Avatar
About नीतिन आरेकर
श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

एन् डी स्टुडिओ: प्रतिभावंताचे सत्य-स्वप्न !

प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई! एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणार्‍या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओंमध्ये या स्टुडिओची गणना होते. […]

तर्कतीर्थ

विद्वत्ता माणसाला प्रतिभेसारखीच उपजत मिळत असते, तो एक सहज गुण आहे. विद्वत्तेला अध्ययनाने आणि अभ्यासाने विकसित करता येते आणि विद्वान व्यक्ती ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अध्ययनरतच रहात असते. त्या व्यक्तीच्या अवती भोवती विद्वत्तेचे प्रखर तेज प्रकाशत असते, पण तो विद्वत्सूर्य मात्र चंद्रासारखा शीतल आणि पिकलेल्या फळांनी फलभारित झालेल्या झाडाप्रमाणे अवनत रहातो.
[…]

जरी सरिताओघ समस्त। परिपूर्ण होऊनि मिळत। …… (ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्‍याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये. […]

का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। ……. ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २२

गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते.
[…]

आपला कपालेश्वर !

कर्जतमध्ये मूल जन्माला आलं की त्याची पहिली ओळख होते ती त्याच्या आई-बाबांशी आणि दुसरी ओळख होते कपालेश्वराशी! कर्जतकरांची तशी श्रद्धाच आहे – बाळाला कपालेश्वराच्या पायाशी ठेवला की ते दीर्घायुषी होते. […]

आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई

काही पुस्तके देखणी दिसतात, पण त्यात आशयघनता नसते. काही पुस्तके आशयघन असतात पण त्यांच्यात देखणेपणा नसतो. मराठी साहित्याच्या प्रांतात तर ही स्थिती नेहमीच आढळते. परंतु, ही उणीव दूर करणारे एक नवे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे, ते म्हणजे ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’, लेखक मंदार जोशी. […]

बालगंधर्व

मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट!
[…]

ज्ञानेश्वरी, अध्याय ६ ओवी ८०

जगणे ही मोठी आनंदयात्रा आहे. पण ह्या आनंदयात्रेचा वारकरी असणारा माणूस मात्र शुभ अशुभाच्या कल्पनांच्या ओझ्याखाली दबून जात असतो. या सर्व कल्पना निर्माण कोणी के्ल्या याचा आपण विचार करत नाही.
[…]

1 2