छत्रपती शिवराय : बाजी – पावनखिंडीतला ढाण्या वाघ
शाहीर पहिला : ( प्रास्ताविक ) : पन्हाळ्याहुनी शिवबाराजे पळत विशाळगडीं अंधारातुन सोबत करती मर्द मावळेगडी दुश्मनास चकवून धावती चिखला तुडवत पायीं सुखरुप राजांना न्यायाची या वाघांना घाई पहाट होतां दिसे पायथा, मागुन दुश्मन धावे ‘आतां कैसें पुढला वेढा फोडुन वरती जावें ?’ बोलत बाजी, ”थांबूं आम्ही, खिंडिस लढवत राहूं निजदेहांचे बांध बनवुनी दुश्मन अडवत राहूं […]
