नवीन लेखन...
Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

3M – जपानी संकल्पना

जपान देशाने अनेक तंत्र आणि सक्सेस मंत्र साऱ्या जगाला दिले आहेत हे आपण जाणतोच. ते साऱ्या जगाला पटले आणि कौतुकास पात्र ठरले ते ह्या जपानी नागरिकांच्या उत्तरोत्तर प्रगतीने आणि सातत्याने! ह्या लेखात आपण पाहुया अशाच एका संकल्पने बद्दल. काईझेन हे एक जगप्रसिद्ध असलेले व्यवस्थापन तंत्र आहे. […]

आनो ही! (तो दिवस!)

ह्या वर्षी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी जपान देशाने भोगलेल्या त्सुनामीच्या हाहाकाराला दहा वर्ष पुर्ण झाली! हो. . हे तेच दृश्य, जे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी बसून टी व्ही वर पाहीलं.. कोणी वाचलं असेल त्याबद्दल, काहींनी ऐकलं असेल.. […]

गोशीकिनुमा (जपान वारी)

जपानमधील एका राज्यात, अनेक तलावांनी वेढलेली ही जागा. जागेचे नाव “गोशीकिनुमा” असे नाव ठेवले गेले कारण तिथे विविध रंगांचे ५ तलाव आहेत. अक्षरश: ५ रंग वेगळे उठून दिसावेत असे हे पंचरंगी तलाव आहेत. ह्या जागेबद्दल जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तिथले फोटो पाहून क्षणभर विश्वास बसेना, खरंच अशी जागा आहे? फोटो एडिट वगैरे केले नसतील ना? अनेक प्रश्न… […]

शिनकानसेन – जमिनीवरचे विमान

बुलेट ट्रेनचे जपानी भाषेतले नाव शिनकानसेन. जपानला एकत्र बांधून ठेवणार्‍या प्रमुख धाग्यांमधील एक.. एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा प्रवास काही तासात घडवून आणणारी जगातली सर्वात वेगवान रेल्वे – शिनकानसेन.

“खरोखरच…जमिनीवर धावणारी विमाने आहेत!” असं म्हंटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही अशा डौलाने ह्या शिनकानसेन धावतात.
३०० किमी प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने! म्हणजे कल्पना करा किती स्पीड असेल (मुंबई-पुणे प्रवास ६० मिनिटांच्या आत पूर्ण करतील इतका). […]

जपानी पेहराव (जपान वारी)

पारंपारिक जपानी पोशाख ज्या ठिकाणी संस्कृती जपलेली आहे अशा ठिकाणी पारंपारिक पद्धती आणि रूढी परंपरा अगदी मनापासून जपल्या जातात. पेहराव हा प्रत्येक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात पोशाखांचे अनेक प्रकार आहेत. इंडो-वेस्टर्न असा मेळ आजकाल ट्रेंडिंग असला तरी मुळ भारतीय पारंपारिक लुक ला तोड नाही! ग्लोबल होत आज जग जवळ आलंय परंतु पाश्चात्य देशातील संस्कृती […]

फुजिझुका (प्रति-फुजी)

जपानचा पवित्र पर्वत कोणता ? असं विचारलं तर पटकन कोणीही (ह्या देशाबद्दल थोडीफार माहिती असणारे) फारसा विचार न करता अंदाजाने सुद्धा सांगू शकतील माउंट फुजी! गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जपान मधले एव्हरेस्ट! फुजीसान वरती चढण्याचा आनंद आणि पुण्य प्रत्येकाला लाभावं म्हणून तोक्यो व इतरही काही ठिकाणी फुजिझुका म्हणजे प्रति-फुजीसान बांधलेले आहेत. ह्या फुजिझुका म्हणजे प्रति-फुजी  वरती चढणे हे खरोखरच्या फुजी वरती जाऊन आल्याचे पुण्य पदरी घालते असे येथील लोक मानतात. […]

विस्टेरिआ – नेमोफिला फ्लॉवर फेस्टिवल

ऋतु चक्राभोवती अनेक गोष्टी गुंफलेल्या आहेत. रंगीबेरंगी फुले हा त्या ऋतुचा आरसा म्हणूनच जणु कार्यरत असतात. त्या त्या ठराविक ऋतुमध्ये आपल्या स्वत:च्या सौंदर्याने त्या ऋतुचे सौंदर्य वर्णन करून दाखवणारी फुले! […]

आकाशी खाईक्यो ब्रिज

जगातल्या ५ महत्त्वाच्या सस्पेंशन ब्रिज मधील सर्वोत्तम! जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पेक्षा लांब व मोठा असलेला इंजीनियरिंगचा चमत्कार! माणसाने ठरवलं तर अशक्य काहीच नसतं हे आपण बऱ्याचवेळा ऐकतो आणि लोकांना समजावतो सुद्धा! ह्याची पुरे पुर प्रचिती देणारी एक जागा म्हणजे जपान मधला सस्पेंशन ब्रिज! आकाशी खाईक्यो .. […]

सुशी आणि बरंच काही… (जपान वारी)

देश, संस्कृती, भाषा, वेषभूषा, रहाणीमान आणि आचार-विचार अशा सगळ्याच आघाड्यांवरती एक वेगळेपण मिरवणारे हे जपानी. जपान देशाने त्यांचं वेगळेपण खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा जपलेले आहे. जगभरात जपानी खाद्यपदार्थ खुप लोकप्रिय आहेत हे आपण जाणतो. आजकालच्या लहानग्यांना आणि नवीन पिढीला नारुतो, डोरेमॉन इत्यादी पात्रांद्वारे जपानच्या संस्कृतीबद्दल किंवा भाषेबद्दल माहिती झालेली आहे. […]

हानाबी (जपान वारी)

हानाबी म्हणजे आतिषबाजी (fireworks). फरक एवढाच की आपल्याकडे दिवाळी सारख्या फेस्टिवल साठी आतिषबाजी केली जाते इथे अतिषबाजीसाठी हा फेस्टिवल.फटाके हा शब्द अपुरा वाटावा अशी सुंदर सजावट. अतिशय विलोभनीय दिसणारी आणि आपल्या प्रकाशाने का होईना रात्रीचा अंध:कार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करणारी अशी हानाबी! […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..