नवीन लेखन...

शैक्षणिक

बिथोवेनचा मृत्यू

लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ काळ निर्मितीक्षमता लाभलेल्या या संगीतकाराची श्रवणशक्ती मात्र त्याच्या तरूण वयातच क्षीण होऊ लागली होती. […]

साबणातील घटकद्रव्य

खेळून आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धू.’ असं संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरात आईचं हे वाक्य ऐकायला मिळतं. अस्वच्छ हात-पाय फक्त पाण्याने स्वच्छ होत नाहीत. त्यासाठी साबण वापरावा लागतो. कसं बरं तयार करतात साबण? अल्कली मोनोकार्बोक्सिलिक आम्ल (फॅटी अॅसिड) यामध्ये अभिक्रिया होऊन साबण आणि ग्लिसरीन तयार होतं. […]

ममींची कार्यशाळा

ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची. […]

बेकेलाइट प्लास्टिक

प्लास्टिकला अगदी सहजगत्या पाहिजे तसा आकार देता येतो. ज्या वस्तूंना कमी-जास्त दाबाने अथवा उष्णता व दाब या दोन्हींच्या साहाय्याने हवा तो आकार प्राप्त करण्याचा गुणधर्म असतो ती वस्तू प्लास्टिक आहे असे समजतात. प्लास्टिकला अंग व मजबुती देण्याकरता रंगद्रव्य, पाणी व तंतूमय पदार्थ वापरतात. तथापि त्याला आकार देण्याचे व आकार धारण करण्याचे कार्य करणारा मुख्य घटक हा उच्च भाराचा कार्बनी पदार्थ असतो. या आकारी कार्बनी घटकाला अनेक वेळेला रेझिन असे म्हणतात. […]

अजस्र पेंग्विन

पेंग्विन हे अंटार्क्टिकावरील जीवसृष्टीतलं एक वैशिष्ट्य आहे. मात्र या न उडणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य फक्त अंटार्क्टिकापुरतं मर्यादित नाही. पेंग्विनच्या काही जाती अगदी विषुववृत्ताजवळच्या प्रदेशांतही आढळतात. पेंग्विनच्या आज अठरा जाती अस्तित्वात असून, त्यांतील अंटार्क्टिकावर आढळणारी एम्परर पेंग्विन ही जाती आकारानं सर्वांत मोठी आहे. […]

पेट्रोरसायने म्हणजे काय?

लॅटिन भाषेत पेट्रोस म्हणजे खडक. त्यापासून मिळवलेले तेलकट पदार्थ म्हणजे पेट्रोलियम पदार्थ.रॉकेल हा शब्दही रॉक ऑईल म्हणजे खडकापासून मिळवलेले तेल असाच | होतो. यातील मूळ पदार्थ आहे क्रूड ऑईल अथवा कच्चे तेल. […]

रेल्वे जगात कधी व कोठे सुरू झाली? ती भारतात कधी व कोठे सुरु झाली?

रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये झाला. इ.स. १७८४ मध्ये पोस्टाची पत्रे घेऊन जाणाऱ्या घोडागाड्यांचे वेग वाढविण्यासाठी रस्त्यांमधे लाकडी फळ्या अंथरून त्यावरून या घोडागाड्यांना पळविले जाई. […]

पेट्रोरसायनांची गरज केव्हापासून पडू लागली?

माणूस हा निसर्गाचे बालक आहे. त्यामुळे तो सर्वस्वी | निसर्गावर अवलंबून आहे. त्याला शेती करायला लागून जेमतेम ८-१० हजार वर्षे झाली आहेत. पण त्या आठ-दहा हजार वर्षापूर्वीपासून ते अगदी ५०-१०० वर्षापूर्वीपर्यंत शेतीतून मिळणारी धान्ये, कापूस, रबर, इंधनासाठी लाकूड या सगळ्या गोष्टी त्याला पुऱ्या पडत भारताची असत. […]

भारतात पेट्रोलियम उत्पादने आणि पेट्रोरसायने कोठे बनतात?

भारतातील पहिले तेल शुद्धिकरण केंद्र आसाममध्ये सुरु झाले. त्याला आता १०७ वर्षे झाली.मधे काही वर्षे हे तेल शुद्धिकरण केंद्र बंदही पडले होते. पण परत ते सुरु झाले. या तेल शुद्धिकरण केंद्रातील पदार्थ जनतेच्या मागणीएवढे नसत, त्यामुळे या पदार्थांची फार मोठी आयात करावी लागे. शिवाय एकेका काळाची अशा पदार्थांची गरजही वेगवेगळी .असे.१९०० सालाच्या सुमाराला जेव्हा मोटर गाडया जवळ जवळ नव्हत्या तेव्हा पेट्रोल हा टाकाऊ पदार्थ होता आणि केरोसिनला मोठी मागणी होती कारण ते कंदीलासाठी लागे. […]

मृदू, कठीण, जड पाणी

कठीण पाणी, जड पाणी असे अनेक शब्द आपल्या ऐकिवात आहेत. आज त्यांची माहिती करून घेऊ. पावसाचे पाणी जमिनीतून झिरपताना पाण्यात कॅल्शिअम, मॅन्गनीज (Ca2+, Mg2+) इत्यादी द्विभारीत धातूंचे क्लोराईड, सल्फेट, बायकार्बोनेट आदी क्षार पाण्यात विरघळतात. अशा पाण्याला क्षारयुक्त कठीण पाणी म्हणतात. ज्यात असे क्षार नगण्य प्रमाणात असतात ते मृदू पाणी. सोडिअमचे क्षार असल्यास मात्र पाण्याला कठीणपणा प्राप्त होत नाही. […]

1 60 61 62 63 64 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..