळ्यांनी पाहिलं. आणि एका नाकाने वास घेतला, म्हणून माझा विश्वास बसला! रात्री दूध प्यायल्यावर थोडीशी टंगळमंगळ केली की मी ढाराढूर झोपत असे. मी दूध पीत […]

टोचरे कुटूंबीय

संध्याकाळ झाली. हवेत मस्त गारवा होता आणि घरात छान उबदार वातावरण. तो घरात गादीवर आरामात पडला होता. इतक्यात ती घरात आली. ही नुसती आली नाही तर गुणगुणत आली. हिला सदानकदा गुणगुणण्याची सवय आहे. ही हसत हसत गुणगुणली,“एऽऽ, तुला एक सॉलीड जोक सांगते. हा जोक जगातला सगळ्यात लहानात लहान जोक आहे. फक्त एका वाक्याचा जोक! या जोकची […]

कुकरू

सकाळ झाली. त्याने भराभर आंघोळ केली. दोन वाट्या पाणी प्यायला. थोड्याच वेळात त्याने एक कचकचून शिटी वाजवली. या आवाजाने बाबांची झोप चाळवली. शिटी ऐकून त्याचे इतर मित्र मैत्रिणी गोळा झाल्या. मग त्याला ही चेव चढला. त्याने पुन्हा एकदा शिटी वाजवली! बाकीच्या मित्रांनी पण शिटी वाजवायचा प्रयत्न केला. पण कुणालाच जमलं नाही. त्याने आता जोरात शिटी नाही […]

विंदांच्या १५ व १९ शब्दांच्या बालकविता..

विंदाच्या बालकविता भन्नाटच आहेत. कारण त्या दोन पातळीवर आहेत. जेव्हा त्या कविता मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. या बालकविता मोठ्या माणसांना अधिक प्रगल्भ करतात. मुलांसोबत विंदांच्या बालकविता वाचताना तर मी अनेकवेळा थरार अनुभवला आहे. त्यांची […]

दुर्मीळ खजिना गवसला

लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे.
[…]

मत, विश्वास आणि वास्तव

युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते. ‘त्या दोन जिल्ह्यात’ मी जाण्याआधी युनिसेफने कोट्यवधी रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खर्च केले […]

1 440 441 442 443 444 493
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..