नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

वडापाव

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महात्मा गांधींनी म्हटलं होतं, ‘परमेश्वराला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायचा असेल, तर तो भाकरीच्याच रुपाने घ्यावा लागेल!’ आता ऐंशी वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे, आता भाकरी ही भुकेल्याला जीवनावश्यक असली तरी तिची जागा आता ‘वडापाव’ने बळकावली आहे. […]

जागतिक प्लास्टिक बॅग फ्री दिवस

प्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते. […]

रोलिंग

सोमालियन पायरेट्सने केलेल्या अयशस्वी हल्ल्या नंतर आमच्या जहाजावर असणारे रायफलधारी सिक्यूरीटी गार्ड श्रीलंकेच्या ग्याले बंदरात उतरणार होते. सोमालियन पायरेट्सने दिवसा ढवळ्या जहाजाला हायजॅक करायचा प्रयत्न केला होता. पण जहाजावर ए के 47 रायफल हातात घेऊन उभे असलेले सिक्यूरीटी गार्ड बघून पायरेट्स जास्त वेळ व त्यांची शक्ती खर्च न करता माघारी फिरून गेले होते. […]

प्रार्थनांचे सहस्वर !

शालेय कालखंडानंतर प्रार्थना आपल्या आयुष्यातून हद्दपार होते. क्वचित घरात संध्याकाळी ” शुभं करोति ” असे बोबडे बोल उमटतात, एखाद्या धार्मिक कार्यक्रमात आपण प्रार्थना करतो, अध्यात्मिक सत्संगात प्रार्थना भैरवीसारखी असते- ” लोकः समस्ता सुखिनो भवन्तु ” वगैरे! कार्यक्रम संपल्याची ती नांदी असते, पटकन डोळे उघडून दैनंदिनीत शिरायला मोकळे! […]

इक्वेटर क्रॉसिंग

जहाज जेव्हा पृथ्वीचे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करते त्यावेळी जहाजावर इक्वेटर क्रॉसिंग सेरेमनी साजरी केली जाते. […]

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ स्थापना दिन

महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी २ जुलै १९१६ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. भारतातीलच नव्हे तर मध्य पूर्व आशियातील केवळ महिलांसाठी असलेले हे पहिले विद्यापीठ आहे. […]

हां बाबू, ये ‘सर्कस’ है

भारतात सर्कस सुरु झाली १८८२ साली. विष्णुपंत छत्रे यांनी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. त्यानंतर महाराष्ट्राबरोबरच केरळ व बंगाल मधील काही मंडळींनी सर्कसला नावारूपाला आणले. […]

देवदूत दिन

पूर्वी राजे महाराजे आपल्या पदरी राजवैद्य ठेवायचे. ते नाडी परीक्षा करुन, जडीबुटीची औषध देऊन उपचार करायचे. कालांतराने आजारांवर नवीन औषधे निघाली. इंजेक्शन देऊन उपचार होऊ लागले. […]

देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक संस्थेचा स्थापना दिन.

आपल्या गुरूच्या आज्ञेवरून १ जुलै १९२५ रोजी ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. गिरगावातील प्रार्थना सभेच्या जागेमध्ये विद्यालय सुरू केले. विद्यालयाचे नामकरण श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले . […]

1 126 127 128 129 130 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..