नवीन लेखन...

औषधांच्या दुनियेत

आधुनिक जगात औषधे ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. भारतासारख्या महाकाय देशात औषधांची निर्मितीही अवाढव्य आहे आणि आज आपल्याकडे जवळपास १ लाख औषधे उत्पादने उपलब्ध आहेत. बदलत्या काळात जसे वैद्यक व औषधशास्त्र प्रगत होत गेले तसे औषधांचे स्वरूप, प्रकार, ती वापरण्याच्या पद्धती यात प्रचंड वैविध्य व नावीन्य आले आणि ही आधुनिक औषधे योग्यपणे वापरण्याची ग्राहकांवरची जबाबदारीही वाढली. औषधे ही योग्य मात्रेत, योग्य प्रकारे घेतली तरच ती औषधे ठरतात अथवा ती विषासमान वा निरुपयोगी ठरतात याची तितकिशी जाणीव आज समाजात नाही. म्हणूनच या सदरांतून हा ‘औषध साक्षरतेचा’ प्रयत्न. रोगप्रतिबंध, रोगनिदान व रोग मुक्ती या उद्देशाने औषधे वापरली जातात. औषधांचे दोन मुख्य गट आहेत. एक मोठा गट, ज्यात बहुतांशी औषधे अंतर्भूत आहेत, तो म्हणजे ‘प्रीस्क्रिप्शन मेडिसीन’. याचा अर्थ ही औषधे डॉक्टरांनी आजाराचे निदान केल्यावर त्यांच्या चिठ्ठीनेच घ्यायची स्वतः होऊन सेल्फ मेडिकेशन घेतल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. सर्व दीर्घ गंभीर आजार (मधुमेह, हृदयविकार, मनोविकार वगैरे) व वेगवेगळ्या जंतुप्रादुर्भावावरील प्रतिजैविके (अॅण्टिबायोटिक्स) औषधे यात आहेत. ‘वैद्यकीय सल्ल्याने, मार्गदर्शनाखाली वा प्रीस्क्रिशननेच घ्यायचे औषध आहे,’ असा निर्देश औषधाच्या लेबलवर असतो. लेबलवरील Rxहे चिन्ह वा तांबड्या रंगांची रेघही हेच सूचित करते. कायद्याप्रमाणे श्येड्युल एच. जी. एक्समध्ये या औषधांचा अंतर्भाव आहे.

दुसऱ्या गटातील औषधे रुग्ण, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही घेऊ शकतो. या गटांना ‘नॉन-प्रीस्क्रिप्शन’ किंवा ‘ओ. टी. सी.’ ओव्हर द काऊंटर औषधे म्हणतात. किरकोळ आजारांसाठी व बाह्योपचारांसाठीची अनेक औषधे यात समाविष्ट आहेत.

ग्राहकांच्या माहितीसाठी नेमकी ही औषधे कोणती याची सूची आजतरी उपलब्ध नाही. पण श्येड्युल ‘के’ (घरगुती औषधे) मध्ये साधारण ही औषधे येतात. वेगवेगळे बाम, रेचके, अॅसिडीटी वरील काही औषधे, पॅरासिटॅमॉल, ॲस्पिरीन इत्यादींचा समावेश आहे. अर्थात स्वतःच्या मनाने विशेषतः, पोटात घेण्याच्या औषधांचा अतिरेकी वापर टाळून वेळीच वैद्यकीय सल्ल्याकडे वळणेच हितावह.

डॉ. मंजिरी घरत
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..