नवीन लेखन...

शैक्षणिक

जसा संग तसा रंग

स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत, परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या पारस दगडाने लोखंडाला स्पर्श केला किंवा त्यात मिसळले तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर जंक पकडतो. आपल सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनवू. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे. […]

नवं सौरचक्र

सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सियस इतकं असतं, तर सौरडागांचं तापमान हे सुमारे तीन हजार सेल्सियस इतकं असतं. हे सौरडाग जरी सूर्याच्या इतर पृष्ठभागाच्या तुलनेत थंड असले तरी, हे सौरडाग म्हणजे अतितीव्र चुंबकीय क्षेत्राची ठिकाणं आहेत. सूर्यावरून उफाळणाऱ्या सौरज्वाला या, याच डागांच्या परिसरात निर्माण होतात. […]

मगरी – दोन पायांवर चालणाऱ्या!

मगर ही चार पायांवर चालते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, दोन पायांवर चालणाऱ्या मगरी तुम्हाला माहीत आहेत का? अशा मगरी अस्तित्वात होत्या. परंतु अलीकडच्या काळात नव्हे, तर अकरा ते बारा कोटी वर्षांपूर्वी – ज्या काळात डायनोसॉरचं राज्य होतं त्याकाळात. […]

एक अल्पायुषी बेट

टोंगा बेटांचा प्रदेश हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रदेश आहे. इथे पृथ्वीच्या कवचातील दोन भूपट्ट एकत्र आले आहेत व त्यातील एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकत आहे. अनेक ज्वालामुखींनी व्यापलेला, वारंवार भूकंप घडून येणारा, असा हा प्रदेश भूशास्त्रज्ञांकडून पूर्वीपासूनच अभ्यासला जात आहे. […]

आभासी आकर्षणाचे परिणाम

करिअरची निवड करताना तर अनेकांच्या बाबतीत अनेकदा काही घडायच्या ऐवजी बिघडतेच. करिअर निवडताना केवळ भावनेच्या आहारी जाऊन आणि त्यांतील ग्लॅमरमुळेच अनेकजण त्याकडे आकर्षित होताना दिसतात. […]

काही चांगल्या सवयी

दोघी एकमेकींना आजारी पडलेलं बघत, बरं होताना बघत, त्याबद्दल मला प्रश्न विचारत, तेव्हा त्या त्या वयाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांना काय झालंय, ते कशाने बरं होईल याची शास्त्रोक्त माहिती मी देत असे, अजूनही देते. […]

कोझलमधले खड्डे

कोझल इथल्या या खड्ड्यांपैकी अनेक खड्डे पाण्यानं भरले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांच्या परिसराला आता पाणथळी स्वरूप प्राप्त झालं आहे. हे पाणथळ परिसर म्हणजे बेडकासारखे विविध प्रकारचे उभयचर, सरीसृप, कीटक, पक्षी-प्राणी, इत्यादींचं वसतिस्थान होऊन, कोझलच्या खोऱ्यात ठिकठिकाणी नवीच वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था विकसित झाली आहे. […]

टी-रेक्सची ‘लोक’संख्या

पूर्ण वाढ झालेल्या टी-रेक्सची उंची सुमारे चार मीटर आणि लांबी बारा मीटर असल्याचं, तसंच त्याचं वजन सुमारे सात टन असल्याचं, टी-रेक्सच्या अवशेषांवरून माहीत झालं होतं. त्याचबरोबर हाडांतील वर्तुळांवरून टी-रेक्सचं सरासरी वय सुमारे अठ्ठावीस वर्षं असल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय टी-रेक्सच्या वाढीच्या वेगावरून त्याच्या शरीरातील अन्नाच्या चयापचयाचा वेगही पूर्वीच काढला गेला होता. […]

आठवा खंड

झिलँडिया खंडाचा पाण्याखालचा थर आणि ऑस्ट्रेलिया खंडाभोवतीचा पाण्याखालचा थर हे स्पष्टपणे वेगवेगळे झालेले असून, ते एका खोल घळीनं विभागले आहेत. सुमारे साडेतीन किलोमीटर इतकी खोली असणारी ही घळ ‘कॅटो ट्रफ’ या नावानं ओळखली जाते. […]

शरीराइतकेच मानसिक स्वास्थ्य महत्वाचे

आपल्या जीवनात आपण मानसिक स्वास्थ्यविषयक समस्यांचा सामना करत असलो, तर आपली विचारसरणी, अंतर्मनाची भावना आणि वागणूक ह्या सर्वांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी समस्या निर्माण करणारे नकारात्मक विचार जरी ते सामान्य आहेत असे वाटत असले तरीही सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आपण निश्चितच परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्या व्यक्त होण्यातून आपले व्यक्तिमत्वाचे वेगळेपण त्यांतच सामावलेले असते. […]

1 86 87 88 89 90 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..