About दिनेश रामप्रसाद दीक्षित
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

चर्चेच गुऱ्हाळ

सकाळची वेळ होती, गार वारं सुटलं होत. कॉलनीला झोपेतून पूर्ण जाग आलेली नव्हती. दाराशी उभे राहून इकडे तिकडे पाहत असतानाच पेपरवाला आला. नमस्कार केल्यानंतर थोडा वेळ तो थांबला, म्हणाला, ‘तीन नंबरच्या घरातल्या साहेबांनी दोन महिन्यापासून बिल दिलेलं नाही, काय करावं’ असं सांगून त्याने बोलायला सुरवात केली. पाच-दहा मिनिटे तो गप्पा मारत होता. थकलेल्या बिलापासुन सुरवात होऊन […]

बंधन…

अशी कितीतरी अदृश्य बंधनं आपल्या अवती-भोवती तयार झालेली असतात ती तोडु म्हणताही आपल्याला तोडता येत नाहीत. कडक लाकुड पोखरुन काढणारा भुंगा कमलदलाच्या पाकळ्यांच्या बंधनात स्वत:ला कोंडुन घेतो. काही बंधनं अशीच असतात, जी आपल्याला तोडवत नाहीतच मुळी. […]

हातात हात…

‘कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम’ सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घ्यायला फार पूर्वीपासून सांगितले जाते. हातांचे दर्शन घेतल्यानंतर वरील श्लोक म्हटला पाहिजे. त्याचा अर्थ सोपा आहे, साधा आहे. श्लोक म्हणतानाच तो लक्षातही येतो. जसे आपल्या हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि ईश्वराचा वास आहे. त्यामुळे हातांचे दर्शन सकाळी उठल्यावर पहिल्यांदा घेतले पाहिजे. […]

माझा चंद्र…

एक ना अनेक भावना चंद्राशी जोडल्या जातात. जसे चंद्र उगवल्यावर ईद साजरी होते, तर चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. चंद्र तोच असतो, त्याच्याशी जोडली जाणारी नाती मात्र निरनिराळी असतात. बाल्कनीतल्या खिडकीतून डोकावणारा चंद्र वेगळा असतो आणि झोपडीच्या फाटक्या कपड्यांतून दिसणारा चंद्र निराळा भासतो. कधी तर भाकरीतही चंद्र शोधला जातो. चाळणीतून चंद्र पाहिला जातो. […]

आपण सारे एक झालो…

पंचतत्व. अग्नि, वायू, पाणी, पृथ्वी, तेज ही तत्व मिळून पंचतत्व तयार होतं. मानवी शरीर देखील याच तत्वांनी बनलेलं. शरीर याच पंचतत्वाच विलीन होऊन जातं. शरीर विलीन होतं म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या रुपात पुन्हा मागे उरतं. कशात तरी समावून जातं. काही तरी बनून जातं. याचाच अर्थ असाच ना की आपण सारे एकमेकांपासुन तयार झालेलो आहोत. […]

बंदोबस्तातलं स्वातंत्र्य..

या देशाचा प्रत्येक माणुस, प्रत्येक नागरिक हा सैनिक झाला पाहिजे. सैनिक जसा देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालुन उभा असतो, तसे नागरिकांनी देखील डोळ्यात तेल घालुन जागे असले पाहिजे. तेव्हा कुठे बंदोबस्तातले हे स्वातंत्र्य मोकळा श्वास घेऊ शकेल… नाही का… […]

Whatsapp वर संपर्क साधा..