नवीन लेखन...

शैक्षणिक

प्लास्टिकचा इतिहास – भाग १

मायकेल फेरेडेने असे निरीक्षण केले की, गुट्टा पर्चा चीक (मलाया द्विपकल्पामधील पर्चा नावाच्या झाडापासून मिळणारे चीक/रबर) उत्तम विद्युतरोधक असतो व त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे ट्रान्स अटलांटिक केबलवर पर्चाच्या झाडाच्या चिकाचे आवरण दिले गेले. आजही हे आवरण समुद्राच्या पाण्यातून जाणाऱ्या केबलवर देतात. पर्चा झाडाचा चीक हा एक प्लास्टिकसदृश पदार्थ होता. […]

आपलं रसायनशास्त्र

‘लोकसत्ता’मध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे गेली अनेक वर्षे सदर चालवलं जातंय! विज्ञानाच्या अनेकविध अंगांविषयी सामान्य माणसाच्या मनात अनेक कुतूहलं निर्माण होत असतात. या सदरातून ही कुतूहलं शमवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्या निमित्ताने दैनंदिन जीवनातील अनेक वैज्ञानिक विषय हाताळले गेले आहेत. या वर्षी असाच एक, प्रत्येक माणसाच्या अगदी दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारा किंबहुना माणसाचं सारं जीवनच व्यापून […]

इंडक्शन कुकर

इंडक्शन कुकरमध्ये भांडेच हिटिंग एलमेंटचे काम करते. सोप्या शब्दांत भांडेच अन्न शिजण्यासाठी लागणारी उष्णता निर्माण करण्याचे काम करते. यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे तत्त्व वापरलेले असते. […]

ठशांचं ‘वय’…

दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या दिशेनं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ठसे केव्हा उमटले असावेत याची माहिती मिळू शकली, तर गुन्ह्याचा […]

मायक्रोवेव्ह ओव्हन

मायक्रोवेव्ह  ओव्हन हे स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आता फारसे नवीन राहिलेले नसले तरी त्याचा वापर मात्र अजून कायम आहे. विसाव्या शतकातील तो एक महत्त्वाचा शोध मानला अर्थवेध असते. जातो. प्रगत देशात तर प्रत्येक घरात त्याचा वापर केला जातो. मायक्रोवेव्ह ओव्हन उष्णतेने अन्न शिजवण्याच्या ऐवजी प्रारणांच्या मदतीने अन्न शिजवते, रडार तरंगांचे तंत्र यात वापरलेले असते. […]

नळ का गळतो आणि कसा थांबवायचा?

नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो. फिरकीच्या नळाचे तीन प्रमुख भाग लक्षात […]

रेल्वेचे गेज म्हणजे काय असते ? अशी किती गेज आहेत ?

दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते. […]

जागृत मंगळ…

मंगळावर अनेक ज्वालामुखी आढळतात. एके काळी जागृत असलेले हे ज्वालामुखी आज मृतावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळ ग्रह हा भूगर्भीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला आहे. मात्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून, मंगळ वाटतो तसा निष्क्रिय नसल्याचं दिसून आलं आहे. किंबहुना मंगळावर सतत भूकंप होत आहेत, इतकंच नव्हे तर मंगळाच्या पृष्ठभागाखाली शिलारस अस्तित्वात असल्याचंही दिसून आलं आहे. […]

प्लम्बिंग सामानाची निवड व गळतीवर उपाय

घराघरातून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे पाइप, झडपा (व्हॉल्व्ह), कोपरे (बेंड्स), नळ इत्यादी सामानांचा वापर केला जातो. या सर्व सामग्रीचा वापर करून टाकी व पंपापासून ते घरातील नळापर्यंत पुरवठा व्यवस्था जोडणीला प्लमिंग (स्पेलिंग प्लंम्बिंग पण उच्चार प्लमिंग) म्हणतात. सर्व व्यवस्थेची उद्दिष्टे १) योग्य दाबाने व योग्य प्रमाणात सातत्याने घरात पाणीपुरवठा होत राहणे. २) वापरलेले सामान (पाइप, नळ, झडपा) पाणी […]

गॅस लायटर

पूर्वीच्या काळात चार आण्याला आगपेटी मिळायची. अजूनही ती मिळते पण आता तिचा वापर फारसा होत नाही, कारण घरोघरी गॅस पेटवण्यासाठी आपण गॅस लायटरचा वापर करतो. […]

1 51 52 53 54 55 154
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..