नवीन लेखन...

संस्कार

अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत. त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!! संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात […]

मोबाईलचा पहिला काॅल

दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासातील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा! त्या पहिल्या मोबाईलचे नाव होतं ‘डायनाटेक’. एक किलोहून त्याचं वजन जरा जास्तच होतं. त्याची लांबी १३ सें.मी. व रुंदी ५ सें.मी. होती. तो चार्ज होण्यासाठी तब्बल दहा तास लागायचे. पूर्ण चार्ज झाल्यावर तो फक्त अर्धा तास वापरता यायचा. […]

जादूचे प्रयोग! (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ८)

विश्वसनीय असे बघणे प्रेक्षकाला आवडते. जादुई कला मनोरंजक होण्यामागे हे एक कारण आहे. जादूगार,मुलांना प्रचंड आवडतो. कारण,तो मुलांना फसवतो.त्यांची फजिती करताना त्यांना हसावतो.आणि हसवता हसवता त्यांना जादुई खेळात सहज सामील करून घेतो. Birthday पार्टीत म्हणूनच जादूगारांना प्रचंड मागणी असते. मुले जादूगार भोवती लोह चुंबकाप्रमाणे गोळा होतात. त्याच्या जादूच्या प्रयोगात,जादुई खेळात, आनंदाने सामील होतात. […]

आम्ही जातो ‘अमुच्या’ गावा

श्रीकांत मोघे यांचा १९६१ साली प्रदर्शित झालेला ‘प्रपंच’ हा चित्रपट मी गणपतीच्या दिवसांत खजिना विहीर चौकात पाहिलेला आहे. मधुकर पाठक यांचं दिग्दर्शन, गदिमांनी लिहिलेली गीतं, सुधीर फडके यांचं अप्रतिम संगीत असलेला चित्रपट मी कधीही विसरू शकत नाही. […]

आडदांड, धटिंग पण- “आपला माणूस !”

विजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा. […]

निळ्या डोळ्यांचा जादूगार !

राजच्या चित्रपटात प्रत्येक कलावंत किती वेगळा आणि खराखुरा,ताजा वाटतो. स्वतःचे कलारंग अस्सलपणे उधळताना जाणवतो. ही राजची छाप त्यांच्यातून उणीच करता येत नाही. तोच कलाकार इतर चित्रपटांमधून फिका,निस्तेज वाटतो. प्रत्येकाचं आतलं सर्वस्व काढून घेऊन त्याने कलाकारांचे शिल्प सजीव केले. त्याच्या परिसस्पर्शाची झळाळी लेऊन कितीतरी कलादेह इथे चिरंतन होऊन गेलेत. […]

शिवाजी ‘दी बाॅस’

जॅकी चेन या आशिया खंडात चित्रपटाचे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यानंतर रजनीकांतचा दुसरा नंबर लागतो. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी दी बाॅस’ या चित्रपटासाठी त्याने सर्वाधिक म्हणजे २६ कोटी रुपये मानधन घेतले होते. गेली पंचेचाळीस वर्षे सलग चित्रपट सृष्टीमध्ये टिकून राहणे हे रजनीकांतच करु जाणे. […]

‘मराठी भाषेचा नाट्यप्रवास’ – रायपूर !

मार्च २३- माझे रायपूरला “मराठी भाषेचा नाटयप्रवास ” या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते – महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे. […]

‘राजा’ चित्रपंढरीचा

१९५२ सालातील ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांनी स्वतंत्र दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. एकूण २५ वर्षांच्या कालावधीत २५ चित्रपट केले. त्यातील २२ मराठी, २ हिंदी व १ इंग्रजी. मराठी चित्रपटांसाठी मराठी साहित्यातील नामवंत लेखकांच्या कथांना प्राधान्य दिलं. […]

बालनाट्य प्रकार आणि बालनाट्यांची विविधता (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ७)

बालनाट्य ही जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. जे मुलांमध्ये खेळू शकणार मिसळू शकतात, मुलांची समरस होऊ शकतात अशा मोठ्यांनीच या क्षेत्रात यावे. पैसा देणारे साधन म्हणून जे बालनाट्य क्षेत्राकडे बघतील त्यांची निराशा होण्याची शक्यताच जास्त आहे. बालनाट्य ही आजही एक चळवळ आहे उद्याही राहील असा मला विश्वास आहे. […]

1 93 94 95 96 97 286
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..