शैक्षणिक

जीवनाचा उद्देश्य शोधा

जीवनातील उद्दिष्टय पूर्तींसाठी काय करावयाला हवे ते सांगणारा हा लेख असून थोडक्यात याचे विवेचन केलेले आहे.
[…]

साखरशाळांचे भवितव्य टांगणीला

विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्‍या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
[…]

लाकडी खेळणी बनविणारा कोल्हापूरचा बचत गट

लोणची, पापड, खाद्य पदार्थ यामध्येच आतापर्यंत बचत गट अडकले होते. परंतु काहीतरी नवीन करावे, ही चाकोरी बदलावी या उद्देशानेही काही बचत गट कार्यरत आहेत.
[…]

वाणिज्य शाखेतील डॉक्टरेटची पदवी

Ph.D. या पदवीसाठीचे महाराष्ट्रातील नियम बदलत आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्वोच्च अशा या पदवी परीक्षेसंदर्भात बरेच विचारमंथनही चालू आहे. नियमांच्या चौकटीशिवाय खरा प्रश्न असतो तो विद्यारर्थ्याला कार्यप्रेरित करण्याचा, त्याला प्रोत्साहन देण्याचा ! संशोधनाच्या कार्याचा उद्देश विद्यार्थी उच्चविद्याविभूषित होणे हा आहेच, परंतु त्याचा अभ्यास हा समाजाला उपयोगी, हितकारक कसा बनेल हे पाहणेदेखील आवश्यक आहे. डॉक्टरेट करणार्‍या विद्यार्थ्याला प्रेरणा मिळावी, या दृष्टीकोनातून लिहिलेला लेख……..
[…]

“पहिला” दिवस शिक्षकाचा !

शैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध. हे नातेसंबंध कसे निर्माण होतात, किती बहरतात, वाढतात, का खुरटेच राहतात, यावर त्या दोघांचे आणि शाळेचेही भवितव्य अवलंबून असते. हे नातेसंबंध रुजतात शिक्षक व विद्यार्थी यांच्या पहिल्या भेटीतच. म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गावर जाताना प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते जे बोलतील, जसे वागतील त्याचेच पडसाद वर्गात वर्षभर उमटणार आहेत. यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जाणून घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतो. […]

दोन सूर्यांचा चमत्कार…… इंटरनेटवरची अफवा (Email Hoax)

गेले काही दिवस एक इ-मेल इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. Aderoid नावाचा एक तारा पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला २१ जून २०१० रोजी आकाशात दोन सूर्य दिसणार आहेत असे ते इ-मेल आहे. हे एक मनमोहक दृष्य असेल आणि असे दृष्य पुन्हा केवळ इ.स २२८७ मध्ये दिसेल असेही या इ-मेल मध्ये लिहिले आहे. मजा म्हणजे इ-मेल पाठवणार्‍याने २१ जून २०१० च्या आकाशाचे फोटोही त्यात पाठवले आहेत. हा इ-मेल पाठवणारा भविष्यवेत्त्या नॉस्ट्रेडॅमसचा अवतार तर नाही ना? […]

एकेरी पालकत्वाचे आव्हान

येणार्‍या काळात हा एकेरी पर्याय स्वीकारणार्‍या स्त्रियांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकेरी मातृत्व अनेकांना कोलमडत चाललेल्या कुटुंबसंस्थेचा परिपाक वाटू शकेल. पण याचे उत्तर इतके साधे नाही. या कुटुंबसंस्थेच्या मुळाशी ज्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी समाजाने केली, त्याची ही फळे असतील का? […]

1 53 54 55 56