नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

नायजेरियन माफिया

संध्याकाळी डिनर झाल्यावर स्मोक रूम मध्ये गप्पा मारत असताना कॅप्टन ने सेकंड इंजिनियरला विचारले तुम्ही मिसेसला सोबत आणणार होते असा मेसेज आला होता नंतर पुन्हा एकटेच येतायत असा मेसेज आला, असा कोणता प्रॉब्लेम आला ऐनवेळी की मिसेस जॉईन नाही करू शकल्या. […]

मुंबई – जकार्ता व्हाया दुबई

मुंबईवरून आलेले आमचे फ्लाईट लँड झाल्याझाल्या एअरपोर्ट च्या ग्राउंड स्टाफ ची गडबड आणि विमानांची गर्दी लक्ष वेधून घेत होतं. माझा पहिलाच विमानप्रवास आणि पहिलीच परदेशवारी त्यामुळे सगळ्याच गोष्टींच अप्रूप वाटत होतं. […]

मोहोरलेले अलिबाग

हिरव्या गर्द आंब्याच्या झाडावर येणारा मोहोर जसं जसे दिवस वाढत जातात तसं तसा रंग बदलत जातो. सुरवातीला दिसणारे पोपटी किंवा तांबूस कोंब बहरल्यावर हिरवे दिसतात नंतर चॉकलेेटी किंवा ब्राऊन होत जातात आणि मोहोर फुलल्यावर थोडेसे पांढरे दिसल्या सारखे भासतात. […]

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ६)

याच काळात एका थोर क्रांतिकारकांनं सत्याग्रह करून सीमावासीयाना प्रेरणा दिली. ते होते क्रांतिसिंह नानासाहेब पाटील! कारवारात नानासाहेब व कारवारचे काशीनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच आंदोलन झालं. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन सीमावासीयांत नवचैतन्य निर्माण केलं. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ६ – काजू

आपण शाही पुलावावर पेरलेला सुका मेवा बघितला असेल, त्यावर भरपूर काजू पेरलेला पुलाव फार आकर्षक दिसतो. आज आपण या काजूचा विचार करणार आहोत. काजू हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ […]

सरोजिनीबाई…

बाईंनी अध्यक्षीय भाषण सुरू केलं. ते संपल. मला फारसं काही कळलं नाही. लक्षात राहिली ती त्यांची पोडामवर आडवा हात ठेवून, ठासून प्रत्येक शब्द उच्चारण्याची शैली, ‘श’ आणि ‘ष’ यांच्यातील फरक अधोरेखित करणारं उच्चारण, कानाला गुंगवून टाकणारा नाद आणि प्रामाणिकपणे स्वत:चे विचार स्पष्ट करण्याची धाटणी. भाषण संपल्यावर, कार्यक्रम संपल्यावर मी आईला म्हणालो,“तुझ्यासारखंच बोलतात त्या.” त्यांची सही घ्यायला धावलो. व.पुं.नी सही छापलेलं लेटरहेड दिलं. बाईंना त्या को–या कागदावर जांभळया पेनानं तिरपी सही केली – ‘ सरोजिनी वैद्य ’. […]

टॅटू

अरे हे काय गोंदवून घेतलंस दंडावर?? एका मित्राला त्याच्या दंडावर केलेली रंगीबेरंगी कलाकारी अभिमानाने दाखवत असताना बघितल्यावर विचारले. रंगीबेरंगी नव्हतं फक्त लाल आणि काळपट हिरव्या रंगात कसली तरी सिँहाच्या तोंडासारखी आकृती होती. […]

एन आर आय स्टेटस

पहिल्यांदा जहाजावर गेल्यावर एन आर आय स्टेटस म्हणजे नेमकं काय असतं याचा उलगडा झाला कारण जहाजावर जाण्यापूर्वी एन आर आय, एन आर आय हे फक्त ऐकून होतो. […]

‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा !

निवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं,  भारतीय विचार साधनेतर्फे ३० जून २०२१ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक काल श्री किशोर शशीतल आणि डॉ मुकेश कसबेकर यांनी माझ्या हाती ठेवले. […]

गोडांबा @ मांडवा, अलिबाग

गोडांब्या कडे बघूनच कोणालाही डेरेदार वृक्ष प्रत्यक्षात कसे असतात हे लगेच लक्षात येईल. भरगच्च पानांनी नेहमी बहरलेल्या गोडांब्याच्या खाली मे महिन्याच्या गर्मीत सुद्धा थंडगार वाटते. त्याच्या शितल छायेत एकदा बसल्यावर पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत उठायची इच्छाच होत नाही. […]

1 119 120 121 122 123 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..