राजा राममोहन रॉय हे बंगालमधील एक प्रसिद्ध समाजसुधारक. लहानपणापासून अतिशय चिकित्सक बुद्धीचे असलेले राममोहन रॉय यांनी सर्व प्रकारच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. वेदाचा तसेच इतर हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी तर ते काही काळ काशीलाही (बनारस) जाऊन राहिले होते. सर्व चराचरात व्यापून राहिलेला परमेश्वर एका मूर्तीत कसा असू शकतो याचे समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. त्यामुळे ते मूर्तिपूजाविरोधक […]
विद्वत्तेचा वारसा तिला लहानपणापासूनच मिळाला होता. फ्रेडरिक विज्ञानाचे प्राध्यापक तर आई मारिया चूल ज्योपर्ट शिक्षिका होती. वडिलांना विज्ञानाची फार आवड होती. त्यामुळे निसर्गातील अनेक विज्ञानवादी चमत्कार तिला लहानपणीच पहायला मिळाले. त्यामुळे तिचीही विज्ञानदृष्टी तयार झाली व पुढे ‘ वैज्ञानिक संशोधन’ हेच तिने आपले ध्येय मानले व परमाणू संरचनेबाबत नवा शोध लावून तिने विज्ञानाला नवी दिशा दिली. […]
आई-वडील दोघेही प्रख्यात वैज्ञानिक होते. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू जणू तिला लहानपणापासून मिळाले होते. आई-वडिलांचा तिला सार्थ अभिमान होता. कारण दोघांनाही भौतिकशास्त्रातील संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला होता. तिच्या आईने तर दोनदा नोबेल पुरस्कार मिळवून साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले होते. अशा या थोर संशोधक आई-वडिलांचे नाव होते मेरी क्युरी व पिअरे क्युरी आणि त्यांच्या पोटी जन्म घेऊन स्वतःही […]
‘डॉक्टर, मला माझ्या मुलाकडे परत जायचं नाहीये. इथे तुम्ही जवळ असाल म्हणून या शहरात राहायला आलोय मी’ त्या वयोवृद्ध माणसाच्या मनातली ती खंत दुखावलेल्या अश्रुपूर्ण नजरेतून बाहेर येत होती.. ‘अमेरिकेत असतो माझा मुलगा. फार बिझी असतो तो. तिकडे वैद्यकीय उपचारही अतिशय महाग आहेत. त्याला मदत करायची इच्छा असते, पण नाईलाज असेल त्याचा. त्याला आता काय करणार?’ […]
“गोहत्या बंदी” हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. ‘स्वदेशी आंदोलन’ हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. […]
मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्यांयशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते. आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते. सुरूवातीला मला तिचं या […]
नववर्ष स्वागताच्या या यात्रेला ‘शोभायात्रा’ असं शोभेचं ‘दिखावू’ नांव देऊन उगाच आपली शोभा करून घेऊ नका. या ऐवजी या यात्रेला ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’ असं खणखणीत नांव द्या. […]
श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ’ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा […]