नमस्कार मंडळी. जगातील सर्वात मोठ्या बळीराजाच्या वैकुंठधामात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या देशाच्या महाराष्ट्र नावाच्या राज्यातील हा भाग एकेकाळी विदर्भ व मराठवाडा या नावांनी ओळखला जात असे. पण आता शेतकऱ्यांच्या या स्मशानभूमीला जगभरात प्रसिध्दी मिळाल्यामुळे विदर्भ व मराठवाडा ही नावं इतिहासजमा झाली आहेत आणि हे जगाच्या नकाशावरील एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ झालं आहे. पाचशे एकरात पसरलेल्या […]
नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र दिना’बद्दल काहीतरी लिहावं म्हणून लिहायला बसलो होतो. ह्या दिवसाबद्दल लिहायचं तर महाराष्ट्र, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या विभूती आणि देशरक्षणार्थ वेळोव्ळी धावलेला महाराष्ट्र याचा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो. आणि असा आढावा घेताना पहिलं नांव चटकन मनात येतं आणि बोटातून बेशुद्धतही उतरतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं..! ह्या नांवाला महाराष्ट्रात सोडा, देशातही पर्याय […]
सचिन नावाच्या गारुड्याची मोहिनी आम्हा भारतीयांच्या मनावर निरंतर राहणार आहे. आणखी शंभर वर्षांनी कोणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही की २१ व्या शतकात सचिन रमेश तेंडूलकर नावाचे वादळ भारतीय क्रिकेट विश्वात घोंगावले होते…………कारण शतकातून एखादाच असा शतकवीर सचिन जन्माला येतो. […]
ऍनिव्हिओला… हा शब्द जीए कुलकर्णींचा. त्यांच्या “इस्किलार” या दीर्घ कथेत या शब्दाची ओळख झाली. ही जीएंची खासियत. स्वत:च एखादा शब्द तयार करायाचा आणि त्याला अर्थ द्यायचा. या कथेत असेच सेरीपी, इस्किलर असे शब्द त्यांनी निर्माण केले आणि त्यांना अर्थ दिले. […]
निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण व पौष्टिक आहाराची आवशक्यता असते . तसेच मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार ,अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास. व्यक्तीला वाटणारा आनंद ,दुःख ,भावना आपलं शहाणपण,आपली ताकद,आपला वेडेपणा आणि दुबळेपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात . […]
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याबद्दल एक विशेष आठवण सांगितली!! जरी “सुन्या सुन्या” हे गाणे “उंबरठा” चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबाना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबाना सांगीतले […]
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला; अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ? बघ तुला पुसतोच […]