बी ई करताना अलिबागच्या जे एस एम कॉलेज ची खूप आठवण यायची. डिग्री करताना फर्स्ट ईयर मध्ये प्रत्येक शुक्रवारी शेवटची मालदार नाहीतर अजंता पकडून अलिबागला यायचे आणि सोमवारी पहिली अजंता पुन्हा मुंबईला जायचे. साहजिकच पुढल्या वर्षी ड्रॉप लागण्यासाठी कमीत कमी जेवढ्या केट्या लागतात त्याच्यापेक्षा डबल केट्या लागल्या. […]
एकदा का मुलाच्या वडिलांनी, आईने, मोठ्या मुलाने व धाकट्या मुलीने ‘छान आहे’ म्हटले की मुलगी पसंत झाली मानायचे. अगदी तसेच वॉशिंग्टन-दिल्लीच्या विश्वबॅंक कार्यालयाने, दारेसालामच्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅकेने आणि झांझीबारच्या परिवहन मंत्रालयाने माझी चरित्रसूची म्हणजे बायोडेटा ओके केल्याचे म्हणजे ‘मी पसंत पडल्याचे’ संगणक टपाल आले. […]
कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला. […]
झांझीबार डायरी हे एक प्रवासवर्णन नाही. जागतिक बॅंकेच्या कामानिमित्त अरुण मोकाशींनी केलेल्या झांझीबार वारीमध्ये त्यांनी अनुभवलेले झांझीबारमधील जनजीवन, तिथल्या प्रथा-परंपरा, सोहोळे, वन्य-जीवन यासारख्या विषयांवरील अत्यंत सुंदर लेखांचे हे संकलन आहे. मोकाशी यांनी अत्यंत प्रभावी भाषेत, खेळीमेळीच्या शैलीत हे सर्व लेख लिहिलेले आहेत. […]
संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या . […]
दिवाळी अंकांची दुनिया आणि व्यथा अधिकच वेगळी- उणेपुरे तीन चार महिन्यांचे आयुष्य, किमती शेकड्यात म्हणून ही इंडस्ट्री कायम ग्रंथालयांच्या आणि जाहिरातींच्या जीवावर चालली आहे. मग ७५ वर्षांचे आश्चर्य अधिक वाटते. नेटाने वल्ही मारणारे संपादक येथवर नाव आणून सोडतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल किमान कृतज्ञ तरी राहायला हवे. […]
सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला. […]
मागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची. […]
दुपारी एक वाजता जाणाऱ्या सेकंड इंजिनियर कडून हॅन्ड ओव्हर आणि माझ्याकडून टेक ओव्हर सुरु झाले. खाली इंजिन रूम मध्ये वेगळी लिफ्ट मेन डेकवरून खाली इंजिन रूम चे पाच मजले. दुसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम च्या खाली आणखी तीन मजले. […]
माझ्यावर औषधोपचार सुरु झाले सतीश गांधी डॉक्टरांनी मला पेनीसिलीनचे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितलं. त्यावेळेस हे इंजेक्शन द्यायला आणि त्यातल्या त्यात साडे सहा वर्षांच्या मुलाला द्यायचे याबद्दल गांधी डॉक्टरांसह सगळ्यांनाच भीती वाटत होती. […]