नवीन लेखन...

मोबाईल लाईफस्टाईल

अतिशयोक्ती वाटेल… पण हे काही दिवसात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे…. आई स्वयंपाकघरात, बाबा हॉलमध्ये, मुलगा त्याच्या खोलीत, ताई कुठेतरी बाहेर, आजोबा-आजी त्यांच्या खोलीत. पण एकमेकांशी गप्पा मारताहेत. चक्क WhatsApp वरुन. प्रत्येक कुटुंबाचा एक स्वत:चा ग्रुप असेल. तसा बर्‍याच कुटुंबांनी आत्ताच बनवलाय. त्या ग्रुपवरुनच आई सांगेल… “चला जेवायला”. बाबा कदाचित चिंटूला विचारतील “अभ्यास झाला का रे बाबा?”. […]

पार्सल टेप आर्ट

काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल? जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला […]

जरी सरिताओघ समस्त। परिपूर्ण होऊनि मिळत। …… (ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्‍याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये. […]

का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। ……. ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २२

गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते.
[…]

आपला कपालेश्वर !

कर्जतमध्ये मूल जन्माला आलं की त्याची पहिली ओळख होते ती त्याच्या आई-बाबांशी आणि दुसरी ओळख होते कपालेश्वराशी! कर्जतकरांची तशी श्रद्धाच आहे – बाळाला कपालेश्वराच्या पायाशी ठेवला की ते दीर्घायुषी होते. […]

कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांची जादु ……

श्रावण महिना लवकरच सुरु होईल. सणासुदीच्या या दिवसात सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघानेच आले. मुंबई-पुण्यातल्या असुरक्षित जीवनात खर्‍या सोन्याचे दागिने घालून प्रवास करणेही कठीण झाले आहे. सोन्याच्या किमतीही आता आकाशाला भिडायला लागल्या आहेत. त्यामुळे अस्सल सोन्याचे दागिने घालण्यावर मर्यादा आल्या आहेत. बदलत्या काळाची गरज ठरलेले, कलाकुसर, नावीन्य, सुरक्षितता, हौस आणि कमी वजनातील २४ कॅरेट सोन्याचे […]

आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई

काही पुस्तके देखणी दिसतात, पण त्यात आशयघनता नसते. काही पुस्तके आशयघन असतात पण त्यांच्यात देखणेपणा नसतो. मराठी साहित्याच्या प्रांतात तर ही स्थिती नेहमीच आढळते. परंतु, ही उणीव दूर करणारे एक नवे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे, ते म्हणजे ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’, लेखक मंदार जोशी. […]

पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती. जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह’ हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची […]

भारतीय खाद्यसंस्कृती

कोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना तिथल्या समाजाच्या अन्नांबद्दलच्या कल्पना आणि अन्नपदार्थ बनविण्यासंबंधीच्या कल्पना कशा आणि का बदलल्या गेल्या हे बघणं अत्यंत महत्वावं आणि मनोरंजकही असतं. आपल्या देशासारखा भला मोठा इतिहास असलेल्या देशाच्या बाबतीत तर ते आवश्यकही असतं. […]

1 82 83 84 85 86 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..