नवीन लेखन...

अरे माणसा माणसा

अरे माणसा माणसा ,नको असा अंत पाहू , जीवसृष्टी ज्यावर जगे, त्या निसर्गा नको तोडू ,–!!! अरे माणसा माणसा, जगू देत वल्ली तरु, प्राणांसाठी संजीवन असे, नको त्यास दुर्लक्षित करू,–!!! अरे माणसा माणसा, पाणियाला चल वाचवू , जलस्त्रोत जगातले सारे, वाया नको असे घालवू ,–!!! अरे माणसा माणसा, धरणीवर घाव नको घालू , काळी आई पिकवे […]

कळेना कसे जडले रे मन (गीत)

कळेना कसे जडले रे मन आज हरपले माझे रे भान।।धृ।। फुलात दिसतो,मनी हसतो क्षणात जीव उगाच फसतो मन अजुनही आहे रे सान आज हरपले माझे रे भान।।१।। घरात होतसे तुझाच भास दिलवरा श्वासात तुझी आस साद ऐकण्या आतुरले कान आज हरपले माझे रे भान।।२।। तळमळ वाढे उगाच जीवा हळहळ दाटे मनात प्रिया कंठात दाटूनी आले रे […]

मिशन फेल …! (नशायात्रा – भाग १९ )

मटक्याचा अड्डा जाळण्याची आमची मानसिक तयारी पूर्ण झालेली होती व आम्ही एकून १५ लिटर रॉकेल देखील आणून एका ठिकाणी लपवून ठेवले होते . या मिशन साठी आम्ही शनिवार ची रात्र निवडली होती . ठरल्याप्रमाणे एक जण तेथील परिसराची रेकी करून आला होता बाजूच्या झोपड्या आणि हा अड्डा यात जास्त अंतर नव्हते त्यामुळे कदाचित बाजूच्या झोपड्या पेट घेऊ शकतील हा धोका होता मग त्यावरून आमच्यात वाद झाले की आपण जसे त्या मटक्याच्या अद्द्यावरच्या माणसाला वाचवण्याचा विचार करतोय , तसेच बाजूच्या झोपड्यांच्या बाबतीत काही करता येईल का ? खूप चर्चा झाली […]

दिव्यत्वाची झेप

पंख फुटता उडूनी गेला,   सात समुद्रा पलीकडे आकाशातील तारका होत्या,  लक्ष्य तयाच्या नजरेपुढे निसर्गाने साथ देवूनी,  दणकट दिले पंख तयाला झेप घेत जा दाही दिशांनी,  मनी ठसविले त्या पक्षाला आत्मविश्वास तो जागृत होता,  चिंता नव्हती स्थळ काळाची कुठेही जाईन झेपावत तो,  ओढ तयाला दिव्यत्वाची निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या देईन अंगच्या छटा निराळ्या, […]

दुरावा

भारत भूच्या सीमेवरी लढण्या सैनिक असावा मनामध्ये नसावा कधी घरच्यांसाठी रे दुरावा देशाचे रक्षण करणे माझे हे कर्तव्य पहिले दुराव्यातही जवळीक ह्यातच हित रे आपुले भारत मातेचे शिपाई त्यांचे घरटे गावदेशी माता- पिता ,पत्नी-मुलांची बांधिलकी असे मनाशी नकोच खंत दुराव्याची नातीच अपुली प्रेमाची जाणीव देश रक्षणाची चिंता नाहीच दुराव्याची — सौ माणिक शुरजोशी नाशिक

माझा व्हँलेनटाईन

आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले. खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले. त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे […]

श्लेष अलंकार चारोळी

श्लेषालंकार चारोळी (१) पारावरच्या गप्पांना झळाळी चढली आयुष्याची संध्याकाळ झाली जिवननौका पार होण्या आली जगण्यातली झळाळी गेली (२) नावात काय आहे नाव कमवून रहा तरच जिवन नाव पैलतीरी जाई पहा (३) हळदी-कुंकवाची आहे चाल तेव्हा उखाणा घेती छान उखाण्याला लावा चाल पतीराजांना द्यावा मान (४) अपयशाने खचतोस का? हार तरी का मानतोस प्रयत्नांना साथ देतोस का […]

नातलगांच्या भेटीची ओढ ! (बेवड्याची डायरी – भाग १४)

व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर पहिले पंधरा दिवस काही विशेष कारण असल्याशिवाय नातलग तुम्हाला संपर्क करू शकत नाहीत ..कारण व्यसन बंद केल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात ..व्यसनी व्यक्तीला अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतात ..अशा वेळी घरी जाण्याची ओढ असते मनात ..जर संपर्क झाला तर बहुतेक जण ..मला इथे खूप त्रास आहे ..इथली व्यवस्था मला आवडली नाही ..आता मी घरी येतो ..या पुढे मी अजिबात व्यसन करणार नाही ..वगैरे प्रकारचे बोलून कुटुंबियांना घरी नेण्यास आग्रह करतात .. […]

चिखलातले कमळ

सहा वर्षानंतर मुलीच्या फोटोचा अल्बम बघण्यात आला.  दत्तक मातापित्यासह तिचे अमेरिकेतील प्रशस्त बंगल्यातील फोटो, एक अलिशान मोठ्या गाडीत स्कूलयुनिफार्म मधले फोटो, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा बघातानाचे फोटो, जगातले सातवे आश्चर्य Grand Canyon च्या विशाल सुळ्याकडे मान उंचावून बघतानाचे फोटो,  Washington येथील President’s  White House   बघातानाचे फोटो, अनेक अनेक छबीमध्ये तिचा भाग्य आलेख फुलविणारे प्रसंग बघण्यात आले. जे तिच्या झोळीत निसर्गाने ओंतले ते  कल्पनातीत होते […]

1 6 7 8 9 10 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..