नवीन लेखन...

पांढरा शर्ट खाकी पँट

शैक्षणिक मुल्ये, संस्कार, निती , शैक्षणिक क्रांती हे सगळं पांढऱ्या शर्ट आणि खाकी पँट सारखं काळाच्या पडद्या आड जाऊ लागले आहे आणि ह्याला जबाबदार अशा शाळांचे चोचले पुरविणारी पांढरा शर्ट आणि खाकी पँट घालून शिकलेली तुमची आणि आमची पिढीच आहे. […]

एक रुबाबदार अभिनेता – विनोद खन्ना

गुलजार आपल्या पहिल्या मेरे अपने  चित्रपटासाठी एका वैफल्यग्रस्त तरुणांच्या भूमिकेसाठी शोध घेत होते. त्याच वेळी त्यांची नजर विनोद खन्नावर गेली. त्यांनी त्याला ती भूमिका दिली. त्याच्या या कामाला मिनाकुमारीने सुद्धा दाद  दिली. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४४ )

मे महिना संपला की सर्वाना वेद लागतात ते पावसाचे ! पाऊस हा कवींसाठी थोडा विशेषच असतो कारण प्रत्येक कवीने पावसावर एकतरी कविता लिहिलेली असतेच ! विजयने पावसावर आतापर्यत दहा- बारा कविता तरी लिहिल्या होत्या. त्यात त्याची सर्वात आवडती कविता होती तर पावसात भिजताना ! ज्या कवितेत प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची कल्पना करत असतो. विजयासाठी ही […]

सर्वाधिक उंचीवर ‘तुंगनाथ’

पावले तुंगनाथची वाट चालू लागतात. साधारण १ कि.मी. अंतर चालल्यावर वृक्षवल्ली आपल्याला एका सुरेख हिरव्या कुरणावर आणून सोडतात व आपला निरोप घेतात. अशा कुरणाला ‘बुग्याल’ असे म्हणतात. या पुढच्या प्रवासात मात्र कुठेही झाडे दिसत नाहीत. वातावरणात होणारा सुखद बदल स्पष्ट जाणवत असतो. समोर सोनेरी तेजाने झळकणारी पर्वतशिखरे उभी असतात. […]

लाघवी करस्पर्श (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४२)

मी तिचं नाव तेव्हा ऐकलंच नव्हतं पण माझ्या विचारांत ती मला लाघवी करस्पर्श म्हणूनच आठवते. किती जादू होती तिच्या हातांत! केवळ आश्चर्यकारक. कधी आणि कुठे, हे महत्त्वाच नाही पण केव्हा तरी एकदा मी माझ्या भ्रमंतीमधे एका विरळ लोकवस्तीच्या जिल्ह्यातून जात असतांना अचानक रात्र झाली. मी चालत जात होतो त्यामुळे आता ज्या गांवात मला पोहोचायचे होते, तिथे […]

भारतमातेच्या वीरांगना – ५३ – अजीजन बाई

अजीजन बाई एक गणिका होत्या, पण मनातून क्रांतिकारी. आपल्या जवळची सगळी संपत्ती त्यांनी नाना साहेबांना दिली, देश सेवेसाठी. फक्त धनच नाही दिले तर स्वतः त्याच्याबरोबर रणभूमीवर सुद्धा उतरल्या. त्या पुरुषाचा वेष करत, कमरेला तलवार आणि हातात बंदूक, घोड्यावर स्वार होऊन रणभूमीत उतरत. त्यांनी एक गणिकांची टोळी बनवली, त्याला ‘मस्तानी टोळी’ असं नाव दिलं, प्रत्येकीला बंदूक चालवायला, तलवार चालवायला शिकवलं. जखमी क्रांतीकारकांवर इलाज करणे, त्यांना खायला-प्यायला देणे, दारुगोळा पुरवणे, अशी सगळी काम अजीजन बाईच्या नेतृत्वाखाली ही मस्तानी टोळी करत असे. वीर सावरकरांनी सुद्धा आपल्या पुस्तकात अजीजन बाईंचा उल्लेख केला आहे, ते म्हणतात, ‘अजीजन बाईंच्या हास्यावर सगळे फिदा असत, त्यांचे मधुर हास्य वीरांना प्रेरणा देत असे परत रणांगणावार जाऊन शत्रूला सामोरे जायला, परंतु एखादा जर युद्धाला पाठ दाखवून आला तर अजीजन बाई कडून त्यांना चांगलाच ओरडा बसत असे. त्या स्वतः कायम युद्धभूमीवर शत्रूवर तुटून पडत असे.’ […]

वर्षाऋतु

तो आल्हादी पाऊस ढगफुटीचा गडगडाट रिमझिम पाऊसधारा मृदगंघली पाऊलवाट ती नितळ ओथंबलेली चिंबचिंबलेली बरसात शिडकावा मृदुलस्पर्शी अलवार तृप्ततो मिठित ऋतु, बावरा बरसणारा गगन, धरेस बिलगणारे मनामनांत पाऊस ओला निर्झर प्रीतीचे झरझरणारे रूप, मनोहारी चराचराचे चैतन्यांगण ते लुभावणारे वर्षाऋतु हा राजा ऋतुंचा क्षणक्षण मना रिझविणारे — वि. ग. सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १६८ १७ – ७ […]

नाटकाचे ठेकेदार

मराठी भाषा मोठी गमतीदार आहे, शब्दांचे अर्थ तुम्ही कोणत्या भावनेनं तो शब्द वापरताय यावरही अवलंबून असतात. ‘ठेकेदार’ या शब्दाला खरंतर एक नकारात्मक, उपहासात्मक अर्थ चिकटलेला आहे. पण या लेखनाच्या शीर्षकात मात्र तो अतिशय कौतुकाने, आपलेपणाने वापरला आहे. ठाणे शहरात जेव्हा बंदिस्त नाट्यगृहच नव्हते, तेव्हा स्टेज बांधण्यापासून ते रस्त्यावर फिरून नाटकाच्या जाहिराती वाटण्यापर्यंत साऱ्या जबाबदाऱ्या अत्यंत नियोजनपूर्वक […]

रेकॉर्डिंग आणि अल्बम

ठाणे जिल्हाप्रमुख आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त गाण्याचा कार्यक्रम मी सादर केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीतकार चिनार खारकर भेटायला आला. गेल्या वर्षीच्या चित्रपट ‘मानसन्मान’ नंतर आम्ही एकत्र काम केले नव्हते. “सर आपण नव्या पद्धतीच्या हिंदी गाण्यांचा अल्बम करू या. यात गझल नसतील. तुमच्या नेहमीच्या स्टाईलहून अगदी वेगळ्या रचना असतील.” चिनार म्हणाला. प्रियांकाही ॲकॅडमीत […]

रेल्वेसिग्नल्स

रेल्वेप्रवास विनाअपघात सुरू राहण्यात सिग्नलची व्यवस्था अपरिहार्य असते. जेव्हा इ.स. १८०६ च्या सुमारास दगडीखाणी असलेल्या जागांजवळ घोडे व गाढवे यांच्याद्वारा ओढून नेल्या जाणाऱ्या मालगाड्या प्रथम वापरण्यास सुरुवात झाली, तेव्हा रखवालदार रेल्वेलाईनवर उभं राहून हातानं सिग्नल दाखवीत. अशा वेळी काळोखामध्ये मिणमिणत्या कंदिलांचा उपयोग केला जात असे. जगातील पहिली इंजिन लावलेली प्रवासी गाडी डार्लिंग्टन ते स्टॉकटोन या अंतरात […]

1 15 16 17 18 19 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..