नवीन लेखन...

श्री आनंद लहरी – भाग १२

आई जगदंबेच्या भक्तीमध्ये रत झाल्याचा परिणाम किती रमणीय असतो हे सांगताना आचार्यश्री, परीसस्पर्श तथा गंगा स्पर्शाचे उदाहरण देत म्हणतात….. […]

प्रीत जडली आहो तुम्हावर (लावणी)

प्रीत जडली आहो तुम्हावर,कधी येणार घरी।। सांज झाली सख्या साजना,धडधड वाढली उरी।।धृ।। शृंगार केला तुमासाठी, माळला मोगरा सुगंधी ।। नाकात चमके नथनी, विडा रंगला मुखामंदी।। पैठणी नेसे येवल्याची, पदरी मोर जरतारी।। सांज झाली सख्या साजना, धडधड वाढली उरी ।।१।। ठसक्यावरी हा ठसका, याद केली का राया तुमी।। उशीर काव करतासा, धनी वाट पाहतो आमी।। अधीर झाली […]

भाकरी

भाकरीच्या पाठीवर     ठसे दिसती हातांचे जातां तव्यावर भाजूनी    निशाण राहते कष्टांचे एका भाकरीच्या पाठीं     हात कितीक गुंतले कण कण देती ग्वाही      मन भरुनी कसे आले उन्हां पावसात फिरे      शेतामधीं शेतकरी टप् टप् घाम गाळी      उभी करितो जवारी पोती पोती उचलूनी      वाहून नेई मजूर दमछाक होऊनी ही      मिळत नाहीं पोटभर ओवी म्हणत मुखानें       आई थापिते भाकरी साऱ्यांच्या […]

श्री आनंद लहरी – भाग ११

आई जगदंबेच्या चरणी असलेली आपली अनन्य शरणता आचार्य श्री येथे आर्तपणे सादर करीत आहेत. भक्ताच्या भक्तीचे ते सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे. भक्ती ही पतिव्रतेसमान एकनिष्ठ असायला हवी. या अनन्यशरणतेने आचार्यश्री म्हणतात…. […]

पाहण्या तुला चंद्रमा उत्सुक

पाहण्या तुला चंद्रमा उत्सुक, माजला मनात कोलाहल,अशी कुठली बरे चांदणी, जिच्याशी रंगतो प्रेम- खेळ? सुंदर सुरेख कोमलांगी, भासतेस, चाफ्याचे फूल, सुंदर सोनसळी रंग त्याचा, ज्याची दुनियेला पडे भूल,–!! त्या चंद्रम्यासारखा, मीही, तुझा प्रेमवेडा, प्रेमाच्या रजतकिरणी, न्हाऊन निघतो केवढा,–!! हात तुझा हाती येता , बघ कसा जळतो बिचारा, प्रेम दिवस त्याला न मिळे, कधी करण्यास साजरा,!! आभाळीचा […]

श्री आनंद लहरी – भाग १०

आचार्यश्री आई जगदंबे ला प्रार्थना करीत आहेत की, कृपापांगालोकं वितर तरसा साधुचरिते- हे साधुचरिते अर्थात अत्यंत सुयोग्य वर्तन करणाऱ्या आई जगदंबे ! तू तुझ्या कृपारूपी दृष्टिपाताला माझ्यावर तरसा अर्थात अत्यंत शीघ्रपणे वितर अर्थात प्रदान कर. […]

तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ,

आमचे नितीन नांदगावकर साहेब आजवर सदैव अन्यायाशी लढा देत आले आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे दिवसेंदिवस ते वाढत चालले आहे . त्यांच्यावर केलेली एक कविता—- तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ, अन्यायातला पाठीराखा, काय म्हणावे तुला तेजा, तुझ्यासम,– या सम हा-!!! जनता जनार्दन भक्त होता, तुला पाठिंबा सकलांचा, दोस्त तू रंजल्या-गांजल्या, जुलमीना दाखवीत बडगा,–!!! दिप्त प्रदीप्त होशी, अन्याया […]

मिशन – इलेक्शन आणि मटका ! (नशायात्रा – भाग १८)

मी हळू हळू माझ्या मित्रांच्या नकळत ब्राऊन शुगर ओढू लागलो होतो , सगळे एकत्र असताना गांजा , चरस आणि मग सगळ्यांना शुभरात्री करून झाले की मी घरी येताना सोबत ब्राऊन शुगर ची ती छोटीशी लाल झाकणाची बाटली घरी आणून सिगरेट मध्ये गांजा भरून त्यात थोडीशी पावडर टाकून ओढत असे . मला आठवते एरवी आम्ही गांजा चिलीमितून ओढत असू व त्या वेळी अनेकदा मातीची चिलीम नीट सांभाळावी लागे नाहीतर फुटून जात असे म्हणून मी सायकलच्या पायडलला असलेल्या स्टीलच्या नळी ची एक कायम टिकेल अशी चिलीम बनवली होती .. […]

सत्य जीवन

हिशोब तुजला घ्यावयाचा,  मानव दरबारी थोडा दृष्य केले जे का येथे,  मानव वाचील त्याचा पाढा…..१ अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण,  ना  कोणी येथे खरा हिशोब तोच कर्माचा,  पाप असो वा पुण्य मग ते….२ नीती अनीतीच्या चाकोरीतून,  जाई कुणीतरी असा एकटा मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा….३ बाह्यांगाचे कर्म निराळे,  शरिरमनाशी निगडीत ते अंतकर्मे आत्म्याची […]

श्री आनंद लहरी – भाग ९

स्वतः कडे न्यूनत्व घेणे, स्वतःच्या अज्ञानाची कबुली देणे हे संतांचे वैभव आहे. जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे स्वतःच्या अशाच अल्पक्षमतेचे कथन आई जगदंबे च्या समोर करीत आहेत. असे असले तरी माझ्यासारख्या सामान्य जीवालाही ती सर्वस्व प्रदान करते हे सांगण्याची भूमिका त्यामागे आहे. […]

1 7 8 9 10 11 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..