आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, सर्वांच्याच मनात आशेची नवीन किरणे घेऊन येणारा हा दिवस. 2021 बघता बघता काळाच्या गर्भात विरून गेले. पण जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणणारे हे वर्ष नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले. कडू, गोड, आंबट,.. आठवणींनी भरलेल्या ह्या वर्षाला राम राम करून आता नवीन वर्षाची सुरुवात करू या. […]
मी ऑफिस मध्ये आले आणि स्टेटमेंट डाऊनलोड केले. प्रिंट आउट दिले. काम झालं तर ते काम कसलं!! नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न!! प्रिंटर खराब होता. साईडला दोन काळ्या पट्ट्या येत होत्या. […]
गेली तीन दशके कार्यरत असलेल्या हबल अंतराळ दुर्बिणीची, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण वारसदार ठरणार आहे. सहा टन वजनाच्या या दुर्बिणीचा आरसा हबल अंतराळ दुर्बिणीच्या आरशाप्रमाणे एकसंध नसून, तो एकूण अठरा छोट्या आरशांपासून तयार केला गेलेला आहे. […]
ऑनलाईन यंत्रणा फोफावत गेली तर शैक्षणिक ग्रंथालये, ग्रंथालय सेवक या नव्या यंत्रणेत उपयुक्त ठरतील का? टिकतील का? टिकायचे असेल तर ग्रंथालये ऑनलाईन पध्दतीत कशी आणता येतील यावर तज्ञांनी विचार मंथन करायला हवे. […]
जाता जाता त्याने असेही नमूद केले की आजच क्लायंटला पाठवायचा आहे. मला माझ्या ‘ U.S.V.’ मधील कलिग्ज् जे आता UK मध्ये होते, त्यांच्याकडून कळले होते की क्लाइंट युके मधला आहे. अमरेशच्या त्या वाक्याने मनात खूप आशा निर्माण झाल्या की आपल्याला पण मौका मिळेल का UK ला जायला ? मनात एक आशेचा किरण निर्माण करून तो दिवस संपला. […]
पुर्वी जहाजं पोर्ट मध्ये गेली की दहा दहा दिवस थांबायची परंतु आता टाईम इज मनी, जहाज पोर्ट मध्ये कार्गो लोड किंवा डिस्चार्ज करण्यासाठी गेल्यावर चोवीस तासात बाहेर पडून पुढल्या सफरीवर निघतात. वेळेचे आणि त्याहीपेक्षा नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागते. […]
ही जुळी मुलं एकाचवेळी दुपटीने सगळं देतात… मग तो आनंद असो, प्रेम असो, त्यांचं आजारपण, दुखणं, खर्च असो, त्यांची भांडणं, हट्ट, दंगा, अपघात, जिव्हाळा, आणि (मोठेपणी पालकांपासून) एकदम दुरावणं..! हे सगळं दुपटीने पालकांना अटॅक करतं! यातल्या काही गोष्टी नैसर्गिकरित्या दोघांना एकाच वेळेला होत असतात, तर काही एकमेकांमुळे. […]
१९४३ साली दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान-निकोबार द्विप समुह त्यांनी जिंकला. […]
बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे. […]
माझी स्वतःची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैली नाही. जर का काही साधर्म्य आढळले तर वाचकांनी माफ करावे. साधर्म्य सापडण्याचे एकच कारण की त्यांची प्रवासवर्णने ही मनात इतकी रुजली आहे कि ते सौंदर्य अनुभवताना त्यांच्या लेखना पलीकडे दुसरा विचार सुचला नाही. […]