पक्षांचा राजा

वनी नाचतो फुलवून पिसारा पक्षांचा राजा हा शोभतो खरा चोच पिवळी, निळी निळी मान डोक्यावर तुरा शोभतो छान आला आला पाऊस सर सर सर मोर नाचतोय भर भर भर सप्त रंगांची फुलली कमान राजा नाचतोय विसरूनी भान छान छान छान छानच छान — सुधा नांदेडकर

नवे जावई आले

कानी मोबाईल, गालात हसतेय, ताई आमची खुषीत दिसतेय दारापुढे स्कूटर थांबली, ताई धावत बाहेर गेली मिस्टरांची स्वारी आली, ताईसाहेबांची कळी खुलली आई-बाबा स्वागता आले, आजी-आजोबा खुष झाले मी पण पुढे सरसावले, भावोजींच्या कानी लागले जावई आले नवे जावई आले, घर-दार खुष झाले — सुधा नांदेडकर

खारूताई

खारूताई लबाड पाहिलीत का तुम्ही आत्ता होती इथे, लगेच गेली कुठे गोंडेदार शेपटीवाली चालते तुरु तुरु झाडावर चढते सुरु सुरु सुरु पानाआड लपते, लपाछपी खेळते चलाख खारूताई अैटीत बसते मुलांना बघून खुष होते — सुधा नांदेडकर

बालकांसाठी काव्य मेवा

बालकांनी खावा छान छान मेवा वाटावा त्यांना सदा हवा हवा शाब्दिक मेवा बुध्दीचा ठेवा येता-जाता खावा खावा खावा मित्र-मैत्रिणींना द्यावा द्यावा द्यावा — सुधा नांदेडकर

आवळे-जावळे

कवितेचे नाव – आवळे-जावळे ; कवयित्री – श्रीमती सुधा नांदेडकर […]

मेकअप करुन कॉलेजला ताई निघेल

तेव्हा मात्र जरुर ये सल्ला माझा ऐकुन घे वार्‍याला बरोबर घेऊनच ये फजिती होईल ताईची तुला संधी मिळेल भिजवायची वार्‍याने ओढणी उडत जाईल धावपळ ताईची नक्की होईल फटाफट शिंका ताई देईल सरासर फोटो मी काढीन वायदा आपला पक्का यायच नक्की बरं का. — सौ. सुधा नांदेडकर

समृद्धीचे वरदान

प्रभात झाली, सुर्य उगवला वंदू रविराजाला मुखमार्जम अन् स्नान करोनी लागा अभ्यासाला सशक्त होण्या दूध प्यावे चौरस आहार करावा नियमित व्यायाम करत असावे मंत्र हा आचरावा माता-पिता अन् गुरुजन अपुले हिनकर्ते हे जाणावे सेवाभावे नम्रतेने इतरांचे मन राखावे नियमा पालन करील त्याचे तन-मन होईल विशाल समृद्धीचे वरदान तयाला ईश्वर ठेवील खुशाल — सौ. सुधा नांदेडकर

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..