भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो.. […]
लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते. लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते. […]
बरेच जणांना प्रश्न पडतो की आम्ही जहाजावर कसे जातो किंवा जहाजावरुन घरी कसे येतो. आम्हाला घ्यायला किंवा सोडायला जहाज मुंबईत किंवा भारतात येते का किंवा कसे. मी असलेले एकही जहाज आजपर्यंत मुंबई काय भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये आलेले नाही. फक्त एकदाच सिंगापूरहुन गल्फ मध्ये जाताना भारतीय सागरी हद्दीतून काही तास गेले आहे. जिथे जहाज असेल तिथे आम्हाला पाठवले जाते. मग ते जहाज परदेशात असो किंवा भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये असो. जहाज ज्या देशात असेल तिथला विजा, इमिग्रेशन किंवा ईतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच जहाजावर पाठवले जाते तसेच जहाजावरून घरी पाठवले जाते. जहाजावर जसे कोणाला तरी रिलीव्ह करायला जावे लागते तसेच कोणी रिलिव्हर आल्याशिवाय जहाजावरुन खूप दुर्मिळ वेळा परत यायला मिळते. दुसरा कॅप्टन आल्याशिवाय सध्याचा कॅप्टन जाऊ शकत नाही तसेच पॅम्पमॅन आणि फिटर यांच्यापैकी एखादा खलाशी सुद्धा रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ शकत नाही. […]
फोर्क आणि स्पून ने जेवायचे, जेवताना अन्न खाली पडून द्यायचे नाही. प्लेट मध्ये काट्या चमच्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. फोर्क किंवा क्नाइफ कोणत्या हातात पकडायची वगैरे वगैरे सांगितले गेले. अर्ध्यापेक्षा जास्त जणांना हे माहिती होते आणि त्यांना तसं जेवता पण येत होते. पण माझ्यासारख्या काहीजणांना जेवताना कसले मॅनर्स पाळायचे, जहाजावर जाऊ तेव्हा बघू असं वाटायचं. घरात मांडी घालून हाताने जेवायची सवय, शेतावर लावणी नाहीतर कापणीला डाव्या हातावर भाकरी आणि त्याच भाकरीवर वाळलेले बोंबील, सुकट नाहीतर जवळ्याचे कालवण खाताना जी चव लागते ती पंचपक्वान्ने खाताना कशी काय मिळायची आणि तीसुद्धा काटे चमच्यांनी […]
‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला. चार विदयार्थ्यांसह ९९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत. […]
महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबद्दल एक लोककथेनुसार अशी आख्यायिका आहे की, विद्योत्तमा नावाच्या एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह लावून दिला जातो. कालांतराने हे जेव्हा तिला कळते तेव्हा ती व्यक्तीचा अपमान करते. ती म्हणते, ‘अस्ति कश्चित् वाग्विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषत: आहे?’ राजकन्या रागात त्या व्यक्तीला हाकलून देते. […]
अश्वत्थानं गोष्ट संपवली आणि सावलीत बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं . त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं . नेहमीप्रमाणं संधिप्रकाशातील सावल्या घनदाट होऊ लागल्या होत्या . सगळी झाडं , क्षितिजाकडे नजर रोखून सूर्य अस्ताला जाण्याची वाट पहात होती . […]
एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठ-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे कृष्ण-बलराम-सुभद्रा यांचे. […]
दुपारी दोन च्या सुमारास एबी आणि पंपी 3P टॅन्क चे झाकण उघडून तिथे काहीतरी काम करत असताना एबीच्या खिशात असलेला वॉकी टॉकी खाली टॅन्क मध्ये पडला. एबी ला वाटले आता चीफ ऑफिसर आणि कॅप्टन च्या शिव्या खायला लागतील. तो पंपीला म्हणाला कोणाला सांगू नकोस मी खाली जाऊन वॉकी टॉकी घेऊन येतो. पंपी त्याला म्हणाला वेड बीड लागलंय का तुला पन्नास फुटांवरून खाली पडलेला वॉकी टॉकी एकतर फुटला असेल नाहीतर खाली क्रूड ऑईल मध्ये खराब झाला असेल. त्याहीपेक्षा अजून टॅन्क क्लिनिंग व्हायचे बाकी आहे, खाली जाणाऱ्या शिडीवर ऑईल असेल उतरताना किंवा चढताना खाली पडशील. तू काही खाली जाऊ नको आपण सांगू कॅप्टनला. पण एबी काही ऐकेना तो खाली भराभर उतरू लागला आणि खाली टॅन्क मध्ये उतरल्यावर शोधता शोधता खाली पडला. पंपी काय ओळखायचे ते ओळखला आणि त्याने लगेच वॉकी टॉकी वरून कार्गो कंट्रोल रूम मध्ये ड्युटी ऑफिसरला एबी खाली टॅन्क मध्ये उतरला आणि बेशुद्ध पडला असल्याचे कळवले. […]
सगळ्या शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधा एका पेक्षा एक, थ्री स्टार, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या. चकाचक रिसेप्शन, चकाचक एअर कंडिशन असलेले वर्ग, चकाचक गार्डन, चकाचक मैदान, चकाचक बसेस, चकाचक शिक्षक आणि स्टाफ आणि त्याहून चकाचक त्या शाळेत शिकणारे लहान लहान निरागस विद्यार्थी. पण सगळ्यात जास्त खटकत होत ते म्हणजे अशा या सगळ्या ब्रँडेड शाळा आपापले मार्केटिंग करत होत्या. […]