नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

लिटमस टेस्ट !

आता बालसाहित्याचे आयाम बदलले आहेत! कारण आता मुलांच्या भोवतालचं विश्वच झपाट्याने बदलत आहे. त्यांची ‘जगण्याची भाषा’ ही आता वेगळी आहे! — जागतिकीकरणाचा पहिला परिणाम म्हणजे ‘मूल’ हे मार्केटिंगचा विषय झालं! मुलाला काय पाहिजे ह्याचा सारासार विचार न करता, कुठला माल खपला पाहिजे ह्याचाच विचार करुन त्याचा आकर्षक धबधबा मिडीयाच्या मदतीने ग्रामीण तसेच नागरी भागातून वाहू लागला. […]

उकळता प्रयोग

काल हस्तकलेचा तास होता. वर्गातल्या मुलांनी रंगीबेरंगी जाड कार्डशीटचे कागद आणले होते. मुले म्हणाली आज आम्ही या कागदाचा ट्रे करणार आहोत. तर काही मुले म्हणाली आम्ही कागदाचं छोटसं भांडं करणार आहोत. इतक्यात सिमरन म्हणाली, “या कागदातून तुमच्यासाठी काय करू?” आता बाकीची मुलेपण चिवचिवू लागली. “सर्वांनी मिळून माझ्यासाठी, काडेपेटीच्या आकारापेक्षा थोडसं मोठं असं कागदाचं भांडं तयार करा. […]

गाढवू

उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य उगवला रे उगवला की लगेच गरम व्हायला लागायचं. दुपारची वेळ होती. गाढवाच्या छोट्या मुलाला खूप गरम व्हायला लागलं. उन्हाने पाठ भाजायला लागली. कानातून वाफा येत आहेत असं वाटू लागलं. घसा सुका पडला. जीभ कोरडी झाली. डोळ्यांची आग-आग होऊ लागली. शेपटी तापून-तापून पिळपिळीत झाली. मग त्याने उड्या मारल्या.. लाथा झाडल्या.. झाडाला धरुन दोन […]

मस्तीखोर फुगे

आज वर्गात गेलो तर वर्ग एकदम शांत. माझ्यासाठी हे दृश्य नवीनच होतं. इतक्यात मिहिरने गाल फुगवून रोहनकडे बोट दाखवलं. सिमरनने पण तसंच केलं. तर शिल्पाने तोंड फुगवून प्रियाकडे बोट केलं. मला समजेना हा काय प्रकार आहे? प्रिया आणि रोहनला जवळ बोलावलं. तोंड फुगवून, हाताने खुण करुन विचारलं म्हणजे काय? प्रिया व रोहनने चुपचाप खिशातून फुगे काढून […]

शिक्षणाचे वास्तव आणि शिक्षकाचे मत

युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते. त्या दोन जिल्ह्यात आधी सुरू असणाऱ्या प्रशिक्षणाबाबत चौकशी केली तेव्हा कळलं की ‘शिक्षकांच्या […]

सुटीतले घर आणि घरातली सुटी

सुटीची चाहुल लागू लागली की घरात दोन प्रकारचे वारे वाहू लागतात. एक, अरे बापरे! आता दिवसभर ही घरात असणार. आता यांना बिझी कसं काय ठेवायचं? दोन,व्वॉव! या सुटीत काहीतरी वेगळीच धमाल करुया. यातले ‘पालक वारे’ कुठले व ‘मूल वारे’ कुठले हे तुम्ही ओळखलंच असेल. ‘सुटीत करायचं काय?’ असा प्रश्न अनेक पालकांना पडतो आणि मग मुलाची इच्छा […]

गुळाची ढेप

आई सकाळीच म्हणाली, “चला चला बब्बड,लवकर लवकर आवरा. आज आपल्याला किनई वजन करायला जायचं आहे………………” आई आणखी पण पुढे खूप काही बोलली. पण नेमकी त्याचवेळी कुकरची शिटी इतकी जोरात वाजली, की आईचं बोलणं मला ऐकूच आलं नाही. मला कळेना “वजन करायचं म्हणजे नक्की काय करायचं?” ऑफिसला जाताजाता बाबा धावत-धावत आले आणि म्हणाले,’कशाला हवंय वजन नी भजन? […]

दोन बहिणी

तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच. एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या. सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या. मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि […]

कावळू

जरासं कुठे उजाडलं तर,लगेचच कावळ्याच्या पिल्लाची “कावकाव किवकीव” सुरू झाली.। इकडे तिकडे हुसहुस सुरू झाली. चळवळ वळवळ सुरू झाली. “आईच्या पायाला चोचीने खाजव. नाहीतर घरट्याच्या काड्या चोचीने उपस.” कावळूच्या ह्या कावकावीने आणि असल्या उद्योगाने कावळीण जाम करवादली. कावळीणीने आपली चोच घरट्यांच्या काड्यांवर कराकरा घासली. मान डावीकडे करुन पंखात चोच खुपसली. उजवा पाय वर घेऊन त्यावर पण […]

मी आणि परी

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी […]

1 442 443 444 445 446 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..