काळानुसार बदललेले ठाणे
मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात. माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ […]
