नवीन लेखन...

जीवनखेळी

भरोसा नसला जरी श्वासांचा जीवनखेळी सहजी खेळावी… मनात असावा स्पर्श प्रीतीचा भावशब्दातुनी नाती जपावी… वाळवंटातही अंकुर फुटतो भावनांना फुटावी शब्दपालवी… गीतातुनी उमलावे हृद्य मनीचे फुलांफुलांतुनी प्रीती फुलावी… आलो मोकळे, जाणार मोकळे जीवास वृथा आसक्ती नसावी… सुखनैव जगावे अन जगवावे अंतसमयी मनास खंत नसावी… –वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र. २६५ १९/१०/२२

मलेरिया – तापाचे अभयत्व विज्ञान ( Immunity )

काही व्यक्तींना निसर्गतःच मलेरिया विरुद्ध अभयत्व प्राप्त होते कारण त्यांच्या शरीरातील तांबड्या रक्तपेशींना मलेरियाचे परोपजीवी भेदू शकत नाहीत . एका दृष्टीने हे त्या व्यक्तींना मलेरिया रोगमुक्तीचे मिळालेले वरदानच आहे . परंतु अशा व्यक्तींची संख्या फारच अल्प असते . हे अभयत्व प्रामुख्याने खालील दोन गोष्टींमुळे आढळून येते . १ ) Duffy Antigen Negativity २ ) Sickle Cell […]

कालचक्र

दयाघनाची अगाध लीला सारे शब्दांच्या पलिकडले सृजनशीलतेचे अगम्य कोड़े प्रारब्धाचे दृष्टांत आगळे… ब्रह्मांड ! साक्षात्कार ईश्वरी चराचर निसर्गात रंगलेले सप्तरंगली सृष्टी मनोहर वैविध्यतेत रूपरंग नटलेले… असीम अंबर, अथांग सागर नाते धरेचे चैतन्यात रमलेले अनाकलनीय रुपे भगवंताची अस्तित्व, देवत्वाचे रुजलेले… तोच सार्वभौमी सत्ताधीश सत्य अंतिम श्वासात उरलेले तोच जगवितो अन तारितो कालचक्र अखंडित चाललेले…. –वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – कलासरगम

1970 च्या सुमारास राज्य नाट्यस्पर्धेभोवती साऱया हौशी रंगकर्मींच्या आशा केंद्रित झाल्या असताना ठाण्यातल्या काही चळवळ्या युवकांनी कलेची सरगम छेडत ‘कलासरगम’ची स्थापना केली. राज्य नाट्यस्पर्धेत नवनवे प्रयोग करत, आधी प्रायोगिक व नंतरच्या काळात समांतर म्हटली जाणारी चळवळ त्यांनी ठाण्यात रुजवली. […]

रेल्वेप्रवासाचं नियोजन – भाग – २

रेल्वेप्रवासाचं नियोजन साधारण १९५५ सालापासून तिकिटाचं रिझर्व्हेशन करणं प्रवासीमंडळींमध्ये रुळू लागलं होतं. त्या तिकिटावरचा पेननं लिहिलेला डबा क्रमांक आणि सीट क्रमांक वाचणं म्हणजे एक दिव्यच असे. पुढे गाडीत हमखास जागा पकडून देणारे स्टेशनवर उभेच असत. त्यांचं जाळंच तयार झालेलं होतं. त्यांच्यातील काही जण गाडी यार्डातून निघून फ्लॅटफॉर्मला लागतानाच अनेक जागा अडवून येत. मग काय? सीट देण्याचा […]

अस्मिता

मराठी मना माझ्या नको अंत पाहू पेटलेल्या युगी या नको मृत राहू ॥ धृ ॥ मराठी मना काय तुझी ही अवस्था कशी अस्मितेची तुला ही अनास्था मना-माझ्या मित्रा, ही कोणती रे निद्रा जिवंतपणाला ही का आली सुस्तमुद्रा मनोस्फुल्लिंगांना ही टाकतो मी ठिणगी होण्यासाठी पुन्हा जिवंत, जाग पाहू ॥ १ ॥ कुणी आणावा राजा शिवाजी राणा मराठी […]

म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणूक

‘म्युच्युअल फंड या विषयावर मला लिहायचे होते . विषय माझ्या खूप आवडीचा , परंतु या दोन शब्दांवर किती व कसे लिहावे असा प्रश्न पडला होता . पण जसा जसा विचार करू लागलो तसतसे सुचत गेले . हे दोन शब्द मानवी जीवनाच्या अर्थकारणात म्हणजेच आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव झाली आणि त्याचबरोबर जबाबदारी पण वाढली . […]

झुळझुळ

विरहात जरी कासाविस जीव हॄदयातुनी , पाझरते भावप्रीत अजुनही मन तुझ्यात गुंतलेले स्मरणगंधला गंधाळ स्पंदनात गुलमुसलेली ती सांज क्षितिजी जणु रंगली तुझ्याच प्रतिबिंबात मनांगणी दरवळते तीच बकुळी मंत्रमुग्धली माझ्या भावशब्दात दुःख वेदनांचे सावट जरी अंतरी तरतो तव अस्तित्वाच्या खुणात तुझ्याच रुपात जगविते कविता प्रीतभावनांची झुळझुळ अंतरात. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२६२ १६/१०/२०२२

“भीमसेन” – आकाशाएवढा !

हिमालयाला गायला सांगितले की तो ज्या पहाडी स्वरांमध्ये गडगडाटी गाईल, तसं भीमसेनजींचं गाणं मला सतत वाटत आलं आहे. […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय दहावा – विभूतियोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी विभूतियोग नावाचा दहावा अध्याय श्रीभगवानुवाच । भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः । यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ श्री भगवान म्हणाले, महाबाहु पार्था तू असशी माझा प्रिय मित्र म्हणुनि सांगतो तुझ्या हितास्तव परमज्ञानसूत्र १ न मे विदुः […]

1 2 3 4 5 6 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..