नवीन लेखन...

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करावी लागणे हे भारतीयांचे दुर्दैव

स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत.

दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला.. अगदी महाराष्ट्रात १०५ हुतात्म्यांचा संहार करणार्‍या मोरारजी देसाईसारख्या माणसाला भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही.

राहूल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांची पलटण यांनी कधीतरी सावरकर काय होते त्याचा अभ्यास केला आहे का? सावरकरांनी ज्या नरकयातना भोगल्या त्या भोगायची कल्पना तरी राहूल गांधी करु शकतात का?

अगदी परवाचेच साधे उदाहरण. राहुल गांधींनी मोठा गाजावाजा करुन मुंबईच्या डम्पींग ग्राऊंडचा दौरा आखला. डम्पींग ग्राऊंडवरच्या दुर्गंधीने त्रासून त्यांनी अक्षरश: पाच मिनिटात त्या ठिकाणाहून पळ काढला. असे हे आमच्या देशाचे “युवराज”. सावरकरांनी अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये उमेदीची वर्षे काढली तिथे आमचे आजचे नेते दोन दिवस तरी राहून दाखवतील का?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी अनेकदा सरकारकडे केली गेली. मात्र राजकीय कारणांसाठी कॉंग्रेस सरकारने त्याचा कधीच विचार केला नाही. भाजप सरकार प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली खरेतर पंतप्रधानांच्या शिफारसीनंतर भारतरत्न किताब देण्यात कोणतीही इतर औपचारिक शिफारस आवश्यक नसते. त्यामुळे यावर्षी तरी सावरकरांना भारतरत्न मिळतोय का ते बघायचे.

— मराठीसृष्टी टिम

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

1 Comment on स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करावी लागणे हे भारतीयांचे दुर्दैव

  1. नमस्कार, श्री. प्रधान.
    – सावरकरांबद्दलचा तळमळीचा लेख ! धन्यवाद.
    – माधव गोडबोले यांच्या ‘The God who failed’ या पं. नेहरूंवरील पुस्तकात इतर अनेक मातब्बरांचा हवाला दिलेला आहे, आणि शक्यतो निष्पक्ष विष्लेषण केलेलें आहे. गोडबोले म्हणतात की नेहरूंचा सेक्युलरिझम हा मायनॉरिटीज् कडे (मुस्लिमांकडे) झुकणारा होता. ( सरदार पटेलांचा , बॅलन्स्ड होता). साहजिकच, १७ वर्षांच्या पंडित नेहरू राजवटीत त्याचाच प्रसार झाला. सरदार पटेलही त्याचा प्रतिवाद करायला राहिलेले नव्हते. हिंदुत्ववादी काँग्रेसमन पुरुषोत्तनदास टंडन काँग्रेस प्रेसिडेंट म्हणुन निवडून आल्यावर नेहरूंनी त्यांच्या विरुद्ध रान उठवले , त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले, व स्वत:च काँग्रस प्रेसिडेंट बनले. ( गांधीजींनी सुभाष बोसांना कसें काँग्रेस प्रेसिडेंटशिप चा राजीनामा द्यायला भाग पाडले होतें, या गोष्टीची इथें नक्कीच आठवण येईल).
    – साहजिकच पंडित नेहरूंनंतर कांग्रेसवाल्यांनी तीच ‘री’ ओढली, यात आश्चर्य तें काय ? सावरकरांचा फोटो पार्लमेंटमधे लावायलासुद्धा भाजपची राजवट यावी लागली. काँग्रेसवाल्यांनी तेव्हांही बॉयकॉट् फंक्शनला केलें होतें, व आजही करतात.
    – मणीशंकर अय्यर यांनी अंदमानला सावरकरांचें काव्य हटवलें, याच्या पाठीमागले कारण , ते काँग्रेसमन आहेत, एवढेच केवळ नव्हे, तर ते भूतकालीन कम्युनिस्ट आहेत, हेंही आहे. ‘निधर्मी’ असल्यामुळे कम्युनिस्ट हिंदुत्ववादी सावरकरांचा द्वेष करीत, व करतात अजूनही. आतां त्यांचा प्रभाव उरला नाहीं, ही ( या प्रस्तावाच्या दृष्टीनें ) चांगली गोष्ट आहे.
    – माझें एक सजेशन आहे : तुम्ही change.org या वेबसाइटवर सरकारला उद्देशून हा प्रस्ताच टाकावा आणि सिग्नेचर कँपेन घ्यावा. नंतर हें प्रपोजल दिल्ली सरकारातील मंत्र्याला सबमिट् करतां येईल. अशा शेकडो-हजारो सह्यांमुळे सरकारचेही हात बळकट होतील, व त्यांना सावरकरांसाठी भारतरत्न देणें सोपेरं जाईल.
    – ही गोष्ट शक्यतो लवकर व्हायला हवी. आजचें सरकार सहानुभूतिपूर्ण आहे. २०१९ नंतरचें कुणी सांगावें ?
    – Change.org च्या कंपेनमध्ये मीही सही करीनच, हें सांगणें नकोच.
    – तसेंच Facebook वगैरे सोशल मीडियांवरही हा प्रस्ताच ठेवतां येईल.
    स्नेहादरपूर्वक,
    सुभाष स. नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..