अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग ३ 

हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव. […]

मन निरोगी तर शरीर निरोगी..

आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात. […]

देवळं आणि देव : तेंव्हा अन् आता

…जनावर काय नि देव काय, एकदा का माणसाळला, की मग तो पार ‘पाळीव’ होऊन त्याची सवय होते. आणि एकदा का सवय झाली, की मग त्याच्याबद्दलची भिती वाटेनाशी होते. देवाचं तेच झालंय. भिती नाहीशी झाली, आणि मग बरे कमी आणि वाईट जास्त असे सर्व व्यवहार देवाच्या साक्षीनेच केले जातात. क्वचितप्रसंगी अशा व्यवहारात देवाला भागिदार म्हणूनही घेतलं जाऊ लागलं. माणसाच्या माणूसकी प्रमाणे देवाची देवसकी गेल्यामुळे, देव भागीदार म्हणून खुशही होत असावा, हे त्याला भागिदार म्हणून घेतलेल्यांच्या होणाऱ्या उत्तरोत्तर प्रगतीवरून दिसतं, कारण त्या प्रगतीत भागिदार म्हणून देवाचा वाटाही वाढता असतो… […]

खंडोबाची थोडी माहिती

” आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी ” ह्या ओळी गाणे बनून सगळे कडे घुमत आहेत, Groups वर गाणे share होत आहेत . पण ह्या ओळी नक्की काय आहेत हे समजून घेउ… जेजुरी ला गेल्यावर तळी-भंडार हा आवशक विधी त्याचे हे बोल/ मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात , विड्याची […]

परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे

।। श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन……..।। एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला, आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली. ‘आता राजा आपली पूजा करील’ असे त्याच्या मनात आले. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की, ‘आपण एकटेच यावे.’ त्याप्रमाणे, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे; तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल […]

रहस्यमय जगन्नाथ पुरी

जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि भक्तांची श्रद्धा:- जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांचे शरीर शोधून त्याचा दाहसंस्कार केला. इतर सर्व शरीर जळून गेले पण हृदय जळतच राहिले. नंतर तो पिंड नदीच्या पाण्यात सोडण्यात आला. त्या […]

देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग १

वेदामधून घेतलेले, जवळपास सर्वांचेच पाठ असलेले, हे मंत्रपुष्प ही आपली भारतभूची राष्ट्रीय प्रार्थना आहे, हे कोणाला माहिती नसेल. ही जणु काही शपथ आहे. देवाच्या समोर उभे राहून एका सर्व शक्तीमान शक्तीला शरण जाऊन सांगतोय, की हे राष्ट्रदेवते, मी तुला साक्ष ठेऊन ही शपथ घेतोय, […]

आजी एक गोष्ट सांगायची

प्रत्येक तिथीला आनंद झाला ….तसे हे तिथींचे शुभदिन आपल्या जीवनात आनंद घेऊन येवोत. आजच्या दिव्यांच्या अमावास्येच्या निमित्ताने एका आजीने सांगीतलेली गोष्ट…… […]

नमस्कार – भाग ९

नमस्कारानंतर करायची प्रार्थना. या पूजेमधे माझे काही चुकले असेल तर देवा मला क्षमा कर. क्षमा मागण्यात कोणताही कमीपणा नाही. प्रत्येक धर्मात या प्रार्थना आहेत. प्रार्थनेमधे मोठी शक्ती आहे. सामुहिक प्रार्थनेत तर आणखी जास्त शक्ती मिळते. येथे शक्ती हा शब्द शब्दशः अर्थाने वापरायचा नाही. […]

1 2 3 24