नवीन लेखन...

एका चित्राची कथा

Story of a painting of Peshawe Treaty in 1790

शनिवारवाड्यातील गणेश महालात इंग्रज व पेशवे यांच्यात १७९० मध्ये ऐतिहासिक तह झाला होता. इंग्रज अधिकारी चार्ल्स मॅलेट आणि सवाई माधवराव पेशवे यांच्यातील या तहाचे हुबेहूब चित्र इंग्रज चित्रकार थॉमस डॅनिअल यांनी या तहानंतर १५ वर्षांनी काढले. विशेष म्हणजे थॉमस डॅनिअल या तहाच्यावेळी पेशव्यांच्या दरबारात उपस्थित नव्हते. तरी त्यांनी काढलेले हे चित्र अजरामर ठरले. याचे कारण थॉमस डॅनिअल यांचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती आणि त्यांची सृजनशीलता.

विशेष म्हणजे मॅलेटने सुरुवातीला हे चित्र काढण्याची जबाबदारी जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकारावर टाकली होती. जेम्स वेल्सच्या निधनानंतर १७९५ मध्ये ती जबाबदारी थॉमस डॅनिअलच्या शिरावर आली. कॅनव्हासवर तैलरंगात काढलेले हे चित्र थॉमस डॅनिअल यांनी १८०५ मध्ये पूर्ण केले. थॉमस डॅनिअल यांनी हे चित्र इंग्लंडमध्ये काढले आणि त्यासाठी त्यांनी अनेकदा भारतात प्रवास केल्याची नोंद आहे.

हे दुर्मिळ चित्र सुमारे दोनशे वर्षे उपलब्ध झाले नव्हते. इंग्लंडमधील टेट या आधुनिक चित्र संग्रहालयात काही वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आल्यावर ते पुन्हा जगासमोर आले. या चित्राच्या फोटोकॉपीवरुन भारतीय संशोधकांनी त्याचा बारकाईने अभ्यास केला. १९७७ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात ‘एक दरबारचित्र आणि चरित्र’ या लेखाद्वारे द. ग. गोडसे यांनी या चित्रावर प्रकाशझोत टाकला होता.

एक कलाकृती म्हणून हे चित्र अमूल्य असले तरी अभ्यासकांना त्यात अनेक विसंगती आढळल्या. शनिवारवाड्याच्या गणेश महालातील खांब सुक्ष्म कोरीव नक्षीकामाने सजवण्यात आले होते. पण थॉमस डॅनिअल यांच्या चित्रातील खांब रोमन पद्धतीचे दिसतात. महालाच्या छतावर दाखवण्यात आलेल्या गायी परदेशाती तोंडावळ्याच्या आहेत. पेशव्यांच्या दरबारात येताना जोडे बाहेर काढून येण्याचा रिवाज होता, पण या चित्रात इंग्रज अधिकारी चार्ल्स मॅलेट मात्र जोडे घालून बसलेला दिसतो. अशा अनेक विसंगती असल्या तरी चित्राचे महत्व कमी होत नाही.

इंग्लंडमधील “टेट” या आधुनिक चित्रसंग्रहालयातील हे चित्र पाहण्यासाठी लिंक:

http://www.tate.org.uk/art/artworks/daniell-sir-charles-warre-malet-concluding-a-treaty-in-1790-in-durbar-with-the-peshwa-of-t12511

 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

1 Comment on एका चित्राची कथा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..