जहाँ चार यार मिल जाए
मित्र म्हणजे ज्यांच्यासमोर रोजचे मुखवटे काही क्षण काढून ठेवता येतात अशी जमात ! हरिभाईच्या चार भिंतींमधील संस्कृतीने ज्यांना आजही बांधून ठेवले आहे असे हे सारेजण ! […]
मित्र म्हणजे ज्यांच्यासमोर रोजचे मुखवटे काही क्षण काढून ठेवता येतात अशी जमात ! हरिभाईच्या चार भिंतींमधील संस्कृतीने ज्यांना आजही बांधून ठेवले आहे असे हे सारेजण ! […]
१९५०च्या आधीची अंधेरी ही तडीपार लोकांचे गांव, म्हणजेच मुंबईत यायला बंदी केलेल्यांच गांव.छोटे रस्ते, मिणमिणते दिवे किंवा दिव्यांचा अभाव यामुळे आपलं अंधेरी नाव सार्थ करणारी.आमच्या मालकाच्या दोन मजली बंगल्याच नांव होतं “नीळकंठ कॉटेज”.खरं तर मागचं आउटहाऊस, जिथे आम्ही रहात होतो, तेच फक्त कॉटेज म्हणण्यासारखं होतं. […]
सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा. […]
अंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला “हिरवळ” हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले. […]
वेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू. […]
…. आज हे आठवायचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नी,श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली “कावेरी “पाहिली टीव्ही वर “नटसम्राट “मध्ये ! आजही भरून पावलो. […]
नरेनची पहिली जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याचा उत्साह. नरेनने ट्रेनिंगमधेही उत्साहाने रस घेतला आणि ट्रेनिंग दरम्यान होणा-या इतर कार्यक्रमांत सुध्दा. कोणताही बेत करा हा पुढे असायचा. क्लासमधे अगदी पहिल्या बाकावर नरेन बसायचा. मी मात्र अगदी शेवटच्या बाकावर बसायचो. दादा साळवी, शरद लिखिते आणि मी. तिघे तिथे बसत असूं. नरेन प्रत्येक लेक्चरमध्ये इंटरेस्ट घेत असे. तर आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरच्या फॕकल्टीला मान देत असू. […]
आप्पा महाशब्दे यांच्या बोटांना लाभलेले वरदान केवळ बोर्डाच्या अक्षरांपाशीच घोटाळत राहिले नाही. तर कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या विविध अंगांनी ते बहरून आले. विविध संस्थांच्या अनेकविध कार्यक्रमांसाठी गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे. आतापर्यंत अशी हजारो स्मृतिचिन्हे त्यांच्या हातून बनली आहेत. याशिवाय बॅनर्स, बॅचेस, साइन बोर्ड्स, मानपत्रे अशा कितीतरी बाबीत आप्पांची मुशाफिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. […]
कोकणी माणूस दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते.चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो.माती लाल,रस्ते लाल,पाणदी लाल, चिर्याची घरे लाल, कौले सुद्धा लाल,झाडांची पाने आपला मुळचा रंग दडवून लाल झालेली असतात. […]
ज्योतिष, पत्रिका, ग्रह ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत असं तर्काधारे कितीही समजवून दिलं तरी माणसाच्या मनांत भविष्यात काय घडणार याचं कुतूहल असतचं. त्याचा गैरफायदा घेतला जातो.पण कांही कांहीच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की खरंच असं कांही नसेल? […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions