नसलं तरी दाखवता आलं पाहिजे लेव्हलचं सेटींग करता आलं पाहिजे..!! काल केस कापून आलो. आश्चर्य वाटलं ना? डोक्यावर फारसे केस नसताना ते कसे काय कापले बुवा, असंच वाटलं असेल ना तुम्हाला? गंम्मत म्हणजे मलाही याचंच आश्चर्य वाटलं. मी महिन्यातून पाच वेळा केस कापतो. एका वेळेस ८० रुपये लागतात. या हिशोबाने महिन्याचे झाले ४०० रुपये. भरघोस जावळ […]
तरुणांचे मानसिक आरोग्य सांभाळा…. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन ! या वर्षा साठी WHO ने थीम दिलीय ते बदलत्या जगात तरुणांचे मानसिक आरोग्य ….. या जगात शाश्वत फक्त ‘बदल’ आहे. कधी तो खूप हळू असतो तर कधी खूप जोरात. इंटरनेट च्या भन्नाट क्रांती ने हल्ली जग भयंकर वेगाने बदलत आहे. 6 महिन्यांपूर्वी नवल असलेली गोष्ट आजच […]
आयुष्य जगतांना खूप काही “राहिलंच” ही खंत आयुष्यभर राहाते. अगदी लहानपणापासून काहीतरी राहून गेलेलं असतं. कुणाचं गोट्या खेळायचं राहिलेलं असतं तर कुणाचं गिल्ली दांडू खेळायचं, कुणाचं शाळेला दांडी मारायचं राहिलेलं असतं तर कुणाचं वादविवाद स्पर्धेत भाग घेण्याचं. शाळा सोडून कॉलेज ला गेल्यावर सुद्धा काहीतरी राहिलेलं असतं. कुणाचं कॉलेज कट्ट्यावर बसायचं राहिलेलं असतं तर कुणाचं प्रेमात पडायचं […]
त्या दुकानातील नौकर दुकानाची सायकल ढकलत आणत होता. मालकाने विचारलं तर म्हणाला, सायकल पपंचर (puncture) आहे. मालकाने गल्ल्यातून 10 रुपये काढून दिले, 1 तासाने तोच नौकर, तीच सायकल, तशीच ढकलत आणत होता. पुन्हा मालकाने विचारलं, तर उत्तर मिळालं, दोन पपंचर होते, 10 रुपयांत 1 पपंचर काढतात, माझ्या कडे 10च होते म्हणून एकाच काढून आणलं.. नौकाराचे नाव […]
अशी कितीतरी अदृश्य बंधनं आपल्या अवती-भोवती तयार झालेली असतात ती तोडु म्हणताही आपल्याला तोडता येत नाहीत. कडक लाकुड पोखरुन काढणारा भुंगा कमलदलाच्या पाकळ्यांच्या बंधनात स्वत:ला कोंडुन घेतो. काही बंधनं अशीच असतात, जी आपल्याला तोडवत नाहीतच मुळी. […]
‘कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम’ सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घ्यायला फार पूर्वीपासून सांगितले जाते. हातांचे दर्शन घेतल्यानंतर वरील श्लोक म्हटला पाहिजे. त्याचा अर्थ सोपा आहे, साधा आहे. श्लोक म्हणतानाच तो लक्षातही येतो. जसे आपल्या हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि ईश्वराचा वास आहे. त्यामुळे हातांचे दर्शन सकाळी उठल्यावर पहिल्यांदा घेतले पाहिजे. […]
रोजची पहाट या प्रसिद्ध दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट, श्री सूर्याजीराव रवीसांडे आपल्या दाढीचे खुंट खाजवत अत्यंत खिन्न मुद्रेने बसले होते. दर आठवड्याला एक विशेषांक ही रोजची पहाट ची खासियत आणि त्यातूनही गुढीपाडव्याचा विशेषांक हा तर खूप मानाचा. […]
एक ना अनेक भावना चंद्राशी जोडल्या जातात. जसे चंद्र उगवल्यावर ईद साजरी होते, तर चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. चंद्र तोच असतो, त्याच्याशी जोडली जाणारी नाती मात्र निरनिराळी असतात. बाल्कनीतल्या खिडकीतून डोकावणारा चंद्र वेगळा असतो आणि झोपडीच्या फाटक्या कपड्यांतून दिसणारा चंद्र निराळा भासतो. कधी तर भाकरीतही चंद्र शोधला जातो. चाळणीतून चंद्र पाहिला जातो. […]
पंचतत्व. अग्नि, वायू, पाणी, पृथ्वी, तेज ही तत्व मिळून पंचतत्व तयार होतं. मानवी शरीर देखील याच तत्वांनी बनलेलं. शरीर याच पंचतत्वाच विलीन होऊन जातं. शरीर विलीन होतं म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या रुपात पुन्हा मागे उरतं. कशात तरी समावून जातं. काही तरी बनून जातं. याचाच अर्थ असाच ना की आपण सारे एकमेकांपासुन तयार झालेलो आहोत. […]
लंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक. येथून आम्ही निघालो ते बेल्जियम ची राजधानी ,ब्रुसेल्स च्या दिशेने. तोही आरामदायी बसने.आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत. युरोपातील देश आकाराने आणि लोक संख्येने […]