नवीन लेखन...

शैक्षणिक

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग १०

मलेरियाच्या संशोधनातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते मलेरिया विषयक संशोधनात रॉस खेरीज अनेक युरोपियन शास्त्रज्ञ आघाडीवर होते. किंबहुना काही संशोधकांनी मलेरियाच्या परोपजीवांचा सखोल अभ्यास डॉ. रॉस या क्षेत्रात पडण्यापूर्वीच सुरू केला होता. त्या सर्वांचा या संशोधन मार्गावरील इतिहास हाही तितकाच मनोरंजक आहे. अल्फानॉस लॅव्हेरान याचा जन्म फ्रान्समधील एका बुद्धिमान कुटुंबात झाला. वैद्यकीय शास्त्रामधील मेडिसीन व […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ९

रोनॉल्ड रॉसच्या मलेरियासंबंधीत काव्यरचना रोनॉल्ड रॉस कवी- मनाचा असल्याने काही प्रसंगी अतिशय हळवा होत असे. त्याने अनेक कविता लिहील्या. त्यातील मलेरियाच्या संशोधनासंबंधीत दोन कविता येथे देत आहे. मलेरियाच्या संशोधनकार्यात ज्यावेळी अनेक अडथळे येत गेले, डासांचा, माणसांचा व मलेरिया परोजीवांचा परस्पर संबंध उलगडत नव्हता त्यावेळी रॉस चिंताग्रस्त झाला. त्याच सुमारास त्याला स्वत:ला मलेरियाचा रोग झाला. त्याच्या दु:खी, […]

ब्लड प्रेशर मॉनिटर

ॲ‍नरॉईड प्रकारची उपकरणे ही एकट्याला वापरणे अवघड असल्याने तसेच त्यात वारंवार रीडिंगचे सेटिंग करावे लागते. त्यामुळे डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर वापरणे अधिक योग्य असते. त्यात एक धाग्यांची बनवलेली पट्टी असते त्याला एलसीडी पॅनेल जोडलेले असते. रक्तदाब मोजताना ती पट्टी हाताच्या दंडाजवळ गुंडाळली जाते व नंतर एक आवाज येतो, तो इलेक्ट्रिक मोटरचा असतो. छोट्याशा पंपाने ती पट्टी फुगवली जाते व नंतर हवा सोडलीही जाते. त्यातून सिस्टीलिक व डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे आकडे एलसीडी पडद्यावर दिसतात. […]

डिजिटल थर्मोमीटर

घरात कोणाला ताप आला की आपण चटकन थर्मोमीटर तोंडात किंवा काखेत ठेवून ताप मोजतो अतिशय उपयुक्त असे हे साधन आहे. थर्मोमीटर इतिहास तसा फार जुना आहे. १५९३ मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली  याने पहिला थर्मोमीटर  तयार केला होता, त्याला त्यावेळी धर्म थर्मोस्कोप असे नाव  होते. तो फार अचूक नव्हता.  अचूक असा थर्मोमीटर १६४१ मध्ये तयार झाला. […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ८

दरम्यानच्या काळात रॉसला इटालियन वैद्यक शास्त्रज्ञ गिओव्हानी बॅटिस्टा ग्रासी याच्या वागणुकीचा अत्यंत कटु, संतापजनक व अपमानास्पद अनुभव आला. रॉसने मलेरियावरील केलेले संपूर्ण संशोधन हे ग्रासीने स्वत:च्या नावावर एका वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध केले. ही मौल्यवान शोधकार्याची चोरी झाल्याचे रॉसच्या लक्षात येताच त्याने पत्राद्वारे कडक शब्दात व अत्यंत शिवराळ भाषेत ग्रासीची निर्भत्सना केली. दोघांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारासंबंधीचे पुस्तकच रॉसने […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ७

त्यासुमारास डॅनलेवस्की या शास्त्रज्ञाने पक्षांमधील मलेरियाच्या परोपजीवांचा अभ्यास केला होता. त्याच्या संशोधनाप्रमाणे काही जातीची कबुतरे मलेरिया पसरविण्यास कारणीभूत आहेत असा निष्कर्ष होता. परंतु अनेक पक्षीशास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले होते की डास हे पक्षांना चावतच नाहीत तेव्हा रॉसने हे अनुमान पडताळून पहाण्याचा चंगच बांधला. त्याने कबुतरे, चिमण्या, कावळे यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास सुरू केला. त्याला लक्षात आले की […]

महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे !

स्पर्धा पारितोषिकांसाठी(करंडक, ढाल ,चषक वगैरे)असतात की बक्षिसाच्या रकमेसाठी की मिळालेल्या व्यासपीठावर स्वतःला पारखून घेण्यासाठी असतात कां मैत्र नको, शत्रू हवा याचा सर्वांनीच यानिमित्ताने (पुन्हा एकदा) विचार करण्याची पाळी आलीय. […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग ९ – शुष्क पठारा वरील जंगलातील बहुउपयोगी वृक्ष – बाभूळ

बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांची ‘बाभूळ झाड’ कविता खूप गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्णन ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु:ख आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेत वर्णन केला आहे. […]

नाईलचा बाहू

नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती. […]

अतिप्राचीन पाणी

आपल्या या संशोधनावरून बार्बरा शेरवूड लोलार यांनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. मंगळावर आज जीवसृष्टी अस्तित्वात नाही. परंतु मंगळ काही अब्ज वर्षांपूर्वी वसतियोग्य ग्रह होता. मंगळावरची आजची परिस्थिती जरी जीवसृष्टीच्या वाढीसाठी फारशी पोषक नसली तरी, एके काळी तिथे प्राथमिक स्वरूपाची जीवसृष्टी कदाचित अस्तित्वात आलीही असेल. बार्बरा शेरवूड लोलार यांच्या म्हणण्याप्रमाणे, मंगळावर जर अशी जीवसृष्टी निर्माण झाली असली, तर ती तिथल्या जमिनीखालील खोलवरच्या पाण्यात तग धरून राहिलीही असेल. त्यामुळे भविष्यात जर मंगळावरच्या जमिनीत खोलवर अशी जीवसृष्टी सापडलीच, तर आश्चर्य वाटायला नको! […]

1 61 62 63 64 65 154
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..