आणखीन एका पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतले आणि तो म्हणजे फ्लेमिंगो! त्यांचे रंग, लाल, गुलाबी आणि अबोली. त्याचा मुलाचा रंग राखाडी असतो. परंतु, (कॅरटोनॉइड) गाजरासारख्या कंदमुळाच्या खाण्यातून त्यांना असे विविध छटांचे रंग प्राप्त होतात. […]
हळू हळू महंमद बसलेले बास्केट एकदाचे खाली जायला सुरवात झाली. बास्केट खाली जात असताना दोलका प्रमाणे हलत असल्याने जहाजाच्या बाजूवर येऊन आदळते की काय असे वाटत होते पण केवळ अर्ध्या फुटांवरून ते दुसऱ्या बाजूला जात असल्याने अधांतरी लटकलेला महंमद सुमारे साडे तीन तासांनी खाली बोटीत कसाबसा एकदाचा उतरला. मेडिकल साइन ऑफ होऊन घरी जाण्याकरिता जहाजावरुन उतरल्यावर सगळ्यांना हात करून निरोप घेऊन तो बोट मध्ये बाहेर एका बाकड्यावर बसला. […]
१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी “गांधारी हनगल’ या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. […]
आषाढ महिना म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती विठ्ठल रखुमाईची मुर्ती आणि पंढरपूरची वारी. तसंच विठ्ठल म्हटल्यावर कळत न कळत आपण गुणगुणू लागतो ती विठ्ठलाची गाणी. […]
हिमालयातील या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात. […]
आज आषाढी एकादशी! त्यानिमित्ताने मागील काही जुन्या नाटकांचा अभ्यास करते वेळेस अचानक समोर ‘संगीत संत कान्होपात्रा’ नामक नाटक उभं ठाकलं. जास्तीचा अभ्यास करताना हे नाटक केवढं जुनं आहे हे लक्षात आलं. १९३१ च्या काळात हे नाटक रंगभूमीवर आलं असं वाचनातून निदर्शनास आलं. १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला. या नाटकाला संगीत मा. कृष्णराव […]
चीफ इंजिनियरने वयाची पन्नाशी ओलांडली होती. पंचवीस वर्षांपेक्षा जास्त सर्व्हिस झाल्यामुळे, मुंबईत तीन कोटी पर्यंतचे दोन फ्लॅट्स, बी एम डब्लू, नोकर चाकर, मुच्यूअल फंडस्, मोक्याच्या ठिकाणी घेतलेले वाणिज्यिक गाळे त्यातून मिळणारे लाखो रुपयांचे भाडे अशी करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीचे त्याच्याकडून नेहमी वर्णन ऐकायला मिळायचे. […]
जहाजावर सगळ्या टाक्या किंवा जिथे जिथे बाहेर जाण्यासाठी दरवाजे असतात त्यांना वॉटर टाईट डोअर्स असे म्हणतात. वॉटर टाईट म्हणजे जहाज बुडाले तरी आत अकोमोडेशन किंवा एखद्या स्टोअर रूम मध्ये पाणी येऊ नये एवढे मजबूत दरवाजे असतात. मजबूत असल्याने ते खूप वजनदार आणि भारी भक्कम असतात. जहाज हेलकावत असताना हे दरवाजे अत्यंत काळजीपूर्वक उघडावे लागतात, वाऱ्यामुळे किंवा जहाजाच्या हेलकावण्यामुळे हे दरवाजे बंद होताना जोरात आदळले जातात. सेकंड मेट घरी जाण्याच्या तंद्रीत असल्याने अप्पर डेक मधून आत अकोमोडेशन मध्ये येताना त्याचे थोडेसे दुर्लक्ष झाले, एक पाय बाहेर असताना वॉटर टाईट डोर जहाज हेलकावल्या मुळे एवढ्या जोरात आदळले की सेकंड मेटला दरवाजावर नियंत्रण ठेवता आले नाही. दरवाजा आदळून बंद होत असताना त्याचा डावा पाय बाहेर होता आणि परिणामस्वरूप त्याच्या पायावर वॉटर टाईट डोअर एवढ्या जोरात आदळला की पायाचे हाड मोडल्याचा त्याला स्वतःलाच आवाज आला. त्याच्या तोंडातून जोरात किंकाळी निघाली ती ऐकून पायलट माघारी फिरला आणि त्याने सगळा प्रकार बघून ब्रिजवर कॅप्टनला वॉकी टॉकी वर कॉल करून ताबडतोब माहिती दिली. […]
भल्या सकाळी ती रोज यायची . न दमता , न कंटाळता जमिनीवर पडलेली बकुळीची फुलं वेचायची . तिच्याजवळच्या त्या मोठ्या परडीत फुलांचा हा मोठा ढीग व्हायचा . मग इथेच ती झाडाला टेकून फतकल मारून बसायची . आणि गाणं गुणगुणत गजरे गुंफत बसायची . […]
उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार? […]