दातांच्या स्वच्छतेसाठी ‘टूथपेस्ट’
तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? तुमच्या तोंडाला दुर्गंधी येते का? असे प्रश्न विचारत दूरदर्शनवर अनेक टूथपेस्टची जाहिरात होत असते. या टूथपेस्टमध्ये नक्की असते तरी काय? दातावरील कीट घर्षणाने सुटे व्हावे व दातांना चकाकी यावी यासाठी आवश्यक तेवढा खरखरीतपणा असलेले, बिनविषारी व रुचिहीन आणि बारीक कण असलेले पदार्थ टूथपेस्टमध्ये वापरतात. कॅल्शियम कार्बोनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट डायहायड्रेट, ट्रायकॅल्शियम […]
