भारतीय संस्कृतिचे संवर्धक : विश्वकर्मा शिल्पकार – प्रस्तावना
ऋग्वेदात एकीकडे वस्तू निर्माण करणारा तक्षा, कर्मार वगैरे कारागीर आहेत, तर दुसरीकडे विश्व निर्माण करणारा विश्वकर्मा आहे. (ऋ. १०.८१-८२) तत्कालीन विद्वान ऋषींना विश्वाचे शिल्प घडविणाऱ्या शिल्पकाराला विश्वकर्मा म्हणण्याची कल्पना समाजातील शिल्पकाराला पाहूनच सुचली आणि परवर्ती (वेदोत्तर) साहित्यानी प्रासाद, लेणी, मंदिर, मूर्ती, चित्र, अलंकार अशा कला कौशल्याच्या अनेक वस्तू, वास्तू निर्माण करणाऱ्या शिल्पकराला विश्वकर्मा हे नामाभिधान दिले आणि ते रुढही झाले. म्हणून विश्वकर्माच्या नावाने कला-शिल्पकारागिरांचा समाज नाव लौकिकास आला. विश्वकर्मा समाज म्हणजे कला-कारागिरांचा समाज हे समीकरण वेदोत्तर प्राचीन ग्रंथानीच रुढ केले. […]
