नवीन लेखन...

सोलापूर फाइल्स – श्रवणानंदाच्या नोंदी !

एकुणातच साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आजकाल जिकिरीचे झालंय. त्यातून फारसे काही हाती लागत नाही,हेही एक प्रमुख कारण असावे. पण काही योग कोणीतरी आपल्या वाटेवर आणून ठेवले असतात आणि आपण ते जगायचे असतात. […]

दूर न पोहोचलेले सूर (आठवणींची मिसळ – भाग ८)

आईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला. […]

उगाच काहीतरी – १

काल बऱ्याच वर्षांनी शाळेतला मित्र भेटला. फॉर्मालिटी प्रमाणे जुन्या गोष्टी, आठवणी झाल्या. बऱ्याच गप्पा झाल्या. त्याला विचारलं ” काय करतोस आजकाल?” ” आय हॅव क्वाईट ए फिव व्हेंचर्स ऑफ माय ओन” ” हं..ग्रेट. म्हणजे एंटरप्रेन्युर झालायेस एकुण. ” – मला कौतुक वाटलं. “आंत्रप्रन्योर…आंत्रप्रन्योर” ” ते शरद तांदळे यांचं पुस्तक ना. त्याची पण एजन्सी आहे का तुझी. […]

जहाँ चार यार मिल जाए

मित्र म्हणजे ज्यांच्यासमोर रोजचे मुखवटे काही क्षण काढून ठेवता येतात अशी जमात ! हरिभाईच्या चार भिंतींमधील संस्कृतीने ज्यांना आजही बांधून ठेवले आहे असे हे सारेजण ! […]

१९५०च्या आधीची अंधेरी (आठवणींची मिसळ – भाग ७)

१९५०च्या आधीची अंधेरी ही तडीपार लोकांचे गांव, म्हणजेच मुंबईत यायला बंदी केलेल्यांच गांव.छोटे रस्ते, मिणमिणते दिवे किंवा दिव्यांचा अभाव यामुळे आपलं अंधेरी नाव सार्थ करणारी.आमच्या मालकाच्या दोन मजली बंगल्याच नांव होतं “नीळकंठ कॉटेज”.खरं तर मागचं आउटहाऊस, जिथे आम्ही रहात होतो, तेच फक्त कॉटेज म्हणण्यासारखं होतं. […]

ठाण्याचे अभिनेते

सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा. […]

माझा लेखन प्रवास (आठवणींची मिसळ – भाग ६)

अंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला “हिरवळ” हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले. […]

ज्ञानदेवाचे भिंताड (आठवणींची मिसळ – भाग ५)

वेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू. […]

नटसम्राट- नटसम्राज्ञी

…. आज हे आठवायचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नी,श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली “कावेरी “पाहिली टीव्ही वर “नटसम्राट “मध्ये ! आजही भरून पावलो. […]

नरेंद्र शांताराम चित्रे (आठवणींची मिसळ ४)

नरेनची पहिली जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याचा उत्साह. नरेनने ट्रेनिंगमधेही उत्साहाने रस घेतला आणि ट्रेनिंग दरम्यान होणा-या इतर कार्यक्रमांत सुध्दा. कोणताही बेत करा हा पुढे असायचा. क्लासमधे अगदी पहिल्या बाकावर नरेन बसायचा. मी मात्र अगदी शेवटच्या बाकावर बसायचो. दादा साळवी, शरद लिखिते आणि मी. तिघे तिथे बसत असूं. नरेन प्रत्येक लेक्चरमध्ये इंटरेस्ट घेत असे. तर आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरच्या फॕकल्टीला मान देत असू. […]

1 73 74 75 76 77 284
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..