चिनी माल खरेदी करणं जीवनावश्यक आहे का ?
एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर. लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. […]
