नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

व्ही – सॅट

सूर्यदेवाचा खेळ संपल्यावर आता चंद्रदेवाने खेळ सुरु केला, चांदण्या लुकलुकायला लागल्या. ट्रेनी सिमनला म्हटलं आता चंद्रप्रकाश कसा दुधाळ दिसतोय पण तो कसल्यातरी विचारात दिसला, तरीपण तो म्हणाला दुधाळ चंद्रप्रकाश पाहिला की तिचा मधाळ चेहरा आठवतो. वाऱ्याची झुळूक आली की तिचे भुरभुरणारे केस आठवतात. जलतरंग जहाजावर येऊन आदळतात तितक्याच मंजुळ स्वरात तिच्या बांगड्या वाजल्याचे आठवतं. त्याला म्हटलं बस कर आता आठवणी, जाऊन मेसेंजर वर व्हिडिओ कॉल कर आणि बघत बस मधाळ चेहरा, फॅनवर भुरू भुरू उडणारे केस आणि बांगड्यांचे मंजुळ स्वर. […]

अखेरचा खांब

दिलीप, राज, देव ही चित्रपट सृष्टीतील तीन विद्यापीठं होती. दिलीप कुमारचे चित्रपट अभ्यासून संवेदनशील, दुःखी भूमिका कशा साकारायला हव्यात हे शिकता येत होतं. राज कपूरचे चित्रपट पाहून सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं असतं हे शिकायला मिळायचं. देव आनंदचे चित्रपट हे ‘एव्हरग्रीन’ कसं जगायचं हे शिकविणारे होते. हे तिघेही सिने रसिकांच्या गळ्यातील ताईत, जसे जन्माला आले तसेच निजधामाला गेले..आधी शोमन राज कपूर, नंतर एव्हरग्रीन देव आनंद आणि आज ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार!! आता तिघेही वरती एकमेकांना गळामिठी घालून कडकडून भेटतील. […]

एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट

बाळ गर्भात एका बाजूला गेल्याने बाळाने मुव्हमेन्ट करून दुसऱ्या बाजूचे अवयव दिसावे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील यांनी प्रयत्न केले. पण बाळ फिरायला तयार होईना म्हणून ते मिस्कील पणे म्हणाले की बाळ झोपा काढतय हलायला तयार नाहीये आणि त्याचक्षणी बाळाने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरावे तशी गर्भात गिरकी मारली. बाळाची पूर्ण तपासणी संपत आली असताना बाळाचा एका हाताचा पंजा सोनोग्राफी स्क्रीन वर हलताना दिसला. डॉक्टर प्रशांत पाटील यांनी लगेच बघा बाळ गर्भातुन आपले बोलणे ऐकून आता आपल्याला टाटा बाय बाय सुद्धा करत आहे असे हसून सांगितले. […]

स्मार्ट इंजिन

आपल्या भारत सरकार तर्फे घेतली जाणारी एम ई ओ क्लास फोर म्हणजे मरीन इंजिनियर ऑफिसर क्लास फोर ही परीक्षा पास केल्यानंतर मला कंपनीने माझ्या सागरी जीवनातील दुसऱ्याच जहाजावर पाठविले. माझे दुसरे जहाज आईस क्लास तर होतेच पण त्याशिवाय या जहाजावरील इंजिन स्मार्ट इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड प्रकारचे होते. परीक्षा पास झाल्यावर पहिलेच जहाज असल्याने फोर्थ इंजिनियर म्हणून न पाठवता पुन्हा एकदा ज्युनियर इंजिनियर म्हणून पाठवण्यात आले होते. पण जहाज जॉईन केल्यानंतर पंधरा दिवसातच चीफ इंजिनियरकडून माझा रिपोर्ट मागवला गेला आणि दुसऱ्याच दिवशी फोर्थ इंजिनियर म्हणून प्रमोट केले गेले.
[…]

स्टीवर्ड

रात्री तापा साठी गोळ्या घेऊन झोपायला गेलेला स्टीवर्ड सकाळी कामावर आला नाही म्हणून कूक ने चीफ मेट शी बोलून एक ट्रेनी सी मन मदत करण्यासाठी मागून घेतला. चीफ मेट ने कॅप्टन च्या कानावर ही गोष्ट घातली. कॅप्टन ने स्टीवर्ड ला केबिन मध्ये फोन करून तब्येतीची विचारणा केली असता त्याने डोकं दुखतंय आणि मळमळते आहे असे सांगितले तसेच अंगावर लालसर पुरळ उठत असल्याचे सांगितले. कॅप्टन ने सेकंड मेट ला विचारून कोण कोणत्या गोळ्या दिल्या याबद्दल खात्री करून घेतली. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ३ – पेरू

तसे पाहायला गेले तर पेरूंशी आपली मैत्री लहानपणा पासूनची आहे. मग ती पोपट व पेरूची फोड असो किंवा दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत बालपणी शाळेत मित्राबरोबर खाल्लेल्या पेरूच्या आठवणी असोत. पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात. 
अशा या पेरूबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. […]

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ४)

महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहीला असता तर सीमाप्रश्न कधीच सुटला असता. परंतु तसे कधी झालेच नाही. त्यामुळे इथल्या मराठी माणसाच्या मनात एकाकीपणाची भावना निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी आपली जिद्द, संघर्ष कधी सोडलाच नाही. गेली 65 वर्षे तो लढतो आहे. स्वातंत्र्यलढ्यानंतर इतका दीर्घकाळ लोकशाही मार्गाने सुरू असलेला दुसरा लढा इतिहासात नाही. येथील मराठी माणसावरील अत्याचार अन् अन्यायाने सीमापार केली. ‘आम्ही लोकशाहीत आहोत की हुकूमशाहीत’ असेच कोडे मराठी माणसाला पडले आहे. […]

जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ

शतकानुशतके ना कोणी आमंत्रण पत्रिका छापते, ना कुणी कोणाला एकत्र येण्याचे आवाहन करते, ना कोणाला एकत्र येण्याचे, काम करण्याचे मानधन मिळते, तरीही बरोबर ज्या त्या तिथीला, जो तो आपापल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतोच…. हे वैशिष्ठय कोणत्या सभेचे किंवा उपक्रमाचे नाही तर ही आहे आपली पंढरीची वारी…. […]

संधिप्रकाशातील सावल्या – १ : भेटीची आवडी । उतावीळ मन

आम्ही वृद्ध झालोत, पण टाकाऊ नाही झालोत. हा संधिप्रकाश दिसतोय ना तो आमचा ऊर्जास्रोत आहे. सूर्य मावळल्यानंतर आणि अंधार पडायच्या आधी जो प्रकाश असतो ना, त्याला संधिप्रकाश म्हणतात. आमची सावली संधिप्रकाशातसुद्धा दिसते. ती अनुभवानं समृद्ध असते. त्या सावलीत बसून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल. जीवन कसं जगायचं हे आम्हाला, आमच्या सावलीला विचारा. सकारात्मक आयुष्य मिळेल तुम्हाला. आनंदी जीवनाचे धडे गिरवायचे असतील तर संधिप्रकाशातील सावलीत बसण्याखेरीज पर्याय नाही. बघ, तूच ठरव, म्हातारीचं ऐकायचं की आपलाच हेका चालवून आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं ? ” […]

ऑईल स्पिल

वेक अप कॉल वाजल्यापासून आठ ते दहा मिनिटे झाले नव्हते की लगेच पुन्हा रिंग वाजली. तोंडातला ब्रश काढून घाईघाईत तोंड धुवून फोन उचलला तर पलीकडून मोटर मन म्हणाला जसे असाल तसे या खाली इंजिन रूम मध्ये ऑईल स्पिल झाले आहे. खाली जाताना चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि जुनियर इंजिनियर हे पण सगळे घाई घाईत पळत चालले होते. खाली जाऊन बघतो तर प्यूरीफायर रूम मधून काळे हेवी फ्युएल ऑईल दरवाजा बाहेर ओसंडून वाहत होते. […]

1 125 126 127 128 129 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..