मराठी माणसाने अशा कितीही शहरांमधे झेंडे गाडले असले तरी मराठी माणसासाठी पुणे म्हणजे पुणेच. त्या एम एच बारा अशा पाट्या दिसल्या की मराठी माणसाचा उर कसा भरुन येतो. मराठी माणूस हा कधीतरी पुण्यात येउन गेलेला असतो किंवा त्याचे कुणीतरी पुण्यात येउन गेलेले असते. पुण्यात आला म्हणजे मित्रांमधे छापायला एखादा अनुभव हा आलाच. […]
फ्रान्समधील पॅरिस आणि इटलीतील रोम ही दोन शहरे अप्रतिम अशी कलेचे माहेरघरं आहेत हे मात्र नाकारता येणार नाहीच.दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय इतिहासाची पार्श्वभूमी आहे.पॅरिस शहराला म्युझियम्सचे शहर म्हणतात असा मी पूर्वी उल्लेख केलेला आहेच. राजेशाही अस्तित्वात असणाऱ्या फ्रान्समधील, राजे मात्र कलेचे भोक्ते होते. त्यांना कलेची उत्तम जाण होती आणि ते कलेचा सन्मानही करत असत. उत्कृष्ट […]
आपल्या धर्मातील अनिष्ट गोष्टींना आपणच मूठमाती द्यायची असते.सुधारणा प्रथम स्वतः पासून आणि आपल्या कुटुंबां पासून करायची असते.याचीच जाणीव झाल्यामुळे कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी १९६२ साली ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. स्वदेशात विचारप्रबोधन व्हावे, कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे हा प्रबोधिनीच्या कार्याचा हेतू आहे. […]
दैनिक रोजची पहाट चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट चे मुख्य वार्ताहर. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असा अवलिया. यांच्या मुलाखती घेण्याच्याकौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि रोजची पहाट दाखवणारा रवी यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव ताकसांडे, […]
बंडयाने परवा मला एक शालेय संवाद दाखवला. मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात हे त्याला आई सांगत असते असा एकूण मजेशीर विषय होता. एकूण विषय देतानाच कर्ता, कर्म आणि क्रियापद वापरून जे काही तयार होते ते खरे असते का, हे तपासण्याची शाळेला गरज वाटली नसावी. असो, तर आपण शालेय संवादाकडे वळू. […]
खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल. […]
चौघांच कुटुंब हाँटेलमधे प्रवेश करताच आपल्या ओळखीच कोणी नाही न किंवा आहे का हे कनफर्म करत एसी किंवा फँनच्या टप्प्यात, खिडकीपासुन जवळ, कोपर्यातली जागा पटकवण्याचा प्रयत्न करते. कुटुंबाची इतरांकडे पाठ पण आपल्यासाठी टेहेळणी बुरुजावरुन हाँटेलमधील उपस्थित व प्रवेश द्वारातुन येणार्या जाणार्या सौंदर्य स्थळांची नोंद घेता येइल अशी बैठक कुटुंबप्रमुख आदर्श मानतो आणि साकारतो. […]
काही काही माणसं स्वत:वर इतकं अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणं जमतच नाही. त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात त्यामुळे अशी माणसं दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! अनेकदा त्यांच्या विक्षिप्त वागण्याने ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. गमंत म्हणजे त्यांच्यावर मना पासून प्रेम […]
प्रसन्न, उत्साही आणि सकारात्मक उर्जेची अनुभूती वातावरणात जाणवते कारण नवरात्रीस आरंभ झाला. आई अंबेच्या अनन्या रूपांना घरारात पुजल जातं कारण ती जगतजननी, विश्वनिर्माती आहे, आदिशक्ती आहे. ज्या आई अंबेचरणी आपण नतमस्तक होतो त्या आदिमायेची अनुभूती ही प्रत्येक घरात आहे ही वस्तुस्थिती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सुध्दा ऊर्जेचा प्रथम स्त्रोत ” स्त्री” आहे. स्त्री हीच आदिशक्ती, यथाशक्ती आहे. […]