वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना

त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो. […]

वलयांकितांच्या सहवासात – पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन

‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की २००३ च्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या व तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा. माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं. मी रवीकाकाला सांगितलं, निर्मला बाछानी म्हणून झाकीरकाकाच्या सचिव आहेत, त्यांना सांगितलं आणि झाकीरकाका मुलाखतीला तयार झाला. शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा. […]

वलयांकितांच्या सहवासात – लेखमालेची ओळख

सुप्रसिद्ध शब्दांकनकार प्रा. नीतिन आरेकर यांनी घेतलेला, वलयांकित व्यक्तींच्या सर्वसामान्यांना माहित असलेल्या व्यक्तिमत्त्वापलिकडे जाऊन घेतलेला शोध….. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..