आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. ‘अॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो. तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘ फोटो काढून घेत होते. आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले. विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’. […]
चीफ ऑफिसरने सुरवात केली, तुम्हा सर्वांपैकी कोणाला एखाद्या बद्दल काही तक्रार असेल तर चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन कडे येऊन तसे सांगावं. पण अशाप्रकारे कोणाला त्रास देऊ नये. मागील दोन दिवसापासून कॅप्टन च्या केबिन मध्ये रोज रात्री कोणत्याही वेळेला फोन करत आहे. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तीन चार वेळेला कोणत्याही वेळी ब्लँक कॉल करून कॅप्टनची झोपमोड केली जातेय. […]
सुमारे अडीच वर्षानंतर ऑफिसमध्ये जॉइनिंग करण्याकरिता जुलै 2017 मध्ये रिपोर्ट केल्यानंतर प्रत्यक्ष जहाजावर पुन्हा जॉईन करण्यासाठी मध्ये जवळपास दीड महिना गेला. बॉस ने अडीच वर्षानंतर जॉईन करायला जाऊनसुद्धा प्रमोशन देऊन अनपेक्षित धक्का दिला होता प्रमोशन मिळून तीन पट्ट्या मिळण्यापेक्षाही पाच ते सहा महिन्यांऐवजी तीन महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळणार याचाच जास्त आनंद झाला. […]
संध्याकाळी डिनर झाल्यावर स्मोक रूम मध्ये गप्पा मारत असताना कॅप्टन ने सेकंड इंजिनियरला विचारले तुम्ही मिसेसला सोबत आणणार होते असा मेसेज आला होता नंतर पुन्हा एकटेच येतायत असा मेसेज आला, असा कोणता प्रॉब्लेम आला ऐनवेळी की मिसेस जॉईन नाही करू शकल्या. […]
मुंबईवरून आलेले आमचे फ्लाईट लँड झाल्याझाल्या एअरपोर्ट च्या ग्राउंड स्टाफ ची गडबड आणि विमानांची गर्दी लक्ष वेधून घेत होतं. माझा पहिलाच विमानप्रवास आणि पहिलीच परदेशवारी त्यामुळे सगळ्याच गोष्टींच अप्रूप वाटत होतं. […]
हिरव्या गर्द आंब्याच्या झाडावर येणारा मोहोर जसं जसे दिवस वाढत जातात तसं तसा रंग बदलत जातो. सुरवातीला दिसणारे पोपटी किंवा तांबूस कोंब बहरल्यावर हिरवे दिसतात नंतर चॉकलेेटी किंवा ब्राऊन होत जातात आणि मोहोर फुलल्यावर थोडेसे पांढरे दिसल्या सारखे भासतात. […]
याच काळात एका थोर क्रांतिकारकांनं सत्याग्रह करून सीमावासीयाना प्रेरणा दिली. ते होते क्रांतिसिंह नानासाहेब पाटील! कारवारात नानासाहेब व कारवारचे काशीनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच आंदोलन झालं. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन सीमावासीयांत नवचैतन्य निर्माण केलं. […]
आपण शाही पुलावावर पेरलेला सुका मेवा बघितला असेल, त्यावर भरपूर काजू पेरलेला पुलाव फार आकर्षक दिसतो. आज आपण या काजूचा विचार करणार आहोत. काजू हा सदाहरित वृक्ष अॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ […]
बाईंनी अध्यक्षीय भाषण सुरू केलं. ते संपल. मला फारसं काही कळलं नाही. लक्षात राहिली ती त्यांची पोडामवर आडवा हात ठेवून, ठासून प्रत्येक शब्द उच्चारण्याची शैली, ‘श’ आणि ‘ष’ यांच्यातील फरक अधोरेखित करणारं उच्चारण, कानाला गुंगवून टाकणारा नाद आणि प्रामाणिकपणे स्वत:चे विचार स्पष्ट करण्याची धाटणी. भाषण संपल्यावर, कार्यक्रम संपल्यावर मी आईला म्हणालो,“तुझ्यासारखंच बोलतात त्या.” त्यांची सही घ्यायला धावलो. व.पुं.नी सही छापलेलं लेटरहेड दिलं. बाईंना त्या को–या कागदावर जांभळया पेनानं तिरपी सही केली – ‘ सरोजिनी वैद्य ’. […]
अरे हे काय गोंदवून घेतलंस दंडावर?? एका मित्राला त्याच्या दंडावर केलेली रंगीबेरंगी कलाकारी अभिमानाने दाखवत असताना बघितल्यावर विचारले. रंगीबेरंगी नव्हतं फक्त लाल आणि काळपट हिरव्या रंगात कसली तरी सिँहाच्या तोंडासारखी आकृती होती. […]