नवीन लेखन...

ईश्वराची बँक

प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे […]

डिकोस्टा ! (गूढकथा)

परदेशातला, बहुदा त्यागराजचा हा शेवटचा प्रोजेक्ट होता. तो सध्या वयाच्या पन्नाशीच्या टप्यात होता. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या आजून दक्षिणेला, श्रीलंकेच्या आधिपत्यातल्या, एका नगण्य बेटावर, तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आला होता. या खडकाळ आणि डोंगराळ बेटावर काही ब्रिजेस बांधायची होती. भारतातल्या कॉन्स्ट्रक्शन कंपनीने त्याला पाठवले होते. याला दोन कारणे होती. एक तर तो सडाफटिंग होता. कुटुंब बायका पोर! काही पाश नव्हते. कारण त्याचा ‘कुटुंब’ व्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता. आजाद पंछी! सुख पैशात खरेदी करता येतात, हे याच जगाने, त्याला शिकवले होते. आणि दुसरे कारण त्याची भटकंतीची हौस! […]

प्रवास… एक प्रेम कथा

रिक्षातून प्रवास करत असताना प्रतिभाने विजयचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तू तिचा नाद सोडत का नाहीस ? ती कोठे ?  तू कोठे ?? नाही म्हणायला ती सुंदर आहे पण इतकीही नाही की तू तिच्या प्रेमात पडावं ! तू किती हुशार ! उद्या जग तुझी दखल घेईल !  हे तिच्या गावातही नसेल. […]

अर्थसंकल्प आणि झिपऱ्या !

झिपऱ्या आज भलताच खुशीत होता, कारण कधी नव्हे ते त्याला अनेक नेते भेटले होते, आणि त्या सगळ्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून चॅनेलवाल्यांच्या माईक समोर बाईट देण्यासाठी उभे केले होते . टीव्हीच्या पडद्यावर दिसणार म्हणून तो भलताच खुशीत होता. […]

राधेचे मुरली प्रेम

मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला कुज  बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला   त्या सुरात कोणती जादू ती किमया कशी मी वदू सप्त सुरांचा निनाद उठुनी खेचून घेती चित्ताला – – – विसरली राधा सर्वाला   धेनु वत्से बावरली बाल गोपाल आनंदली रोम रोम ते पुलकित होऊनी माना डोलती सुरतालाला – – – विसरली राधा सर्वाला   प्रभूचा होता ध्यास मनी ती बघे हरिला रात्रन दिनी जे शब्द निघाले मुरलीतूनी हाका मारती  ते तिजला  – – […]

स्वप्नबंध (कथा)

स्नेहा … वय वर्ष ३२..व्यवसायाने फिटनेस ट्रेनर . शहरातल्या एका नामांकित जिम मधली एक कुशल फिटनेस ट्रेनर म्हणून ती प्रसिद्ध होती. स्नेहा ने अनेकांना फिटनेस फ्रीक करून सोडलेलं…लोकांना व्यायामाची गोडी कशी लावायची याची स्नेहाला उत्तम जाण होती आणि म्हणूनच तिला इतर ठिकाणहून खूप ऑफर्स येत असत. पण जिथे पहिली संधी मिळाली त्या कामालाच सर्वस्व मानून तिथेच कार्यरत रहायचयं आणि बाकी कामं फ्री लान्स पद्धतीने सुरु ठेवायची असं  तिचं ठरलेलंच होतं. मुळात चार दगडांवर पाय ठेवण्याचा तिचा स्वभाव नव्हताच मुळी . एक काम घेऊन त्यातच झोकून देण्याची तिची वृत्ती अनेकांना भावत असे. […]

जगमे रह जायेंगे, प्यारे तेरे बोल!

१९७६ ला मुकेशचे पार दूर देशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि इकडे सोलापूरच्या दयानंदमधील आमच्या गॅदरिंग प्रॅक्टिसला मित्र अनिलला हुंदका आवरेना. तो आरके च्या ताज्या गाण्याची “इक दिन बिक जाएगा, माटी के मोल ” ( धरम -करम ) रिहर्सल करीत होता. त्यादिवशी एकट्या राज कपूरचा “आवाज ” गेला नाही. आम्ही आपोआप श्रद्धांजली मोडवर गेलो. […]

हाकामारी ! (गूढकथा)

“मायला, लाईट गेली जणू! या खेड्यात एकदा का लाईट गेली की, माहेराला गेलेल्या बायकु सारकी लवकर येत नाही! ” तो स्वतःशीच पुटपुटला. हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारे करत उभा होता. गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक? पण त्याच्या वेडाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता, आणि भूतदयेपोटी कोणी त्याला हुसकावून लावले नव्हते. म्हणून तो येथेच स्थिरावला. याचे वास्तव्य कायम मसणवट्या जवळच्या पिंपळाखाली, म्हणून लोक याला ‘वेताळ’ म्हणून हाक मारत. […]

सांगून टाक तुझ्या मनातलं प्रेम

हसून दाखव, बोलून दाखव, नको खेळू ,असा खेळ, नको खेळू ,असा खेळ, सांगून टाक तुझ्या मनातलं प्रेम. सांगून टाक तुझ्या मनातलं प्रेम. चालतांना माग वळून बघणं, गालातल्या गालात हसून पाहणं, नको करू असा छळ, नको करू असा छळ, सांगून टाक तुझ्या मनातलं प्रेम. सांगून टाक तुझ्या मनातलं प्रेम. चेहऱ्यावर तुझ्या झळकते तेज, तुझे माझे डोळे,करतायत मेळ, […]

शेतकरी आंदोलनाचे आंतरराष्ट्रीयकरण

दिल्लीच्या सरहद्दीवर सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळत आहे. इतके दिवस शांततापूर्ण रीतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसेचे गालबोट लागले. आता हे आंदोलन गुंडाळले जाणार! असे वाटत असतानाच शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी आंदोलनाला नवीन ऊर्जा मिळून दिली आणि आंदोलन पुन्हा जोमाने सुरू झाले. आता तर या आंदोलनाचे ट्विटरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..