नवीन लेखन...

‘लता’

खचाखच भरलेल्या लोकल मधे.. घुसमटलेल्या श्वासात व घामेजल्या अंगानी उभे, प्रवास नामक नरकवास सहन करत असतो आम्ही तेंव्हा अनाहुतपणे वाजतो कोणा अगांतुकाचा फोन अन त्या गर्दीला चिरत आमच्यापर्यंत येतो तुझा स्वर “ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे.. तुमरे बिन हमरा कौनो नाही..” चेह-यावर त्या स्थितीतही एक अस्फुट स्मित येते..
शेजारचा दाढीवालाही ओळख नसताना हसतो..
पुढचा प्रवास सुखकर होतो.. […]

” मधल्या सुट्टीतील डबा “

मागे वळून बघण्याच्या वयात आल्यानंतर सगळ्यांनाच स्नेहमेळाव्याची/बालपण भेटण्याची ओढ लागते. आम्ही त्याला अपवाद नाही. माझ्याकडे भेटीचे असे तीन पर्याय आहेत- भुसावळचे शाळूसोबती, सोलापूर हदे चे मित्र आणि सांगलीच्या वालचंदचे स्नेहगडी ! संधी मिळेल तशी मी प्रत्येक पाणवठ्यावर हजेरी लावत असतो. […]

‘कवितेचे झाड’

शब्दांचे पक्षी येऊन बसतात भावनांनी लदबदलेल्या वाक्यांच्या फांदीवर तेंव्हा सुरु झालेला असतो. कवितेचा किलबिलाट पानांपानांच्या आडून…मुळासहित सगळ्या झाडाचे कान अधिर होऊन जातील काही क्षणातंच..स्तब्ध होऊन आकाश ही विसावेल क्षणभर ढगांसहित…हळूहळू..उतरत जाईल कविता कागदावर..मेघातून झिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे.. कोंब फुटतील शब्दांना मनाच्या मऊ-मऊ मातीत खोल..वर येण्यासाठी संघर्ष होईल मातीशी.अंगातले सारे बळ एकवठून वाट काढत शिरावे लागेल मातीच्या […]

भय अजून संपत नाही

आता हे सगळे प्रश्न भिती पोटीच निर्माण झाले असतील. ऑनलाईन शिक्षण चालू होते तेव्हा या गोष्टींना मुकलेले विद्यार्थी असेच विचार करत असतील असे मला वाटते. घरातील एका ठिकाणी बसून मोबाईल वर बसून शिकणे. थोडा वेळ झाला की काही तरी खाणे. थोडे उशिरा उठणे. घरातील लोकांबरोबर जेवणे. अभ्यास करणे. लिहिणे. आणि बऱ्याच गोष्टी करतांना काही तरी सांगायच होत त्याला पण तो बोलत नव्हता. […]

जुनागढचा लघुचित्रकार

नसीर नेहेमीच शब्दांच्या पलीकडे असतो. “फिराक”, ” द वेन्सडे “, ” चायना गेट” आणि अगदी अलीकडचा – अवेळी पावसासारख्या मागील वर्षी निघून गेलेल्या “फिर जिंदगी” वाल्या सुमित्रा भावेंच्या लघुपटात! […]

नवलभूमीचा यक्ष… नरेंद्र बल्लाळ

खरं म्हणजे ते अभिनयाच्या क्षेत्रात आले असते तर त्यांनी धमाल उडवली असती. सावळाच पण देखणा चेहरा, गांभीर्य आणि स्मितहास्य याचं त्या चेहऱ्यावर विलसणारं मिस्कील अजब मिश्रण, संपूर्ण व्यक्तिमत्त्वात असलेली ऋजु उत्कटता आणि ती पेलण्याचं सामर्थ्य असलेला आंतरिक कणखरपणा. […]

वाक्यात उपयोग

बाहेरच्या जगात मराठीदिन कसा साजरा झाला हे मला माहित नाही पण माझ्या घरात तो खऱ्या अर्थाने साजरा झाला आहे त्यातून खात्री आहे की लवकरच पुढील पिढी माय मराठीला नक्कीच विसरणार नाहीत. इंग्रजी शिकणे गरजेचे आहे म्हणून मातृभाषा विसरुन चालणार नाही. […]

ती पाहताच बाला

‘लग्नाची बेडी’ या नाटकातील पद्मा चव्हाण यांची ‘रश्मी’ ज्यांनी पाहिली ते खरंच भाग्यवान!! ‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला..’ या काव्यपंक्तीनुसार त्यांच्या प्रवेशाला प्रेक्षकांचा ‘कलिजा’ शब्दशः खलास होत असे.. म्हणूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राची ‘मर्लीन मन्रो’ व ‘सौंदर्याचा ॲ‍टमबाॅम्ब’ ही उपाधी दिली होती..
[…]

काळ्या मातीचा कॅनव्हास

‘बनगरवाडी’ वाचल्यानंतर मला यावर चित्रपट व्हायलाच हवा, असं मनापासून वाटत होतं. व्ही. शांताराम यांनी या कादंबरीवर चित्रपट करण्याचे ठरविले होते, मात्र प्रत्यक्षात घडले नाही. अमोल पालेकर यांनी मात्र माझं हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलं.. चित्रपट निर्मिती अप्रतिम झाली. चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले. […]

मराठमोळ्या फार्सचे जनक: श्याम फडके

त्यांच्या फार्सचे त्या काळी व्यावसायिक रंगभूमीवर खूप प्रयोग झाले आणि हौशी रंगभूमीवर त्याहीपेक्षा कितीतरी जास्त प्रयोग झाले. हौशी नटमंडळींना सुद्धा त्यांच्या सुटसुटीत फार्सचे असंख्य प्रयोग करावेसे वाटले. महाराष्ट्रातल्या छोट्या-छोट्या गावात आणि उत्सवात गल्लीबोळातही श्याम फडक्यांची नाटके होत होती. […]

1 74 75 76 77 78 283
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..