नवीन लेखन...

आयुबोवान

कोलंबो एअरपोर्ट वरुन टेक ऑफ घेतल्यावर विमान जकार्ता च्या दिशेने ३६० अंशात फिरले. कोलंबो च्या किनाऱ्याला मुंबई च्या किनाऱ्या प्रमाणे समुद्र भिडत होता. पण मुंबई सारखं काँक्रिटचे जंगलाने कोलंबो च्या किनाऱ्याला वेढलेले नव्हते.
नारळाची हिरवीगार झाडे आणि त्या झाडांच्या आतून डोकावणारी लहान मोठी घरे कोलंबो शहर मागे पडताना दिसत होती. […]

“सुपर फुड” चुलीवरची दूध भाकर…

ज्वारी व बाजरी या धान्याला अमेरिकेने नाईलाजाने का होईना सुपर फुड म्हणून मान्यता दिली आहे.2023 हे वर्ष जग जागतिक भरड धान्य milet वर्ष म्हणून साजरे करीत आहे…ज्वारी बाजरी ही धान्ये आपण सिंधुसंकृती पासून आपल्या आहारात वापरत आहोत.. […]

देव दिवाळी – उत्सव देवदेवतांचा – प्रकाशाचा

भारताच्या विविध प्रांतात देव दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्रात विशेषतः कोकण भागात मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी आपल्या कुलदेवतेला विशेष नैवेद्य दाखविला जातो. धर्मसिंधु आणि कार्तिक मास महात्म्य या ग्रंथात देव दिवाळीच्या व्रताचे महत्व नोंदविलेले आहे. […]

जमेल तेवढे तर करू!

वेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाइलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी ‘झक मारत’ घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे…’ अनिल. इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा! […]

धनुषकोडी आणि रामसेतू…

भारतात प्रत्येक ठिकाणी विविधता आहे. भारतात अशा काही जागा आहेत जिथे आजही माणूस आणि निसर्ग एकरूप होतो. जिकडे आजही काही रहस्य आहेत. तामिळनाडूच्या रामेश्वर जिल्ह्यातलं धनुषकोडी हे असंच एक गावं. ह्या गावाचा संदर्भ अगदी रामायणातील आहे. […]

गान गुणगान

प्रयोगशील पंडीत सत्यशील देशपांडे यांची ” माझा कट्टा ” वरील अफाट, आश्चर्यकारक मुलाखत पाहिली आणि त्यांत उल्लेखिलेले “गान गुणगान ” हे त्यांचे पुस्तक ( त्यांतील खास वैशिष्ट्यामुळे) लगेच विकत घ्यायचे ठरविले. […]

कोकण रेल्वे : असामान्य आणि अफलातून इंजिनिअरिंग

कोकण रेल्वे हा प्रोजेक्ट भारतासाठी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा आणि अवघड असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होता ह्यात संशय नाही. हा प्रोजेक्ट अनेक खडतर परिश्रमानंतर यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. आज कोकण रेल्वे रोज तीन राज्यातून 741 कि.मी.चा प्रवास करते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ह्या तीन राज्यांतून जातो. कोकण रेल्वेची हद्द मुंबई जवळील रोहा येथून सुरू होते ते थोकूर ह्या मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटकमधील रेल्वे स्टेशनला संपते. […]

संस्कारांची जपणूक

रमाबाईंना हुरहूर लागली होती.. असं काय घडलं आहे.. आज माझी दोन्ही लेकरं न सांगता, नमस्कार न करता गेले आहेत.. असंख्य विचार मनात येत होते. पण त्यांनी ठरवले होते की, आज डोळ्यातून पाण्याचा थेंब काढायचा नाही. त्या पुढील कामासाठी वळल्या इतक्यात संदीपचा फोन आला, ‘आई, आम्हां दोघांनाही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावं लागत आहे, तेव्हा तू तुझी बॅग भरून ठेव. […]

प्राण्यांचा जैवभार

मानवाच्या ‘अधिपत्या’खालील भूप्रदेश वाढत आहेत, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा घटत आहे. विविध वन्यप्राण्यांची संख्या ही पृथ्वीवरच्या वन्यजीवनाच्या ‘प्रकृती’ची निर्देशक असते. वन्यप्राण्यांच्या संख्येवर होणारा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणून घ्यायचा असला तर, कोणत्या जातीचे किती प्राणी अस्तित्वात आहेत, हे माहीत असायला हवं. […]

बिथोवेनचा मृत्यू

लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ काळ निर्मितीक्षमता लाभलेल्या या संगीतकाराची श्रवणशक्ती मात्र त्याच्या तरूण वयातच क्षीण होऊ लागली होती. […]

1 63 64 65 66 67 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..